India Pakistan : भारताचा अफगाणिस्तानला मदतीचा हात, वाघा बॉर्डरमार्गे मदत पोहोचवण्यास पाकिस्तानची आडकाठी
Pakistan : पाकिस्तानने वाघा बॉर्डर मार्गे अफगाणिस्तानला 50,000 हजार मेट्रीक टन गहू पोहोचवण्याच्या भारताच्या प्रस्तावाला मंजुरी नाकारली आहे.
Pakistan : भारताने अफगाणिस्तानला मदतीचा हात पुढे केला आहे. मात्र, यामध्ये आता पाकिस्तानने आडकाठी केली आहे. भारताने पाकिस्तानकडे वाघा बॉर्डरमार्गे अफगाणिस्तानला गहू पाठवण्याची परवानगी मागितली होती. मात्र पाकिस्तान 50,000 हजार मेट्रीक टन गहू पोहोचवण्याच्या भारताच्या प्रस्तावाला मंजुरी नाकारली आहे. भारताने "मानवतावादी हेतू वगळता" अफगाणिस्तानला मदत म्हणून गहू आणि अत्यावश्यक औषधे भारतीय किंवा अफगाणिस्तानी ट्रकमधून वाहतूक करण्यास परवानगी मागितली होती. पाकिस्तानने गेल्या आठवड्यात या निर्णयाची अधिकृतपणे माहिती दिली होती.
'एक्सप्रेस ट्रिब्यून' या पाकिस्तानी वृत्तपत्राने सूत्रांच्या माहितीनुसार म्हटले आहे की, ''भारत अफगाणिस्तानात गहू वाहतूक करण्यासाठी अव्यवहार्य पर्याय शोधत आहे.'' पाकिस्तानच्या माध्यमातून अफगाणिस्तानला मदत देण्याची पद्धत निश्चित करण्यासाठी पाकिस्तानशी चर्चा सुरू असल्याचे भारतानं गुरुवारी सांगितलं. यावेळी मानवतावादी मदत देण्यावर कोणतीही अट नसावी या मुद्द्यावरही भारतानं भर दिला.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी नवी दिल्लीत सांगितलं की, "मानवतावादी सहकार्यासाठी कोणतीही अट असू नये, या मुद्द्यावर आमचा भर आहे.'' अधिकाऱ्यांनी याबाबत अधिक माहिती दिली की, मदत पोहोचवण्यासाठी भारतीय ट्रकचा वापर करावा, अशी भारताची भूमिका आहे. मात्र, पाकिस्तानी ट्रकमधून मदत पोहोचवण्यात यावी या भूमिकेवर पाकिस्तान ठाम आहे.
भारतानं अफगाणिस्तानकडे मदतीला हात पुढे करण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी अफगाणिस्तानला मदत म्हउून 50 हजार मेट्रिक टन गहू आणि अत्यावश्यक औषधं वाघा बॉर्डरमार्गे पाठवण्यासाठी भारतानं पाकिस्तानकडे परवानगी मागितली होती. मात्र, पाकिस्तान ही मदत पोहोचवण्यासाठी परवानगी देण्यास तयार नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- 'मला जन्म घ्यायचा नव्हता!' म्हणत आईची प्रसूती करणाऱ्या डॉक्टरवर मुलीनं ठोकला दावा! - नेमकं काय आहे प्रकरण
- Viral Video : धक्का मारत बाजूला केलं विमान... नक्की काय घडलं?
- Omicron Variant : कोविशिल्ड लस घेतलेल्यांसाठी आनंदाची बातमी, ओमायक्रॉनचा धोका कमी : संशोधन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha