(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Parsi New Year 2022 : आज आहे पारशी नववर्ष; पारशी समुदायासाठी 'नवरोज'चं महत्त्व काय?
Parsi New Year 2022 : पारशी नवरोजची परंपरा ही तीन हजार वर्षांपासून असल्याचं सांगितलं जातं. पारशी नववर्ष हे इराणी किंवा 'शहनशाही कॅलेंडर' प्रमाणे साजरे केले जाते.
Parsi New Year 2022 : नवरोज (Navroz) हा दिवस पारशी समुदायासाठी अत्यंत महत्वाचा असून आजचा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. या दिवशी पारशी समुदाय नवीन कपडे परिरधान करुन प्रार्थना करतात, समुदायातील इतर लोकांच्या भेटी घेतात, एकमेकांना मिठाईचे वाटप करतात. आजच्या दिवशी पारशी समुदायाकडून ईश्वराची पूजा केली जाते, ईश्वरासमोर मेणबत्ती लावली जाते आणि घरातही आकर्षक लायटिंग केली जाते. आजच्या दिवशी फायर टेम्पल किंवा अग्यारी मध्ये जाऊन आज ईश्वराची पूजा करणं हे पारशी समुदायासाठी पवित्र समजलं जातं.
पारशी नवरोजची परंपरा ही तीन हजार वर्षांपासून असल्याचं सांगितलं जातं. पारशी नववर्ष हे इराणी किंवा 'शहनशाही कॅलेंडर' प्रमाणे साजरे केले जाते. या कॅलेंडरची निर्मिती पर्शियन राजा जमशेद यांने केली होती. नवरोज हा दिवस झोराष्ट्रीयन वर्षाचा पहिला दिवस आहे. ही दिवस म्हणजे पारशी आणि इराणी समुदायामध्ये शांती आणि मैत्रीची भावना वाढवणारा दिवस असतो.
पारशी समाज मूळचा इराण या देशातील. या देशाचे पूर्वीचे नाव म्हणजे पर्शिया, पारशी लोकांचे वास्तव्य असलेला देश. पण चौदाव्या शतकात इराणमध्ये धर्म परिवर्तनाचे वारे सुरु झाले आणि पारशी लोकांवर अत्याचार करण्यात येऊ लागला. त्यामुळे पारशी समुदायाने तो देश सोडला. यापैकी मोठा समुदाय हा भारतात आला आणि मुंबईत वास्तव्य करु लागला.
देशाच्या विकासात पारशी समुदायाचे मोठं योगदान आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून पारशी समुदायाची लोकसंख्या घटत असून ती एक चिंतेची बाब ठरत आहे. त्यांची लोकसंख्या वाढावी म्हणून भारत सरकारने जियो पारशी ही योजना सुरु केली आहे. त्यामुळे पारशी समाजाला भारतीय कायद्याप्रमाणे दोन अपत्यांचं बंधन लागू होत नाही.
महत्वाच्या बातम्या :