Nitin Gadkari : नितीन गडकरींच्या बागेतील संत्री रामदेवबाबांच्या प्रकल्पात; कृषि क्षेत्रात 6 वेळा डी. लिट पदवीचा ही सांगितला किस्सा!
Nagpur News : माझ्या शेतातील संत्री, मोसंबी, नींबू आणि इतर सर्व फळ पुरवणाच्या प्रयत्न करेल. असे आश्वासन देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Nagpur News : माझा स्वतःचा संत्र्याचा बगीचा आहे. त्यात आम्ही जीवामृतचाही प्रयोग करत आहोत. शिवाय तिथे आम्ही ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करत आहोत. आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक बैलजोडी आहे, ग्रीन हाऊस आहे. आता इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्टरचा ही उपयोग आम्ही करणार आहोत. शिवाय या सगळ्यात मला रुची आहे. त्यामुळे मी जास्त करून शेतकरी, शेती आणि त्या संबंधित क्षेत्रामध्ये काम करतो.
रामदेव बाबाजी तुमच्या आशीर्वादाने मला वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये 11 डॉक्टरेट पदवी मिळाली आहे आणि त्यातील 6 डिलीट मानद पदवी मला शेती या क्षेत्रासाठी मिळाली आहे. त्यामुळे मी बॅकअपमध्ये आपल्या पतंजली फूड अँड हर्बल पार्क (Patanjali Food and Herbal Park) प्रकल्पाला सर्वतोपरी मदत करेल. शिवाय माझ्या शेतातील संत्री, मोसंबी, नींबू आणि इतर सर्व फळ पुरवणाच्या प्रयत्न ही करेल. असे आश्वासन देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पतंजलीच्या नागपुरातील (Nagpur News) फुड आणि पार्क पार्कच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
वर्धातील ड्राय पोर्ट निर्मितीमुळे बांगलादेशला डायरेक्ट संत्र्याची निर्यात- नितीन गडकरी
विदर्भाची संत्री बांगलादेश येथे निर्यात केली जातात. पण बांगलादेशच्या सरकारने या निर्यातीवर 85% ड्युटी लागू केली आहे. त्यामुळे लॉजिस्टिक खर्च वाढतो आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधानांसोबत मी या संदर्भात बोललो असता, मी ड्युटी कमी करायला तयार आहे, व्याजची ड्युटी तुम्ही कमी करा, असे ते म्हणाले होते. मात्र अलीकडे आम्ही बांगलादेशसाठी नवी योजना आखली असून नागपूरमध्ये एक प्रकारे आम्ही समुद्र आणला आहे. वर्धात ड्राय पोर्टची निर्मिती केली आहे. त्यातून डायरेक्ट संत्री ही बंगालच्या हल्दीयाला जाईल आणि तिथून मग ती बांगलादेशला पोहोचेल. त्यामुळे लॉजिस्टिक कॉस्ट कमी होऊन विदर्भाच्या शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळेल, असा आमचा प्रयत्न असल्याचेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
स्पेनमध्ये असताना मी पाहिलं की...
मला फार आनंद होतोय, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. तसेच या योजनांमधून संत्रा निर्यात करण्यासाठी ही प्रोत्साहन दिले. मात्र माझे त्यांना एक आवाहन असेल की, विदर्भाच्या शेतकऱ्यांसाठी बीया आणि कलम या दोन गोष्टी संत्री उत्पादनासाठी फार महत्वाच्या आहेत. जोपर्यंत त्यात बदल केला जात नाही तोपर्यंत संत्र्याच्या उत्पादनामध्ये देखील बदल होणार नाही. त्यासाठी आपल्या ईथे चांगल्या दर्जाच्या संत्र्याची कलम, बियाणे आणि नर्सरी तयार करण्याची आवश्यकता आहे.
रामदेव बाबा यांनी जो पुढाकार घेतला आहे तो आमच्यासाठी आणि विदर्भासाठी फार महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना, बेरोजगारांना मोठा दिलासा मिळणार आहे. स्पेनमध्ये असताना मी पाहिलं की, शेतीमध्ये जमीन, जमिनीतील पाण्याचं आणि झाडांच्या पानांचं परीक्षण करणे फार महत्वाचे आहे. शेतकरी या कडे दुर्लक्ष करतात. मात्र आता आम्ही ऍग्रो व्हिजनच्या माध्यमातून या संदर्भातली प्रयोगशाळा खुली करणार आहोत. जेणेकरून शेतकऱ्यांना याबद्दल कल्पना आणि माहिती मिळेल. असेही मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
...तर विदर्भातील शेतकरी नक्कीच सुजलाम सुफलाम होईल- नितीन गडकरी
नागपुरात गेल्या 13 ते 14 वर्षापासून आम्ही ऍग्रो व्हिजन या कार्यक्रमाचे आयोजन करत. त्यात विदर्भ, महाराष्ट्रासह लगतच्या राज्यातील लोक ही येत असतात. यात आम्ही वेगवेगळ्या विषयात 40 सेमिनार घेत असतो. देवेंद्र फडणवीस देखील या कामात सहकार्य करतात. त्यामुळे आगामी काळात विदर्भातील शेतकरी आत्महत्या चे चित्र बदलून विदर्भातील शेतकरी सुजलाम सुफलाम होईल यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचेही नितीन गडकरी म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या























