एक्स्प्लोर
Advertisement
पेप्सी राजधानी, कोक शताब्दी, रेल्वेत लवकरच खासगी जाहिराती
नवी दिल्ली : आगामी काळात पेप्सी राजधानी एक्सप्रेस, कोक शताब्दी एक्सप्रेस अशी नावं ऐकायला मिळाली तर आश्चर्य वाटू देऊ नका. कारण रेल्वे मंत्रालय लवकरच खासगी कंपन्यांना रेल्वेगाडीत जाहिरातीची परवानगी देण्याच्या विचारात आहे.
या निर्णयामुळे रेल्वेच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव पुढच्या आठवड्यात मांडण्यात येईल. या करारानुसार एखाद्या कंपनीला आपल्या प्रॉडक्टची जाहिरात रेल्वे बोगीच्या आत आणि बाहेरही करता येणार आहे.
प्रवासभाड्यात वाढ न करता महसूल गोळा करण्यासाठी रेल्वेनं हे पाऊल उचललं आहे. सोबतच देशभरातल्या महत्वाच्या फलाटांवर 2400 एटीएम बसवण्याची महायोजना रेल्वेनं आखली आहे. यातूनही रेल्वेला मोठं उत्पन्न मिळणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement