एक्स्प्लोर

CBSE Board Exam 2027 : 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेपासून रंगणार परीक्षांचा संग्राम, पाहा संपूर्ण वेळापत्रक

CBSE Board Exam Date Sheet 2027 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) च्या 10वी आणि 12वीच्या वार्षिक परीक्षांची अधिकृत तारीख जाहीर केली आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता 10वी आणि 12वीच्या आगामी वार्षिक परीक्षांसाठीचे अधिकृत वेळापत्रक (Date Sheet 2027) जाहीर केले आहे. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, 10वी आणि 12वी अशा दोन्ही वर्गांच्या मुख्य प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा 16 फेब्रुवारी 2027 पासून एकाच वेळी सुरू होणार आहेत. परीक्षांचे नियोजन अचूक व्हावे आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा, या उद्देशाने मंडळाने परीक्षा सुरू होण्याच्या तब्बल 101 दिवस आधीच हे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.

CBSE Exam Schedule & Duration : 10वीच्या परीक्षा 9 मार्च तर 12वीच्या 9 एप्रिलपर्यंत चालणार

सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार, प्रात्यक्षिक परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन (Practical Exams) 01 जानेवारी 2027 पासून शाळांच्या स्तरावर सुरू होणार आहे.

त्यानंतर मुख्य लेखी परीक्षांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल:

इयत्ता 10वी परीक्षा : 16 फेब्रुवारी ते 9 मार्च 2027

इयत्ता 12वी परीक्षा : 16 फेब्रुवारी ते 9 एप्रिल 2027

परीक्षेची वेळ : सर्व विषयांचे पेपर्स एकाच सत्रात सकाळी 10:30 ते दुपारी 01:30 या वेळेत पार पडतील.

CBSE Board Exam Subject Wise Highlights : पहिल्या दिवशी भौतिकशास्त्र अन् कला विषयांचा पेपर

परीक्षेच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 16 फेब्रुवारी 2027 रोजी इयत्ता 12वीचा भौतिकशास्त्र (Physics) विषयाचा महत्त्वाचा पेपर होणार आहे. तर 10वीचा पेंटिंग आणि इतर प्रादेशिक भाषांचा पेपर पार पडेल. 

त्यानंतर गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र, इंग्रजी, हिंदी, रसायनशास्त्र तसेच वाणिज्य व कला शाखेचे सर्व प्रमुख पेपर्स टप्प्याटप्प्याने पार पडतील. दोन पेपर्सच्या दरम्यान विद्यार्थ्यांना उजळणीसाठी (Revision) पुरेसा वेळ देण्यात आला आहे.

CBSE Board Exam 46 Lakh Students Appearing : देश-विदेशातून 46 लाखांहून अधिक विद्यार्थी बसणार

या वर्षी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. देशभरातून आणि परदेशातील सीबीएसई संलग्न शाळांमधून मिळून एकूण 46.3 लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. यामध्ये इयत्ता 10वीचे सुमारे 26.5 लाख, तर इयत्ता 12वीचे 19.8 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

How to Download Timetable PDF : अधिकृत वेबसाईटवरून वेळापत्रक कसे डाउनलोड करावे?

विद्यार्थी आणि पालकांना परीक्षांचे सविस्तर विषयनिहाय वेळापत्रक (Timetable PDF) खालील सोप्या स्टेप्स वापरून डाउनलोड करता येईल:

मंडळाच्या cbse.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

मुख्य पानावर असलेल्या 'Latest @ CBSE' किंवा 'Examination Circulars' या पर्यायावर क्लिक करा.

'CBSE Class 10 & 12 Examination Date Sheet 2027' या लिंकवर क्लिक करा.

स्क्रीनवर दिसणारी वेळापत्रकाची PDF फाईल डाउनलोड करून प्रिंट काढून ठेवा.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCP Merger: मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
Kaziranga Accident : मोठी बातमी, आसामच्या काझीरंगामध्ये राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, ट्र्क-बसच्या अपघातात 23 जणांचा मृत्यू,मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
आसामच्या काझीरंगामध्ये भीषण अपघात, ट्र्क-बसच्या अपघातात 23 जणांचा मृत्यू,मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
राहुल गांधींचा फोन टॅप हा आरोप नाही, वस्तुस्थिती; हर्षवर्धन सपकाळांची टीका, संजय राऊतांचाही मोदी-शाहांवर हल्लाबोल
राहुल गांधींचा फोन टॅप हा आरोप नाही, वस्तुस्थिती; हर्षवर्धन सपकाळांची टीका, संजय राऊतांचाही मोदी-शाहांवर हल्लाबोल
Abhijeet Dipke: 'मी नजरकैदेत आहे', सोनम वांगचुक यांचा मोठा दावा, सरकारवरही घणाघात; आता अभिजीत दीपकेंनीही सुनावलं, म्हणाले, 2029 पूर्वी हे सरकार...
'मी नजरकैदेत आहे', सोनम वांगचुक यांचा मोठा दावा, सरकारवरही घणाघात; आता अभिजीत दीपकेंनीही सुनावलं, म्हणाले, 2029 पूर्वी हे सरकार...
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrakant Patil : बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
Rinku Singh : 43 कोटी वाचवण्यासाठी दोन खेळाडूंना रिलीज करा,रिंकू सिंगला केकेआरचा कॅप्टन करा, माजी क्रिकेटपटूनं फॉर्म्युला सांगितला...
केकेआरनं 'त्या' दोघांना रिलीज करावे, 43 कोटी वाचवावे, रिंकूला कॅप्टन बनवा, सल्ला कोणी दिला?
Mantralaya Clerk Protest : मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
NCP Merger : मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,15-16 मतांची त्यांना गरज, कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
NCP Merger: मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
Gold Rate Weekly Update : सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
Embed widget