एक्स्प्लोर

PAN-Aadhaar Card Link : Pan Card ला Aadhar Card लिंक करण्यासाठी लेटलतिफांची झुंबड; आयकर विभागाची वेबसाईट क्रॅश

PAN-Aadhaar Card Linking : आज, म्हणजेच 31 मार्चपर्यंत Pan Card ला Aadhar Card लिंक न केल्यास 1 एप्रिलपासून तुमचे Pan Card बंद होणार आहे. नंतर जर आधार लिंक करायचे असेल तर एक हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

मुंबई : Pan Card आणि  Aadhar Card लिंक करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस असून 31 मार्चपर्यंत Pan Card ला  Aadhar Card लिंक केलं नाही तर तुमचे Pan Card बंद पडणार आहे. केंद्र सरकारने आता पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक असल्याचं स्पष्ट केलंय. एवढंच नाही तर आयकर कायद्याच्या नियमानुसार, या काळात जर आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक न केल्यास तुम्हाला एक हजार रुपयांपर्यंत दंड द्यावा लागेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. परंतु, पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे आयकर विभागाच्या साईटवर अनेकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आयकर विभागाची वेबसाईट क्रॅश झाली आहे. यासंदर्भात अनेकांनी सोशल मीडियावर तक्रारही केली आहे. 

1 एप्रिल 2019 रोजी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य करण्यात आलं. गेल्या तीन वर्षांपासून आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याविषयी सांगितलं जात आहे. कित्येकवेळा मुदत वाढही देण्यात आली आहे. अनेकदा केंद्र सरकारनंही पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. या आधीही सरकारन पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्यासाठी अनेकदा मुदत वाढवली होती. गेल्या आठवड्यात लोकसभेत या संबंधी अर्थ विधेयक, 2021 पारित करण्यात आलं आहे. त्यानुसार आता नागरिकांनी आपल्या पॅन कार्डला आधार लिंक केलं नाही तर एक हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. अशातच अनेकदा मुदत वाढ देऊनही अनेक जण अगदी शेवटच्या दिवशी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी सरसावले आहेत. याचाच परिणाम म्हणून एकाच वेळी अनेकांनी आयकर विभागाच्या वेबसाईटवर गर्दी केल्यामुळे वेबसाईट क्रॅश झाली आहे. 

पॅन आणि आधार लिंक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सर्व्हरमध्ये अडचण असल्याचं, साईट सुरु होऊ शकत नाही असे संदेश स्क्रीनवर दिसत आहेत. अनेकांनी यासंदर्भातील स्क्रीनशॉर्ट शेअर करत आता साईटच बंद असल्यावर आम्ही हे काम आजच्या आज कसं करायचं असा प्रश्न प्रशासनाला विचारला आहे. आयकर विभागाच्या ट्विटर हॅण्डलसोबतच अनेकांनी युआयडी म्हणजेच आधारच्या ट्विटर हॅण्डलला टॅग करुनही हे प्रश्न उपस्थित केले आहेत. अनेकांनी एकाच वेळी केलेल्या या तक्रारींमुळेच PANcard आणि Aadhaar हे दोन विषय ट्विटरवर टॉप ट्रेण्डमध्ये आलेत.

गृह कर्ज ईएमआय कॅल्क्युलेट

इतर सुविधांपासून राहणार वंचित

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड  (CBDT) ने स्पष्ट केलंय की नागरिकांना त्यांना दिलेल्या वेळेच्या आत त्यांचे पॅन कार्ड आधारशी लिंक करावं. असं केलं नाही तर संबंधित पॅन कार्ड बंद होईल. त्यामुळे अनेक आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत. तसेच बँक खाते उघडणे, बँकांचे व्यवहार, सरकारी पेन्शन, एलपीजी सब्सिडी, स्कॉलरशीप अशी अनेक सुविधांपासून वंचित रहावं लागेल. 

खाजगी कर्ज ईएमआय कॅल्क्युलेट

आपल्या पॅन कार्डला आधारशी लिंक खालील प्रकारे करता येईल.

1. आयकर ई-फायलिंग वेवसाइट
2.567678 किंवा 56161 या नंबरला sms करून. 

जर मोबाईलच्या माध्यमातून लिंक करायचं असेल तर आपल्या मोबाईल नंबरवर UIDPAN <12-digit Aadhaar> <10-digit PAN> टाइप करा आणि  567678 किंवा 561561 या नंबरवर sms पाठवा. 

वाहन कर्ज ईएमआय कॅल्क्युलेट

ऑनलाइन पद्धतीने लिंक करता येईल

1. आयकरच्या वेबसाइटला https://incometaxindiaefiling.gov.in भेट द्या. 
2. त्यामध्ये पॅनला आधार लिंक करण्याचा  पर्याय समोर येईल. तो क्लिक केल्यानंतर एक फॉर्म समोर येईल. 
3. त्यावर तुमचा पॅन क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक टाकावा. तसेच इतर व्यक्तिगत माहिती भरावी लागेल. 
4.त्यावेळी तुम्हाला एक ओटीटी क्रमांक येईल. तो ओटीटी क्रमांक भरल्यानंतर लिंक आधार असा पर्याय समोर दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पॅन कार्डला आधार कार्ड लिंक होईल. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Pan Card ला  Aadhar Card लिंक करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस, अन्यथा तुमचे Pan Card होणार बंद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेच्या मृतदेहाची अवहेलना होतेय, दफनभूमी कोणाच्या मालकीची नाही; पालकांची उच्च न्यायालयात धाव
मुलाच्या दफविधीसाठी जागा मिळेना, मृतदेहाची अवहेलना होत असल्याचा आरोप, अक्षय शिंदेच्या पालकांची उच्च न्यायालयात धाव
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

एबीपी माझा मराठी हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 27 September 2024Raj Thackeray Vidarbh Duara : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मिशन विदर्भ,  दोन दिवस अमरावतीतSanjay Raut Medha Somaiya Special Report : संजय राऊत यांची पुन्हा एकदा जेलवारी? प्रकरण काय?MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेच्या मृतदेहाची अवहेलना होतेय, दफनभूमी कोणाच्या मालकीची नाही; पालकांची उच्च न्यायालयात धाव
मुलाच्या दफविधीसाठी जागा मिळेना, मृतदेहाची अवहेलना होत असल्याचा आरोप, अक्षय शिंदेच्या पालकांची उच्च न्यायालयात धाव
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
Embed widget