एक्स्प्लोर
नरेंद्र पटेलांपाठोपाठ निखिल सवानींचाही भाजपला राम राम
भाजप सोडण्याचं कारण भाजप केवळ लॉलिपॉप दाखवतंय. आश्वासनं पूर्ण करत नाही, असा आरोपही निखिल सवानींनी केला.
गांधीनगर (गुजरात) : गुजरात विधानसभा निवडणूक जशी जवळ येतेय, तशी राजकीय वर्तुळातील घडामोडींनाही वेग चढू लागला आहे. काल नरेंद्र पटेल यांनी भाजपला राम राम ठोकल्यानंतर आज निखिल सवानी यांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. विशेष म्हणजे नरेंद्र पटेल यांच्याप्रमाणेच निखिल सवानी हेसुद्धा पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याचे निकटवर्तीय आहेत.
"नरेंद्र पटेलांना भाजपकडून एक कोटींची ऑफर दिल्याचे मी ऐकलं. प्रचंड निराश झालो. मी आता भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे.", असे निखिल सवानी यांनी सांगितले. शिवाय, भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय चुकिचा होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजप सोडण्याचं कारण भाजप केवळ लॉलिपॉप दाखवतंय. आश्वासनं पूर्ण करत नाही, असा आरोपही निखिल सवानींनी केला.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीची वेळ घेणार असून, त्यांना भेटल्यानंतर माझी पुढील वाटचाल स्पष्ट करेन, असेही निखिल सवानींनी सांगितले.
दरम्यान, कालच पाटीदार समाजाचे नेते आणि हार्दिक पटेलचे आणखी एक निकटवर्तीय मानले जाणारे नरेंद्र पटेल यांनीही एकाच दिवसात भाजपला राम राम ठोकला आहे. त्यानंतर आजा निखिल सवानी भाजपमधून बाहेर पडले आहेत.
पाटीदार समाज हा गुजरात निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावणारा समूह मानला जातो आणि हार्दिक पटेल हा या समाजाचा सध्या सर्वात लोकप्रिय नेता आहे. हार्दिक पटेल सध्या सक्रीय राजकारणात नसला, तरी त्याने काँग्रेसच्या बाजूने उघड भूमिका घेतली आहे. त्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यात आता नरेंद्र पटेल यांच्या पाठोपाठा निखिल सवानी यांनीही भाजपला राम राम ठोकला आहे. या सर्व घडामोडींचा भाजपला निवडणुकीत बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संबंधित बातमी : भाजपमध्ये येण्यासाठी मला एक कोटींची ऑफर : नरेंद्र पटेल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
पुणे
राजकारण
राजकारण
Advertisement