...तर तुमचे पॅन कार्ड होईल बाद, पाहा आयकर विभागानं का घेतलाय हा निर्णय?
Aadhaar Card and Pan Card Link: आयटीआर (ITR)फाइल करण्यापासून बँकेच्या महत्वाच्या कामासाठी पॅन कार्ड (PAN Card) अनिवार्य आहे.
Aadhaar Card and Pan Card Link: आयटीआर (ITR)फाइल करण्यापासून बँकेच्या महत्वाच्या कामासाठी पॅन कार्ड (PAN Card) अनिवार्य आहे. त्याशिवाय अन्य आर्थिक कामांसाठीही पॅनकार्ड महत्वाचं आहे. त्याशिवाय आधार कार्डचा वापर त्या व्यक्तीची ओळख म्हणून केला जातो. आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही सध्याच्या काळात सर्वात महत्त्वाची कागदपत्रे आहेत. जवळपास प्रत्येक सरकारी सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला याचा वापर होतो. अशातच आयकर विभागानं (Income Tax Department) पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी पुन्हा एकदा डेडलाईन दिली आहे. 31 मार्च 2023 पर्यंत आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत देण्यात आली आहे. जर 31 मार्च 2023 पर्यंत आधार आणि पॅन लिंक न केल्यास कारवाई करण्यात येईल, असं सांगण्यात आले आहे.
आयकर कायदा, 1961 नुसार, सर्व पॅनधारकांसाठी आधार लिंक करणे बंधनकारक आहे. हे काम 31 मार्च 2023 पूर्वी करा. अन्यथा 1 एप्रिल 2023 पासून तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल. त्याला बाद करण्यात येईल, असं आयकर विभागानं शनिवारी सांगितलं आहे. सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे सक्तीचे केले आहे. तुम्ही पॅन आणि आधार एकमेकांशी लिंक न केल्यास तुमचा पॅन अवैध मानला जाईल. अशा स्थितीत तुम्हाला मोठा दंडही ठोठावला जाईल. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, 31 मार्च 2023 पर्यंत पॅन-आधार लिंक करणे अनिवार्य आहे. त्यापूर्वी, लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करा. 31 मार्च 2023 पर्यंत पॅन कार्ड लिंक न केल्यास ते रद्द मानले जाईल. याचा अर्थ तुम्ही ते कोणत्याही आर्थिक व्यवहारात किंवा इतर कामात पुन्हा वापरू शकणार नाही. आयटी रिटर्न भरण्यापासून ते रिफंड जारी करण्यापर्यंत तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागेल. तसेच बँकिंग आणि इतर कामे करू शकणार नाहीत. .
असे करा पॅन आणि आधार ऑनलाइन लिंक
1. पॅन-आधार (Aadhaar-PAN) लिंक करण्यासाठी आयकर ई-फायलिंग वेबसाइटला भेट द्या.
2. साइटच्या डाव्या बाजूला तुम्हाला Quick Links चा पर्याय मिळेल. येथे तुम्हाला 'Link Aadhaar' पर्यायावर क्लिक करावे लागेल.
3. येथे तुम्हाला तुमचा पॅन (PAN), आधार क्रमांक आणि नाव टाकावे लागेल.
4. ही माहिती दिल्यानंतर, तुम्हाला एक OTP पाठवला जाईल. ओटीपी टाकल्यानंतर, तुमचा आधार आणि पॅन लिंक होईल.