एक्स्प्लोर

Pariksha Pe Charcha 2023 : वेळेच्या व्यवस्थापनासाठी आईचे उदाहरण...परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान मोदींकडून विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्र

Pariksha Pe Charcha 2023 : 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाच्या सहाव्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण टाळण्याचा सल्ला दिला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींकडून विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्र दिला.

Pariksha Pe Charcha 2023 : 'परीक्षा पे चर्चा' (Pariksha Pe Charcha) या कार्यक्रमाच्या सहाव्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (27 जानेवारी) देशभरातील विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण टाळण्याचा सल्ला दिला. तालकटोरा इथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी देशभरातील विविध ठिकाणच्या विद्यार्थ्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी ऐकल्या, त्यांना सल्ला दिला. ते म्हणाले की, सर्व मुलांनी परीक्षेची वेळेत तयारी करावी जेणेकरुन शेवटच्या क्षणी येणारा ताण टाळता येईल. जाणून घ्या पीएम मोदींच्या कार्यक्रमातील ठळक मुद्दे...

पीएम मोदींनी परीक्षेच्या ताणावर मंत्र सुचवले

मदुराई केंद्रीय विद्यालयाची विद्यार्थिनी अश्विनी हिने पंतप्रधानांना परीक्षेचा ताण, परीक्षेचे दडपण आणि परीक्षेत जास्त गुण मिळवण्याचा दबाव यावर प्रश्न विचारला. तसंच इतर विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना विचारले की, परीक्षेत चांगले गुण मिळाले नाहीत, तर कुटुंबाच्या दबावाला कसे सामोरे जायचे? यावर पंतप्रधानांनी उत्तर दिलं की जसे क्रिकेटमध्ये गुगली म्हणजे लक्ष्य एक आणि दिशा वेगळी. तुम्ही मला पहिल्याच चेंडूवर बाद करु इच्छिता, असा टोला पंतप्रधानांनी लगावला.

सामाजिक स्थितीचा उल्लेख

कुटुंबातील सदस्यांना तुमच्याकडून अपेक्षा असणे अत्यंत स्वाभाविक आहे आणि त्यात गैर काहीच नाही, असं उत्तर पंतप्रधानांनी दिले. सामाजिक स्थितीमुळे कुटुंबातील सदस्य अपेक्षा करत असतील, तर ही चिंतेची बाब असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं असलं तरी समाजात गेल्यावर मुलांबद्दल काय सांगणार असा विचार पालकांच्या मनात येतो, काहीवेळा विद्यार्थ्यांची स्थिती माहित असूनही, त्यांची सामाजिक स्थिती लक्षात घेऊन पालक समाजात मुलांबद्दल मोठमोठ्या गोष्टी सांगतात आणि मग घरी येऊन मुलांकडून तशीच अपेक्षा करतात. अशा परिस्थितीत मुलांवर सतत चांगले आणि चांगले गुण मिळवण्याचा दबाव निर्माण होतो.

अभ्यासावर लक्ष केंद्रित करा

विद्यार्थ्यांनीही त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि कोणत्याही दबावाखाली येऊ नये, असं पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्लाही दिला. ते म्हणाले की तुमची क्षमता खूप जास्त आहे आणि तुम्ही स्वतःचे योग्य मूल्यमापन करु शकत नाही असं नाही. पालकांनी मुलांवर अभ्यासासाठी जास्त दबाव टाकू नये, पण मुलांना त्यांच्यातील क्षमता कमी पडू देऊ नये, असं ते म्हणाले.

वेळेचे व्यवस्थापन करण्याच्या सूचना दिल्या

हिमाचलच्या आरुषी ठाकूरने पंतप्रधानांना विचारले की, परीक्षेदरम्यान अभ्यास कुठून सुरु करायचा हे स्पष्ट होत नाही, मला अनेकदा असे वाटते की मी अभ्यास केलेलं सर्व काही विसरले आहे. इतर अनेक विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना अभ्यास आणि परीक्षेच्या तयारीसाठी वेळ व्यवस्थापनाबाबत प्रश्न विचारले. केवळ परीक्षेपुरतेच नाही तर आयुष्यातही वेळेच्या व्यवस्थापनाचं भान ठेवायला हवं, असे पंतप्रधान म्हणाले. जे काम करायचे होते ते योग्य वेळी न केल्याने अनेकदा कामांचा ढीग पडतो, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं.

वेळ शेअर करा

कोणत्या विषयाचा अभ्यास किती दिवस आणि केव्हा करायचा आहे, याचं विश्लेषण करण्याचा सल्ला पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दिला. ते म्हणाले की, आपल्याला आवडणाऱ्या किंवा माहित असलेल्या विषयांमध्ये आपण जास्त वेळ घालवतो आणि त्यातच गुंतून जातो. ते म्हणाले की, ज्या विषयात तुम्हाला अडचण येते, तो विषय आधी नव्याने वाचण्याचा प्रयत्न करा. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना सांगितलं की, जर तुम्ही तुमच्या आईची घरातील कामाची शैली पाहिली तर तिच्याकडूनही तुम्ही वेळेचं नियोजन आणि व्यवस्थापन शिकू शकता. त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळेचं योग्य वाटप करण्याचं सांगितलं.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
सैफ अली खानवर चाकू हल्ला, गृहविभाग काम करतोय का? वर्षा गायकवाड यांचा थेट सवाल
एखादी व्यक्ती घरात घुसते चाकू हल्ला करते, कायदा सुव्यवस्था कुठेय? वर्षा गायकवाडांचा सवाल
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Saif ALi Khan : सैफ अली खानवर चाकू हल्ला, सुप्रिया सुळेंचा करिश्मा कपूरला फोनSaif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रमDhananjay Deshmukh : धनंजय देशमुख अंतरवाली सराटीत, मनोज जरांगेंच्या भेटीचं कारण काय?Top 70 at 07 AM Superfast 7AM 16 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
सैफ अली खानवर चाकू हल्ला, गृहविभाग काम करतोय का? वर्षा गायकवाड यांचा थेट सवाल
एखादी व्यक्ती घरात घुसते चाकू हल्ला करते, कायदा सुव्यवस्था कुठेय? वर्षा गायकवाडांचा सवाल
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
Saif Ali Khan Attacked in Mumbai: सैफ अली खानवर मुंबईत चोराकडून धारदार शस्त्राने वार; सुप्रिया सुळेंनी पुण्यातून लगेच फोन फिरवला, म्हणाल्या....
सैफ अली खानवर मुंबईत चोराकडून धारदार शस्त्राने वार; सुप्रिया सुळेंनी पुण्यातून लगेच फोन फिरवला, म्हणाल्या....
PM Kisan : पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2000 कधी येणार?शेतकऱ्यांचं लक्ष लागलं
पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2 हजार कधी येणार,शेतकऱ्यांचं लक्ष लागलं
Nagpur News : महसूल विभागाकडून जात प्रमाणपत्र देण्यास विलंब! पारधी समाजावर मुलींचे लग्न बालवयात लावण्याची दुर्दैवी वेळ, मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील धक्कादायक प्रकार
महसूल विभागाकडून जात प्रमाणपत्र देण्यास विलंब! पारधी समाजावर मुलींचे लग्न बालवयात लावण्याची दुर्दैवी वेळ, मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील धक्कादायक प्रकार
Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Embed widget