एक्स्प्लोर

Petrol and Diesel price | आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर, सर्वसामान्यांना दिलासा

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असताना देशात आता पेट्रोलच्या आणि डिझेलच्या (Petrol and Diesel price) किंमती स्थिर आहेत. मुंबईत आज पेट्रोलची किंमत 97.57 रुपये इतकी आहे तर डिझेलची किंमत ही 88.60 रुपये इतकी आहे.

मुंबई : गेल्या महिन्यात सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता सलग 25 व्या दिवशी स्थिर राहिल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असताना देशात आता पेट्रोलच्या आणि डिझेलच्या किंमती स्थिर राहिल्या आहेत हे विशेष. मुंबईत आज पेट्रोलची किंमत 97.57 रुपये इतकी आहे तर डिझेलची किंमत ही 88.60 रुपये इतकी आहे. दिल्लीमध्ये हाच दर अनुक्रमे 91.17 आणि 81.47  रुपये इतकी आहे. 

देशात फेब्रुवारी महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढताना दिसत होत्या. त्यामुळे सामान्य लोकांना महागाईला तोंड द्यावं लागत होतं. आता त्यावर काही अंशी दिलासा मिळाला आहे. 

गेल्या सहा वर्षाच्या कालावधीत केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and Diesel) किंमतीवर 300 टक्क्याहून अधिक कर लावला आहे. सध्या केंद्र सरकारकडून पेट्रोलवर 32.98 प्रति लिटर तर डिझेलवर 31.83 रुपये प्रती लिटर इतका कर लागतो. आता यावरच कर थांबत नाही. राज्य सरकार त्यावर वेगळा कर लावते. महाराष्ट्र सरकार पेट्रोलच्या किंमतीवर 25 टक्के व्हॅट लावते तर डिझेलवर 21 टक्के व्हॅट लावते. आता यावरही अधिकचा सेस लावला जातो. पेट्रोलवर 10 रुपये प्रती लिटर तर डिझेलवर 3 रुपये प्रति लिटर इतका सेस लावण्यात येतो. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढताना दिसत आहेत.

देशातील प्रमुख शहरातील इंधनाचे दर
मुंबई
पेट्रोल- 97.57 रुपये/लिटर
डिझेल- 88.60 रुपये/लिटर

दिल्ली 
पेट्रोल- 91.17 रुपये/लिटर
डिझेल- 81.47 रुपये/लिटर

Petrol and Diesel price | पेट्रोल डिझेलवर गेल्या सहा वर्षात 300 टक्क्याहून अधिक कर, केंद्र सरकारची लोकसभेत कबुली

कोलकाता
पेट्रोल- 91.35 रुपये/लिटर
डिझेल- 84.35 रुपये/लिटर

चेन्नई
पेट्रोल- 93.11 रुपये/लिटर
डिझेल- 86.45 रुपये/लिटर

देशात 15 जून  2017 पासून इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात. त्यामुळे देशात आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx  पेट्रोल डिझेलचे दर तीन सोप्या पद्धतीने पाहता येतील.

तुम्ही तुमच्या जिल्हाचं, तालुक्याचं लोकेशन सिलेक्ट करुन किंवा पेट्रोल पंपाचं नानाव https://associates.indianoil.co.in/PumpLocator/  या लिंकवर टाकून इंधनाचे दर काय आहेत याची माहिती घेऊ शकता.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकते. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत)

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

केंद्र सरकारची प्रति लिटर पेट्रोलमागे 33 रुपये तर डिझेलमागे 32 रुपयांची घसघशीत कमाई, संसदेत दिली कबुली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Police: पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता बसवणार
पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता बसवणार "सर्च लाईट"; बोपदेव घाटातील घटनेनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर
हेच का अच्छे दिन? छत्रपती संभाजीराजे मुंबईत धडकले, सरकारविरोधात आंदोलनाचं शस्त्र, नेमकं कारण काय?
हेच का अच्छे दिन? छत्रपती संभाजीराजे मुंबईत धडकले, सरकारविरोधात आंदोलनाचं शस्त्र, नेमकं कारण काय?
Sharad Pawar: माढ्यात शिंदे कुटुंबाकडे तुतारी सोपवून शरद पवार 'या' तीन मतदारसंघातील राजकारण कसं साधणार?
माढ्यात शिंदे कुटुंबाकडे तुतारी सोपवून शरद पवार 'या' तीन मतदारसंघातील राजकारण कसं साधणार?
Rahul Gandhi In Kolhapur : शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढाई ते आरक्षण मर्यादेची भिंत तोडणारच! राहुल गांधींनी रणशिंग फुंकले!
शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढाई ते आरक्षण मर्यादेची भिंत तोडणारच! राहुल गांधींनी रणशिंग फुंकले!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट  06 October 2024  ABP MajhaHarshwardhan Patil Join Sharad Pawar : हर्षवर्धन पाटील उद्या राष्ट्रवादीत, शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणारHiraman Khoskar Meet Sharad Pawar : काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी, खोसकरांची शरद पवारांसोबत चर्चाABP Majha Marathi News Headlines TOP Headlines 11 AM 06 October 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Police: पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता बसवणार
पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता बसवणार "सर्च लाईट"; बोपदेव घाटातील घटनेनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर
हेच का अच्छे दिन? छत्रपती संभाजीराजे मुंबईत धडकले, सरकारविरोधात आंदोलनाचं शस्त्र, नेमकं कारण काय?
हेच का अच्छे दिन? छत्रपती संभाजीराजे मुंबईत धडकले, सरकारविरोधात आंदोलनाचं शस्त्र, नेमकं कारण काय?
Sharad Pawar: माढ्यात शिंदे कुटुंबाकडे तुतारी सोपवून शरद पवार 'या' तीन मतदारसंघातील राजकारण कसं साधणार?
माढ्यात शिंदे कुटुंबाकडे तुतारी सोपवून शरद पवार 'या' तीन मतदारसंघातील राजकारण कसं साधणार?
Rahul Gandhi In Kolhapur : शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढाई ते आरक्षण मर्यादेची भिंत तोडणारच! राहुल गांधींनी रणशिंग फुंकले!
शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढाई ते आरक्षण मर्यादेची भिंत तोडणारच! राहुल गांधींनी रणशिंग फुंकले!
Tomato Price : टोमॅटोची 'लाली' वाढली, बळीराजाला दिलासा, 1 किलो टोमॅटो घेण्यासाठी द्यावे लागतात 'एवढे' पैसे 
टोमॅटोची 'लाली' वाढली, बळीराजाला दिलासा, 1 किलो टोमॅटो घेण्यासाठी द्यावे लागतात 'एवढे' पैसे 
Mangal Gochar 2024 : दिवाळीपूर्वीच मंगळाची चाल बदलणार; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
दिवाळीपूर्वीच मंगळाची चाल बदलणार; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
Ahmednagar News : मंदिराच्या परिसरात दारु आणि मांसविक्रीच्या दुकानांवर बंदी घाला, वारकऱ्यांच्या मागणीवर विखे पाटील म्हणाले...
मंदिराच्या परिसरात दारु आणि मांसविक्रीच्या दुकानांवर बंदी घाला, वारकऱ्यांच्या मागणीवर विखे पाटील म्हणाले...
Embed widget