एक्स्प्लोर
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. पेट्रोल प्रतीलिटर 3.77 रुपये तर डिझेल प्रतीलिटर 2.91 रुपयांनी स्वस्त झालं आहे. मध्यरात्रीपासून नवे दर लागू झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाल्यानं पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत.
यापूर्वी 16 जानेवारीला पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली होती. पेट्रोलच्या दरात 42 पैसे प्रतिलीटर तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 1.03 रुपये एवढी वाढ करण्यात आली होती. मागच्या वर्षभरात जवळपास 15 रुपयांची वाढ करण्यात आली होती. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाल्यानं सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच पेट्रोलच्या किंमतीत 1 रुपया 29 पैशांनी, तर डिझेलच्या किंमतीत 97 पैसे प्रति लीटर एवढी वाढ करण्यात आली होती. मार्च 2016 मध्ये पेट्रोलची किंमत सर्वात कमी होती. त्यानंतर सातत्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली होती. गेल्या वर्षभरात तब्बल 15 रुपयांनी इंधन महागलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement