एक्स्प्लोर
पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताचे दोन जवान शहीद
नवी दिल्ली: पाकिस्तानकडून आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारातभारताचे दोन जवानही शहीद झाले.
ज्यावेळी भारतीय जवान सीमारेषेवर गस्त घालत होते त्याचवेळी अचानक पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. यामध्ये दोन जवान शहीद झाले.
काश्मीरमध्ये हिजबुलच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा
दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या बडगाव येथे काल रात्री झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांना मोठं यश मिळालं. त्यांनी हिजबुल मुजाहिदीनच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. या चकमकीनंतर इतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशनही सुरु करण्यात आलं होतं.
अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला, 7 भाविकांचा मृत्यू
सोमवारी अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. ज्यामध्ये 7 भाविकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर या संपूर्ण परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement