(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांसोबत गळाभेटीचं सिद्धूंकडून समर्थन
गुरु नानक यांच्या 550 व्या प्रकाश पर्वाच्या निमित्ताने करतापूर बॉर्डर खुली ठेवू, असं पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी सांगितलं म्हणून गळाभेट घेतली, असं स्पष्टीकरण सिद्धू यांनी दिलं.
“कुणी तुम्हाला येऊन भेटत असेल आणि म्हणत असेल की आपण समान संस्कृतीशी एकबद्ध आहोत. आम्ही गुरु नानक यांच्या 550 व्या प्रकाश पर्वाच्या निमित्ताने करतापूर बॉर्डर खुली ठेवू… असं ते म्हणत असतील तर मी काय करायला पाहिजे,” असं सिद्धू म्हणाले. इस्लामाबादमध्ये शपथविधी सोहळ्यात सिद्धू यांना पाकव्याप्त काश्मीर (पीओके) ज्याला पाकिस्तानमध्ये आझाद काश्मीर असंही म्हटलं जातं, त्या भागाचे प्रमुख मसूद खान सिद्धू यांच्याशेजारी बसण्यासाठी जागा देण्यात आली. त्यावरही सिद्धू यांनी स्पष्टीकरण दिलं.If someone (Pak Army Chief General Bajwa) comes to me&says that we belong to the same culture & we'll open Kartarpur border on Guru Nanak Dev's 550th Prakash Parv, what else I could do?: Navjot Singh Sidhu on hugging Bajwa at Pak PM Imran Khan's oath-taking ceremony in Islamabad pic.twitter.com/BMXowapA8q
— ANI (@ANI) August 19, 2018
'मी तिथे एक सन्मानित अतिथी म्हणून आमंत्रित होतो आणि अशा वेळी तुम्हाला सांगितलं तिथे बसावं लागतं. मी अगोदर दुसरीकडे बसलो होतो, मात्र त्यांनी मला नंतर तिथे (मसूद खान) बसायला सांगितलं म्हणून बसलो,'' अशी माहिती सिद्धू यांनी दिली.If someone (Pak Army Chief General Bajwa) comes to me&says that we belong to the same culture & we'll open Kartarpur border on Guru Nanak Dev's 550th Prakash Parv, what else I could do?: Navjot Singh Sidhu on hugging Bajwa at Pak PM Imran Khan's oath-taking ceremony in Islamabad pic.twitter.com/BMXowapA8q
— ANI (@ANI) August 19, 2018
दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनीही पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट घेणं चुकीचं असल्याचं म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. आपले जवान दररोज शहीद होत आहेत हे अगोदर समजून घ्यायला हवं, असं म्हणत त्यांनी विरोध दर्शवला. काय आहे वाद? इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यात सिद्धू यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांची गळाभेट घेतली. शिवाय पीओकेचे प्रमुख मसूद खान यांच्याशेजारी सिद्धू बसले होते. त्यामुळे भारतीयांच्या सिद्धू निशाण्यावर आले. भाजपसह इतर पक्षांनीही सिद्धूंवर निशाणा साधला आहे.Everyday our jawans are getting martyred. To hug their Chief General Bajwa...I am against this. The fact is that the man should understand that our soldiers are being killed everyday: Punjab CM Capt Amarinder Singh on #NavjotSinghSidhu pic.twitter.com/VIZ6FVmlUb
— ANI (@ANI) August 19, 2018