एक्स्प्लोर

पलानीसामी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रं, दोन महिन्यातील तिसरे मुख्यमंत्री

चेन्नई : ईके पलानीसामी यांनी आज तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासह एकूण 30 मंत्र्यांना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. पलानीसामी हे गेल्या दोन महिन्यातील तामिळनाडूतले तिसरे मुख्यमंत्री आहेत. एआयडीएमकेच्या आमदारांनी त्यांची सभागृह नेतेपदी निवड केल्यानंतर, पलानीसामी यांनी राज्यपाल सी.विद्यासागर राव यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. यानंतर त्यांना राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापन करण्याचं आमंत्रण देऊन, दुपारी चार वाजता पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आता पलानीसामी यांना येत्या 15 दिवसात बहुमत सिद्ध करायचं आहे. दरम्यान, यासर्व प्रकरणावर तामिळनाडूच्या राजकीय मैदानातील वादळ तुर्तास क्षमले असले, तरी पन्नीरसेल्वम यांच्या भूमिकेवरही अजून अनेकांचं लक्ष लागून आहे. जयललितांच्या समाधीवर शशिकला यांनी तीन वेळा थाप का मारली? उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शशिकला यांना चार वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर शशिकला यांनी ओ पन्नीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी करुन, निकटवर्तीय पलानीसामी यांची विधीमंडळ नेते म्हणून निवड केली. https://twitter.com/Madrassan/status/832120649971675136 पलानीसामी आज सकाळी साडे अकरा वाजता राज्यपाल सी विद्यासागर राव यांना भेटण्यासाठी गेले होते. यानंतर राज्यपालांनी पलानीसामी यांना 15 दिवसात सरकार स्थापन करण्याठी आमंत्रण दिलं. पलानीसामी यांच्यासोबत एआयएडीएमकेचे वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. आत्मसमर्पणाआधी शशिकला अम्मांच्या समाधी स्थळावर मुख्यमंत्रीपदासाठी पन्नीरसेल्वम आणि पलानीसामींचाही दावा दरम्यान, शशिकला नटराजन यांचे निकटवर्तीय असलेले पलानीसामी यांनी कालही (बुधवार) राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेसाठी दावा होता. त्यानंतर शशिकला यांच्याविरोधात बंड करणारे पन्नीरसेल्वम यांनीही राजभवनात जाऊन मुख्यमंत्रीपदासाठी दावेदारी सादर केली. https://twitter.com/ANI_news/status/832118627725778944 शशिकला गटाचं पारडं जड खरंतर दोन्ही पक्षांकडून दावा केला जात आहे. परंतु आकड्यानुसार सध्या तरी शशिकला गटाचं पारडं जड दिसत आहे. तामिळनाडू विधानसभेत एकूण 235 जागा आहेत. सध्या एआयएडीएमके पक्षाकडे एकूण 134  आमदार आहेत. डीएमकेचे 89 आणि उर्वरित जागा काँग्रेससह इतर पक्षांकडे आहेत. शशिकलांना मोठा धक्का, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी 4 वर्षांचा तुरुंगवास जागांची आकडेवारी शशिकला गटाच्या पलानीसामी यांना 134 पैकी 120 आमदारांचं समर्थन आहे. तर  पन्नीरसेल्वम यांना सुमारे 14 आमदार आणि दहा खासदारांचा पाठिंबा आहे. पन्नीरसेल्वम यांना फार आमदारांचं समर्थन मिळालेलं नाही. पण विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं तर तयार असल्याचं पन्नीरसेल्वम वारंवार बोलत आहेत. पनीरसेल्वम यांची हकालपट्टी,पलनीसामी विधीमंडळ नेतेपदी दरम्यान, अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी एका आठवड्यात विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावून बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगितलं आहे. दोन्ही गट दावा करत आहेत, पण राज्यपालांनी अजूनही पत्ते उघडलेले नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या

Weather Update: सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
Sharad Pawar Camp and BJP: मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये जयंत पाटील-विनोद तावडेंची गुप्त भेट, दिल्लीतली बैठक संपल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
जयंत पाटील-विनोद तावडेंची मुंबईत गुप्त भेट, दिल्लीतली बैठक संपल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Building collapses in Moshi Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
Devendra Fadnavis: पैसे घेऊन सोशल मीडीयावर शिव्या देतात; मिसिंग लिंक टीकेवरुन फडणवीसांचा ट्रोलर्संना पलटवार, नाशिक ढगफुटीवरही बोलले
पैसे घेऊन सोशल मीडीयावर शिव्या देतात; मिसिंग लिंक टीकेवरुन फडणवीसांचा ट्रोलर्संना पलटवार, नाशिक ढगफुटीवरही बोलले
Weather Update: सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
सुरतच्या रस्त्यांवर गाड्या तरंगू लागल्या, फ्लाय ओव्हर सुद्धा तुंबले, दिल्ली-जयपूर महामार्ग सुद्धा खचला, 10 किमी वाहतूक कोंडी
Share Market Crash :  डोनाल्ड ट्रम्प यांनी एक घोषणा करताच भारतीय शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले
डोनाल्ड ट्रम्प यांनी एक घोषणा करताच भारतीय शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
Chandrashekhar Bawankule: राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
Embed widget