रेमल चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास लांबणीवर पडणार का ? महाराष्ट्रात मान्सून कधी येणार? डखांचा अंदाज काय?
येत्या तीन ते चार दिवसात मान्सूनचे केरळमध्ये आगमन होणार आहे. रेमल चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास लांबणीवर पडणार का ? महाराष्ट्रात मान्सून कधी येणार? याबाबतची माहिती पंजाबराव डख यांनी दिलीय.
Remal Cyclone Monsoon News : देशातील हवामानात सातत्यानं बदल (Climate Chnage) होत आहे. देशात मान्सूनसाठी (Monsoon) पोषक वातावरण तयार होत आहे. मान्सूनचे भारताच्या (India) मुख्य भूमीत म्हणजेच केरळमध्ये (Keral) 31 मेला आगमन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूर हवामान विभागाचे संचालक मोहन शाहू यांनी येत्या तीन ते चार दिवसात मान्सूनचे केरळमध्ये आगमन होणार असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, रेमल चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास लांबणीवर पडणार का ? महाराष्ट्रात मान्सून कधी येणार? याबाबतची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिली आहे.
7 जूनला मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होणार
दरम्यान, 31 मे पर्यंत मान्सून केरळात येणार आहे. दरवर्षी मान्सूनचे केरळमध्ये एक जूनला आगमन होत असते. यंदा मात्र एक दिवस आधीच केरळात मान्सून दस्तक देणार असे चित्र तयार होत आहे. केरळमध्ये मान्सून आगमन झाल्यानंतर साधारणता एक आठवड्याने आपल्या महाराष्ट्रात मान्सून दाखल होत असतो. दरवर्षी 7 जुनच्या सुमारास महाराष्ट्राच्या मुख्य भूमीत अर्थात तळ कोकणात मान्सूनचे आगमन होते. यंदा देखील सात जूनच्या सुमारास महाराष्ट्रात मान्सून आगमनाची शक्यता आहे. तळकोकणात दाखल झाल्यानंतर मान्सून 11 जूनच्या सुमारास मुंबईला पोहचणार आहे आणि पुढे 15 जूनच्या आसपास संपूर्ण महाराष्ट्र काबीज करेल अशी शक्यता असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे. त्यामुळं रेमल वादळाचा मान्सूनवर काही परिणाम होण्याची शक्यता दिसत नाही. कारण दिलेल्या अंदाजानुसार मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
31 मे रोजी केरळमध्ये दाखल होणार
सध्या देशातील वातावरणात बदल होत आहे. मान्सूनसाठी पोषक वातावरण होत आहे. रेमल चक्रीवादळाचा मान्सूनवर परिणाम होणार का ? असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र, सध्या तशी परिस्थिती दिसत नाही. मान्सून 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होणार आहे. तर सात जून रोजी महाराष्ट्रात येणार आहे. या वर्षाच्या प्रारंभी कटिबंधीय प्रशांत क्षेत्राच्या वर आढळलेली भक्कम एल निनो स्थिती अतिशय वेगाने कमकुवत होत जाऊन कमकुवत एल निनोमध्ये रुपांतरित झाली आहे आणि सध्या एनसो तटस्थ स्थितीत संक्रमित होत आहे. मान्सून हंगामाच्या प्रारंभी एनसो तटस्थ स्थिती प्रस्थापित होणार असल्याचे आणि मान्सून हंगामाच्या नंतरच्या काळात ला निना स्थिती विकसित होण्याची शक्यता ताज्या हवामान भाकिताच्या मॉडेलमधून सूचित होत आहे. दरम्यान, जुलै महिन्याच्या पाऊसमानाचा आगाऊ अंदाज हवामान खात्याकडून जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जारी करण्यात येणार असल्याची माहिती देखील हवामान विभागानं दिली आहे. .
महत्वाच्या बातम्या:
दिलासादायक! मान्सूनचा अद्ययावत दीर्घकालीन अंदाज जाहीर, देशात कसं असणार पाऊसमान?