MP News: मध्य प्रदेशात शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार, पतंजली कृषी आधारित मॉडेल स्थापन करणार, 'हे' फायदे मिळणार
Madhya Pradesh News: मध्य प्रदेशात मऊगंज जिल्ह्यातील घुरेहटा गावात एक औद्योगिक पार्क विकसित केलं जाणार आहे. याचा उद्देश शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं, रोजगाराच्या संधी निर्माण करणं आणि विकासाला प्रोत्साहन देणं आहे.

Agriculture Model in Madhya Pradesh: मध्य प्रेदशातील मऊंगज जिल्ह्यातील पडीक जमीन आता शेतकऱ्यांसाठी नवी उमेद घेऊन आली आहे. या जमिनीला पतंजली योगपीठच्या सहकार्यानं सुपीक केलं जाईल. यामुळं शेतकरी समृद्ध होईल. विंध्य क्षेत्राच्या विकासाचा नवा अध्याय यामुळं लिहिला जाणार आहे. या महत्त्वाच्या उपक्रमांतर्गत मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला यांनी मऊगंज येथील जमीनीचं रजिस्ट्रेशन पतंजली योगपीठचे महामंत्री आचार्य बाळकृष्ण यांना सोपवलं आहे.
शेतकऱ्यांच्या विकासाचं स्वप्न पूर्ण होणार- बाळकृष्ण
रजिस्ट्री मिळाल्यानंतर आचार्य बाळकृष्ण यांनी या जमिनीची पाहणी केली आणि भविष्यात विकासाच्या योजनांवर विस्तारानं चर्चा केली. मीडियाशी बोलताना आचार्य बाळकृष्ण यांनी म्हटलं की योग बाबा रामदेव यांच्या मार्गदर्शनात पतंजली योगपीठ शेतकऱ्यांचं विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. ते म्हणाले हा प्रकल्प केवळ शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणार नाही तर विंध्य क्षेत्राच्या विकासाला गती देईल.
दरम्यान पतंजलीनं मऊगंज जिल्ह्यातील घुरेहटा गावात एक औद्योगिक पार्क उभारण्याची योजना तयार केली आहे. या पार्कचा उद्देश शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं, रोजगाराच्या संधी निर्माण करणं आणि या भागातील आर्थिक विकासाला प्रोत्साहनं देणं हे आहे. स्थानिक लोकांना शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य विकासाच्या संधी मिळतील.
पर्यावरणपूरक शेतीची संधी मिळेल
या प्रकल्पामुळं विविध प्रकाराच्या पिकांची लागवड केली जाईल, प्रशिक्षण केंद्र, बीज प्रक्रिया केंद्र यासारख्या गोष्टींची स्थापना केली जाईल. यामुळं शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, चांगली अवजारं मिळतील त्यामुळं शेतीची उत्पादकता वाढेल. कीटकनाशकं आणि रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होईल. शेतीचा खर्च कमी होईल, पर्यावरण पूरक शेतीला प्रोत्साहनं मिळेल, असं सांगण्यात आलं.
























