Javeria Khanum: आणखी एक 'बॉर्डर' लव्ह स्टोरी: पाकिस्तानी महिला भारतात दाखल
Javeria Khanum: जवेरिया खानम ही पाकिस्तानमधील तरुणी भारतातील एका तरुणासोबत लग्न करण्यासाठी भारतात आली आहे. कोण आहे जवेरिया खानम? याबद्दल जाणून घेऊयात...
Javeria Khanum: गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमधून (Pakistan) भारतात आलेल्या सीमा हैदरची (Seema Haider) सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. पाकिस्तानची सीमा आणि भारतामधला सचिन यांच्या लव्ह स्टोरीनं जगभरातील लोकांचे लक्ष वेधले होते. सीमा आणि सचिन यांच्या कथेवर आधारित एक चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता सीमाप्रमाणेच जवेरिया खानम ही पाकिस्तानमधील तरुणी भारतात आली आहे. ती तरुणी भारतातील एका तरुणासोबत लग्न करण्यासाठी भारतात आली आहे. कोण आहे जवेरिया खानम? याबद्दल जाणून घेऊयात...
कोण आहे जवेरिया खानम? (Who Is Javeria Khanum)
जवेरिया खानम ही कराची येथील रहिवासी अजमत इस्माईल खान यांची मुलगी आहे. ती भारतातील कलकत्ता येथे राहणाऱ्या समीर खानसोबत गेल्या 5 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती. जवेरियाला भारतीय गाण्यांची खूप आवड आहे, तिने गायलेले मोह-मोह के धागे हे गाणे सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. जवेरिया ही 45 दिवसांच्या व्हिसावर भारतात आली आहे.
आईच्या मोबाईलमध्ये फोटो पाहिल्यानंतर जवेरियाच्या प्रेमात पडला समीर (Javeria Khanum And Sameer Khan Love Story)
माध्यमांसोबत बोलताना समीर खानने सांगितले की, जवेरिया आणि त्याची प्रेमकहाणी 2018 मध्ये सुरू झाली. तो म्हणाला, "मी 2018 मध्ये जर्मनीहून घरी आलो होतो. तेव्हा मी माझ्या आईच्या मोबाईलमध्ये जावेरियाचा फोटो पाहिला. ती मला आवडली. तेव्हा मी माझ्या आईला सांगितले की, मला जवेरियाशी लग्न करायचे आहे. हे ऐकून माझ्या आईला आनंद झाला."
जवेरियाचं भारतात असं झालं स्वागत
जवेरिया ही मंगळवारी (5 डिसेंबर 2023) अटारी सीमेवरून भारतात आली, जिथे जवेरियाचा होणारा पती समीर खान आणि तिचे होणारे सासरे अहमद कमाल खान युसूफझाई हे तिच्या स्वागतासाठी उपस्थित होते. अटारी सीमेवर ढोल वाजवून जवेरियाचं स्वागत केलं. तसेच जवेरियाला फुलांचा गुच्छ देखील देण्यात आला.
#WATCH | Amritsar, Punjab: A Pakistani woman, Javeria Khanum arrived in India (at the Attari-Wagah border) to marry her fiancé Sameer Khan, a Kolkata resident. She was welcomed in India to the beats of 'dhol'.
— ANI (@ANI) December 5, 2023
She says, "I am extremely happy...I want to convey my special thanks… pic.twitter.com/E0U00TIYMX
जवेरिया आणि समीर कधी करणार लग्न? (Javeria Khanum And Sameer Khan Marriage)
भारतात आल्यानंतर जवेरिया खानमने पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा तिने सांगितले की,"दोन्ही कुटुंबांच्या संमतीने मी आणि समीर जानेवारी 2024 च्या पहिल्या आठवड्यात भारतात एकमेकांशी लग्न करणार आहोत."
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: