एक्स्प्लोर

Petrol and Diesel Price :  दोन महिन्यांचा विश्रांतीनंतर पेट्रोलच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

Petrol and Diesel Price Today Updates : पेट्रोलच्या किमतींमध्ये 20 ते 25 पैशांची वाढ करण्यात आली आहे. तर डिझेलचे दर 25 पैशांनी वाढवण्यात आले आहेत.

Petrol and Diesel Price Today Updates : आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाली असून त्यासोबतच देशातही पेट्रोल-डिझेलचे दर कडाडले आहेत. देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांनी यापूर्वीच उच्चांक गाठला आहे. आज भारतीय तेल कंपन्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर असणाऱ्या पेट्रोलच्या दरांत (Petrol) वाढ झाली आहे. तसेच आज डिझेलच्या दरांत (Diesel) सलग तिसऱ्या दिवशी वाढ करण्यात आली आहे. 

तेल कंपन्यांनी आज म्हणजेच, 28 सप्टेंबर रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ केली आहे. पेट्रोलच्या किमतींमध्ये 20 ते 25 पैशांची वाढ करण्यात आली आहे. तर डिझेलचे दर 25 पैशांनी वाढवण्यात आले आहेत. मुंबईमध्ये आज पेट्रोल 21 पैशांनी वाढलं असून डिझेलच्या दरात 28 पैशांची वाढ झाली आहे. 

आज देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत (Petrol Price) 20 पैसे प्रति लिटर तर डिझेलचे दर (Diesel Price) 25 पैसे प्रति लिटरनं वाढवण्यात आली आहे. दिल्लीत पेट्रोल (Petrol) 101.39 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. तर डिझेल 89.57 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे.

पेट्रोल-डिझेल GSTमध्ये घेण्यासाठी का तयार नाही केंद्र आणि राज्य सरकार?
केंद्र सरकारनं कर प्रणालीमध्ये सुधारणांची गरज असल्याचं कारण देत जीएसटी (GST) लागू केला होता. पण जीएसटीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा समावेश करण्यात आलेला नाही. तसेच देशातील बहुतांश राज्य सरकारचंही हेच मत आहे की, पेट्रोल-डिझेलचा जीएसटीच्या कक्षेत समावेश केला जाऊ नये. पण का?  यामुळे काय फायदा होणार? यांसारखे अनेक प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाले आहेत. जाणून घेऊया यामागील कारणं... 

पेट्रोल-डिझेलच्या किमती जीएसटीच्या कक्षेत आणण्याची केंद्र सरकारसोबत राज्य सरकारचीही इच्छा नाही. कारण सरकारला चिंता आहे ती, देशाच्या तिजोरीची. सामान्य माणसाला दिलासा देता-देतो, देशाच्याच तिजोरीत खडखडाट होण्याची भिती सरकारला वाटतेय. जर पेट्रोल-डिझेलचा समावेश जीएसटीच्या कक्षेत केला, तर पेट्रोल-डिझेलच्या किमती अर्ध्या होणार. आजच्या किमतीनुसार जर अंदाज लावला तर, पेट्रोल 56 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 55 रुपये प्रति लिटर विकलं जाईल. 

सप्टेंबरमध्ये दोन वेळा घटल्या पेट्रोल-डिझेलच्या किमती 
सप्टेंबर महिन्यात दोन वेळा पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये घट झाली. महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच, 1 सप्टेंबर रोजी भारतीय बाजारात सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत 15-15 पैसे प्रति लिटरची कपात केली होती. तसेच, 05 सप्टेंबर रोजी पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये 15-15 पैशांची घट झाली होती. म्हणजेच, या आठवडाभरता पेट्रोल-डिझेल 30-30 पैशांनी स्वस्त झाला आहे. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर  https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Team India Squad Against New Zealand: रिंकू सिंग, इशान किशान IN, शुभमन गिल, जितेश शर्मा OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
रिंकू, इशान IN, शुभमन, जितेश OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
Kopargaon Nagarparishad Election 2025: कोपरगावमध्ये भाजप-राष्ट्रवादीत जोरदार राडा, पोलिसांसमोरच कार्यकर्ते भिडले, नेमकं काय घडलं?
कोपरगावमध्ये भाजप-राष्ट्रवादीत जोरदार राडा, पोलिसांसमोरच कार्यकर्ते भिडले, नेमकं काय घडलं?
T20 World Cup: टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, इशान किशनची एन्ट्री, शुभमन गिलला वगळलं, चकीत करणारी 15 जणांची टीम
टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, इशान किशनची एन्ट्री, शुभमन गिलला वगळलं, चकीत करणारी 15 जणांची टीम
Prithviraj Chavan: अभी तो पार्टी शुरु हुई है! पृथ्वीराज चव्हाणांकडून 9 सनसनाटी दावे, हरदीप सिंग पुरी, मोदी ते अनिल अंबानींचा पहिल्यांदाच थेट उल्लेख करत काय काय म्हणाले?
अभी तो पार्टी शुरु हुई है! पृथ्वीराज चव्हाणांकडून 9 सनसनाटी दावे, हरदीप सिंग पुरी, मोदी ते अनिल अंबानींचा पहिल्यांदाच थेट उल्लेख करत काय काय म्हणाले?

व्हिडीओ

T-20 WorldCup Team Announce : टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा, शुभमन गिलला वगळलं
Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
Mumbai BJP And Shivsena Seat Sharing : मुंबईत जागावाटपात भाजप-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच
Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Squad Against New Zealand: रिंकू सिंग, इशान किशान IN, शुभमन गिल, जितेश शर्मा OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
रिंकू, इशान IN, शुभमन, जितेश OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
Kopargaon Nagarparishad Election 2025: कोपरगावमध्ये भाजप-राष्ट्रवादीत जोरदार राडा, पोलिसांसमोरच कार्यकर्ते भिडले, नेमकं काय घडलं?
कोपरगावमध्ये भाजप-राष्ट्रवादीत जोरदार राडा, पोलिसांसमोरच कार्यकर्ते भिडले, नेमकं काय घडलं?
T20 World Cup: टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, इशान किशनची एन्ट्री, शुभमन गिलला वगळलं, चकीत करणारी 15 जणांची टीम
टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, इशान किशनची एन्ट्री, शुभमन गिलला वगळलं, चकीत करणारी 15 जणांची टीम
Prithviraj Chavan: अभी तो पार्टी शुरु हुई है! पृथ्वीराज चव्हाणांकडून 9 सनसनाटी दावे, हरदीप सिंग पुरी, मोदी ते अनिल अंबानींचा पहिल्यांदाच थेट उल्लेख करत काय काय म्हणाले?
अभी तो पार्टी शुरु हुई है! पृथ्वीराज चव्हाणांकडून 9 सनसनाटी दावे, हरदीप सिंग पुरी, मोदी ते अनिल अंबानींचा पहिल्यांदाच थेट उल्लेख करत काय काय म्हणाले?
Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला मराठी पंतप्रधान होणार असल्याचा दावा करणारे पृथ्वीराज चव्हाण आज म्हणाले...
19 डिसेंबरला मराठी पंतप्रधान होणार असल्याचा दावा करणारे पृथ्वीराज चव्हाण आज म्हणाले...
एपस्टीनच्या मेलमध्ये 'मोदी ऑन बोर्ड'चा उल्लेख, मंत्री हरदीप पुरींचंही नाव; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, सरकारने खुलासा करण्याची मागणी
एपस्टीनच्या मेलमध्ये 'मोदी ऑन बोर्ड'चा उल्लेख, मंत्री हरदीप पुरींचंही नाव; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, सरकारने खुलासा करण्याची मागणी
Imran Khan: सजा पे सजा! पाकिस्तानात इम्रान खान यांना पत्नीसह आणखी एका प्रकरणात तब्बल 17 वर्षाची शिक्षा
सजा पे सजा! पाकिस्तानात इम्रान खान यांना पत्नीसह आणखी एका प्रकरणात तब्बल 17 वर्षाची शिक्षा
एपस्टीन फाईल की राजरोस अय्याशींचा अड्डा! मायकेल जॅक्सन, बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प ते इंग्लंडचा राजपुत्र; खळबळजनक स्थितीमधील 15 फोटो
एपस्टीन फाईल की राजरोस अय्याशींचा अड्डा! मायकेल जॅक्सन, बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प ते इंग्लंडचा राजपुत्र; खळबळजनक स्थितीमधील 15 फोटो
Embed widget