पतंजली आणि रीवा येथील अवधेश प्रताप सिंह विद्यापीठामध्ये सामंजस्य करार, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, इंटर्नशिप अन् फील्ड वर्कची संधी मिळणार
Madhya Pradesh News: मध्य प्रदेशमध्ये रीवा येथील विद्यापीठ आणि पतंजली योगपीठ यांच्यात योग, आयुर्वेद आणि प्राकृतिक चिकित्सा यातील शिक्षण आणि संशोधनाबद्दल सामंजस्य करार झाला आहे.

Madhya Pradesh News: पतंजली योगपीठ आणि मध्य प्रदेशातील रीवा येथील विद्यापीठ 'अवधेश प्रताप सिंह विद्यापीठ' यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे. दोन्ही संस्था संयुक्तपणे योग, आयुर्वेद, प्राकृतिक चिकित्सा या क्षेत्रात शिक्षण आणि संशोधनाच्या दृष्टीनं काम करणार आहे. दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. याचा उद्देश भारतातील पारंपरिक ज्ञानाला प्रोत्साहन देणे, संशोधनाला प्रोत्साहन देणे आणि नव्या पिढीला योग आणि आयुर्वेदाचं शिक्षण देणं हे आहे.
पतंजली योगपीठाचे महामंत्री आचार्य बाळकृष्ण यांनी म्हटलं की या सामंजस्य कराराद्वारे दोन्ही संस्था एकत्रितपणे योग, प्राकृतिक चिकित्सा आणि आयुर्वेदाशी संबंधित अभ्यासक्रम सुरु करतील. यासह संयुक्त संशोधनाचे कार्यक्रम, सेमिनार आणि कार्यशाळांचं आयोजन केलं जाईल. दोन्ही संस्थांचे तज्ज्ञ एकमेकांसोबत ज्ञानाचं आदानप्रदान करतील. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, इंटर्नशिप आणि फील्ड वर्कची संधी मिलेल.
पदवी आणि पदविका अभ्यासक्रम सुरु होणार
आचार्य बाळकृष्ण म्हणाले, दोन्ही संस्थांची ग्रंथालयं, प्रयोगशाळा आणि संशोधनाच्या संसाधनांचा सामंजस्य करारामुळं उपयोग केला जाईल. विद्यापीठात प्रमाणपत्र, डिप्लोमा आणि पदवी अभ्यासक्रम सुरु केले जातील. हा सामंजस्य करार भारतीय पारंपरिक ज्ञानाला जागतिक पातळणीवर नेण्याच्या दिशेनं मोठं पाऊल आहे. योग आणि आयुर्वेदाच्या क्षेत्रात नवं संशोधन व्हावं, विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं, असं आचार्य बाळकृष्ण म्हणाले.
अवधेश प्रताप सिंह विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. राजेंद्र कुमार कुरारिया यांनी पतंजली योगपीठ योग आणि आयुर्वेदाच्या जगातील अग्रणी संस्था आहे. त्यांच्या सहकार्यानं विद्यापीठातील विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळेल, संशोधनाचे नवे मार्ग खुले होतील. आम्ही पतंजलीसोबत भारतीय ज्ञान परंपरेला मजबूत करु, असं त्यांनी म्हटलं.
हा सामंजस्य करार दोन्ही संस्थांसाठी मैलाचा दगड ठरेल असं मानला जात आहे. योग, आयुर्वेद आणि प्राकृतिक चिकित्सा क्षेत्रात नव्या शक्यतांचा शोध घेतलाजाईल. हे पाऊल केवळ शिक्षण आणि संशोधनाला प्रोत्साहन देईलच असं नाही तर भारतीय संस्कृती आणि ज्ञान परंपरेला जागतिक मंचावर स्थान देण्यास मदत करेल.
























