एक्स्प्लोर
Advertisement
भारतीय वायुसेनेच्या कारनाम्याचं जोरदार कौतुक, देशभर जल्लोष
भारतीय वायुसेनेच्या कारनाम्याचं देशभरातूव जोरदार कौतुक होतं आहे. या बदल्याचा देशभर जल्लोष केला जात आहे. तर कुठे फटाक्यांची आतषबाजी तर कुठे मिठाई-पेढ्यांचं वाटप केलं जात आहे.
मुंबई : भारतीय हवाई दलाने आज पहाटे पुलवामा हल्ल्याच्या बाराव्या दिवशी जैशचं बारावं केलं आहे. भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईक हल्ल्यात 350 दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. यामध्ये 325 अतिरेकी आणि त्यांना प्रशिक्षण देणारे 25 प्रशिक्षक अशा एकूण 350 जणांचा खात्मा करण्यात भारतीय हवाई सेनेला यश आले आहे. तर यात जैशचे तीन अड्डेही नष्ट झाले आहेत.
भारतीय वायुसेनेच्या कारनाम्याचं देशभरातूव जोरदार कौतुक होतं आहे. या बदल्याचा देशभर जल्लोष केला जात आहे. तर कुठे फटाक्यांची आतषबाजी तर कुठे मिठाई-पेढ्यांचं वाटप केलं जात आहे.
VIDEO | भारताच्या 'एअर स्ट्राईक'नंतर देशभरात जल्लोषाचं वातावरण | एबीपी माझा
नागपूरात महाविद्यालयीन तरुणांचा जल्लोष
पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी कॅम्पवर जे हल्ले झाले ते या आधीच व्हायला हवे होते असं मतं वक्त करतं आज नागपुरात तरुणाईने जोरदार जल्लोष केला. तिरपुडे महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी भारत माता कि जय अशा घोषणाही दिल्या.
नाशिकच्या भोसला मिलीटरी शाळेत विद्यार्थ्यांचा जल्लोष
भारतीय वायुसेनेच्या कारनाम्याचं नाशिकच्या भोसला मिलीटरी शाळेत विद्यार्थ्यांन जल्लोष साजरा केला आहे. रणगाड्यावर चढून तिरंगा हवेत फडकवत जल्लोष साजरा केला आहे. हौज द जोश, वंदे मातरम च्या घोषणांनी आणि आतषबाजीने परिसर दुमदुमून गेला. भारत बलशाली होता आणि राहणार असा संदेशही विद्यार्थ्यांनी दिला.
VIDEO | भारताच्या 'एअर स्ट्राईक'नंतर भोंसला मिलिटरी स्कुलमधील विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया | एबीपी माझा
मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेर मुस्लिम बांधवांचा जल्लोष
मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेर वायुसेनेच्या यशाबद्दल मुस्लिम बांधवांनी मिठाई वाटतं जल्लोष साजरा केला आहे. वायुसेनेच्या यशाबद्दल मुस्लिम बांधवांनी शुक्राना नमाजही अदा करणार आहे. भारतीय ध्वज हातात घेऊन भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणाही दिल्या.
सिंधुदुर्गात फटाके फोडून जल्लोष
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी काश्मीर येथील पुलवामा हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर दिल्याबद्दल भारतीय सैन्य दलाचे अभिनंदन करण्यात आले. याखेरीज फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. पुलवामा येथील भ्याड हल्ल्यात भारतीय सैन्य दलाचे 44 जवान शहीद झाले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण, वेंगुर्ले, बांदा, कणकवली मध्ये फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष करण्यात आला
भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकचा वर्ध्यात जल्लोष
भारतानं पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकचा वर्धेत जल्लोष करण्यात आलाय. भारतीय वायुसेनेन पाकमध्ये घुसून दहशतवाद्यांची तळ उदध्वस्त केल्याच वृत्त पसरताच शहरात जल्लोष करण्यात आला. यावेळी शिवाजी चौकात तरुणांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. तर हिंदुस्तान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबादचे नारे यावेळी लावण्यात आलेत.
VIDEO | भारताच्या 'एअर स्ट्राईक'नंतर नागरीकांच्या प्रतिक्रिया | श्रीनगर | एबीपी माझा
पाकिस्तान मुडदाबाद चे नारे देत वाशिममध्ये जल्लोष
पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा भारतीय सैन्यदलाने बदला घेतल्याचा आनंद जल्लोष वाशिमच्या पाटणी चौकात फटाके फोडून साजरा केला आहे. पाकिस्तान मुडदाबाद चे नारे देत भारतीय सैन्यदलचा जयघोष करण्यात आला. या वेळी सर्व पक्षाचे कार्यकर्त्यांसह नागरिकही या जल्लोषात सहभागी झाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भविष्य
क्राईम
निवडणूक
Advertisement