एक्स्प्लोर
पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार आदर्श परीक्षेचे धडे
परीक्षेच्या वेळी तणावाला कसं सामोर जायचं यासंदर्भात ते मार्गदर्शन करणार आहेत.
नवी दिल्ली : 'मन की बात' नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता 'परीक्षा पे चर्चा' या क्रार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. परीक्षेच्या वेळी तणावाला कसं सामोर जायचं यासंदर्भात ते मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या वर्षी देखील मोदींनी 'परिक्षा पे चर्चा'कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता.
या कार्यक्रमाअंतर्गत पंतप्रधान मोदी मंगळवारी(ता.29) देशभरातून निवडलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी महाराष्ट्रातून 106 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. परिक्षेचा ताण हलका करण्यासाठी काय करायला हवं यावर ते बोलणार आहेत.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शाळांतून हे 106 विद्यार्थी निवडण्यात आले आहेत. एका स्पर्धेद्वारे ही निवड करण्यात आल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं.
गेल्या वर्षी देखील पंंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना अशाच प्रकारे मार्गदर्शन केले होते. त्यावेळी फक्त दिल्लीच्या विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी होती. मात्र यावर्षी देशभरातून विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेक. तसेच विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांसोबतही यंदा पंतप्रधान संवाद साधणार आहेत.
व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement