एक्स्प्लोर
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत अंशतः वाढ झाली आहे. एका आठवड्याच्या आतच इंधनाच्या किमतीत अंशतः का असेना वाढ झाल्याने वाहनचालक नाराज होण्याची शक्यता आहे. पेट्रोलच्या किमतीत 14 पैशांनी तर डिझेलच्या किंमतीत 10 पैशांनी वाढ झाली आहे. डिलर्सच्या कमिशनमध्ये वाढ झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याची माहिती आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वीच पेट्रोलच्या किमतीत वाढ झाली होती, तर डिझेल स्वस्त झालं होतं. मागील दोन महिन्यात चौथ्यांदा पेट्रोलच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. 30 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून पेट्रोल 28 पैशांनी महागलं होतं, तर डिझेल सहा पैशांनी स्वस्त झालं होतं. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किंमती लक्षात घेऊन तेल कंपन्यानी तेव्हा हा निर्णय घेतला होता. https://twitter.com/PTI_News/status/783327960589664256
Before You Go
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody





















