PAN Card Aadhaar Link Deadline: Pan Card ला Aadhar Card लिंक करण्यासाठी मुदतवाढ; आयकर विभागाचा निर्णय
PAN-Aadhaar Card Linking : Pan Card आणि Aadhar Card लिंक करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी आज, म्हणजेच 31 मार्च 2021 ही अखेरची मुदत होती.
मुंबई : Pan Card आणि Aadhar Card लिंक करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे मुदतवाढ देण्यात आल्याचं ट्वीट आयकर विभागाने केलं आहे. आता 30 एप्रिल 2021 पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्र सरकारने पॅनकार्डला आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक असल्याचं स्पष्ट केलंय. एवढंच नाही तर आयकर कायद्याच्या नियमानुसार, या काळात जर आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक न केल्यास तुम्हाला एक हजार रुपयांपर्यंत दंड द्यावा लागेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान, पॅनकार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे आयकर विभागाच्या साईटवर अनेकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आयकर विभागाची वेबसाईट क्रॅश झाली.
1 एप्रिल 2019 रोजी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य करण्यात आलं. गेल्या तीन वर्षांपासून आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याविषयी सांगितलं जात आहे. कित्येकवेळा मुदत वाढही देण्यात आली आहे. अनेकदा केंद्र सरकारनंही पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. या आधीही सरकारन पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्यासाठी अनेकदा मुदत वाढवली होती. गेल्या आठवड्यात लोकसभेत या संबंधी अर्थ विधेयक, 2021 पारित करण्यात आलं आहे. त्यानुसार आता नागरिकांनी आपल्या पॅन कार्डला आधार लिंक केलं नाही तर एक हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. अशातच अनेकदा मुदत वाढ देऊनही अनेकजण अगदी शेवटच्या दिवशी पॅनकार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी सरसावले आहेत. याचाच परिणाम म्हणून एकाच वेळी अनेकांनी आयकर विभागाच्या वेबसाईटवर गर्दी केल्यामुळे वेबसाईट क्रॅश झाली आहे.
Central Government extends the last date for linking of Aadhaar number with PAN from 31st March, 2021 to 30th June, 2021, in view of the difficulties arising out of the COVID-19 pandemic.(1/2)@nsitharamanoffc@Anurag_Office@FinMinIndia
— Income Tax India (@IncomeTaxIndia) March 31, 2021
पॅन आणि आधार लिंक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सर्व्हरमध्ये अडचण असल्याचं, साईट सुरु होऊ शकत नाही असे संदेश स्क्रीनवर दिसत आहेत. अनेकांनी यासंदर्भातील स्क्रीनशॉर्ट शेअर करत आता साईटच बंद असल्यावर आम्ही हे काम आजच्या आज कसं करायचं असा प्रश्न प्रशासनाला विचारला आहे. आयकर विभागाच्या ट्विटर हॅण्डलसोबतच अनेकांनी युआयडी म्हणजेच आधारच्या ट्विटर हॅण्डलला टॅग करुनही हे प्रश्न उपस्थित केले आहेत. अनेकांनी एकाच वेळी केलेल्या या तक्रारींमुळेच PANcard आणि Aadhaar हे दोन विषय ट्विटरवर टॉप ट्रेण्डमध्ये आलेत.
आपल्या पॅन कार्डला आधारशी लिंक खालील प्रकारे करता येईल.
1. आयकर ई-फायलिंग वेवसाइट
2.567678 किंवा 56161 या नंबरला sms करून.
जर मोबाईलच्या माध्यमातून लिंक करायचं असेल तर आपल्या मोबाईल नंबरवर UIDPAN <12-digit Aadhaar> <10-digit PAN> टाइप करा आणि 567678 किंवा 561561 या नंबरवर sms पाठवा.
ऑनलाइन पद्धतीने लिंक करता येईल1. आयकरच्या वेबसाइटला https://incometaxindiaefiling.gov.in भेट द्या.
2. त्यामध्ये पॅनला आधार लिंक करण्याचा पर्याय समोर येईल. तो क्लिक केल्यानंतर एक फॉर्म समोर येईल.
3. त्यावर तुमचा पॅन क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक टाकावा. तसेच इतर व्यक्तिगत माहिती भरावी लागेल.
4.त्यावेळी तुम्हाला एक ओटीटी क्रमांक येईल. तो ओटीटी क्रमांक भरल्यानंतर लिंक आधार असा पर्याय समोर दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पॅन कार्डला आधार कार्ड लिंक होईल.