एक्स्प्लोर

'मला जन्म घ्यायचा नव्हता!' म्हणत आईची प्रसूती करणाऱ्या डॉक्टरवर मुलीनं ठोकला दावा! - नेमकं काय आहे प्रकरण

कुठलीही स्त्री आई होते त्यावेळी तो तिच्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण असतो. यावेळी सर्वजण प्रसूती करणाऱ्या डॉक्टरांचे देखील आभार मानतात. मात्र ब्रिटनमध्ये (Britain) एक वेगळंच प्रकरण समोर आलं आहे.

नवी दिल्ली:  ज्यावेळी कुठलीही स्त्री आई होते त्यावेळी तो तिच्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण असतो. यावेळी सर्वजण प्रसूती करणाऱ्या डॉक्टरांचे देखील आभार मानतात. मात्र ब्रिटनमध्ये (Britain) एक वेगळंच प्रकरण समोर आलं आहे. हे वाचून आपण नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. ब्रिटनमधील एका 20 वर्षीय दिव्यांग मुलीनं चक्क आपल्या आईच्या डॉक्टरवरच (Mother Doctor) खटला दाखल केला आहे. मुलीनं डॉक्टरविरोधात खटला दाखल करत म्हटलं होतं की, तिला कुठल्याही परिस्थितीत जन्म घ्यायचा नव्हता. मुलीचं म्हणणं आहे की, जर तिच्या आईच्या डॉक्टरांनी मनावर घेतलं असतं तर तिला जगात येण्यापासून रोखलं असतं. 

विशेष म्हणजे या प्रकरणात मुलीला लाखो रुपयांची नुकसानभरपाई देखील मिळणार आहे. हे प्रकरण सध्या सोशल मीडियात प्रचंड गाजत आहे. असं काय झालं की या मुलीनं डॉक्टरवर दावा ठोकला असा सवाल सर्वजण विचारत आहेत. साल 2001 मध्ये ब्रिटिश (British) मुलगी एवी टूम्ब्स (Evie Toombes) चा जन्म लिपोमायलोमेनिंगोसेले हा आजार सोबत घेऊनच झाला. हे एक प्रकारचं अपंगत्व आहे. ज्याला मेडिकलच्या भाषेत स्पायना बिफिडा (spina bifida) या नावानं ओळखलं जातं. या आजारामुळंच  एवी टूम्ब्सनं डॉक्टरवर केस करत नुकसानभरपाईची मागणी केली होती.  

एवी मोठी झाल्यानंतर तिच्या आईला औषधांसदर्भात योग्य सल्ला देण्यात अपयशी ठरल्याबाबत डॉ मिशेल (Dr Philip Mitchell) यांच्याविरुद्ध खटला दाखल केला आहे.  एवीचं म्हणणं आहे की, डॉक्टरांच्या चुकीच्या सल्ल्यामुळं ती दिव्यांग झाली. जर डॉक्टर मिशेल यांनी एवीच्या आईच्या गर्भधारणेच्या काळात योग्य औषधं दिली असती तर ती सामान्य माणसांप्रमाणे आयुष्य जगू शकली असती. मात्र डॉक्टरांच्या चुकीमुळं तिची ही अवस्था झालीय.  

यामुळं एवीनं डॉक्टरांवर खटला दाखल करत नुकसानभरपाई म्हणून लाखो पाऊंडची मागणी केली आहे. एवीची आई आता 50 वर्षांची आहे, ज्यावेळी त्या 30 वर्षांच्या होत्या त्यावेळी त्यांनी डॉक्टर मिशेल यांच्याकडून प्रसूती करुन घेतली होती. त्यावेळी  डॉ मिशेल यांनी एवीच्या आई कॅरालिनला फोलिक अॅसिड न घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र स्पायना बिफिडाला रोखण्यासाठी किंवा त्याच्या महत्वाविषयी माहिती दिली नव्हती. कॅरालिन यांनी सांगितलं की, डॉक्टरांनी सल्ला दिला होता की, चांगला डायट घेत असाल तर फॉलिक अॅसिडची गरज नाही. 

या प्रकरणात न्यायाधीश रोजालिंड कोए क्यूसी यांनी एवीच्या प्रकरणात तिची बाजू योग्य असल्याचं म्हटलं आहे. लंडन उच्च न्यायालयात यावर ऐतिहासिक निर्णय सुनावला आहे. ज्यात हे मान्य केलं आहे की, जर तिच्या आईला योग्य सल्ला दिला असता तर तिनं एका सामान्य मुलाला जन्म दिला असता. न्यायाधीशांनी निर्णय सुनावताना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
बँक कर्मचाऱ्यांचा खातेदारांच्या पैशांवर डल्ला, ग्राहकांची वणवण!
बँक कर्मचाऱ्यांचा खातेदारांच्या पैशांवर डल्ला, ग्राहकांची वणवण!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gunaratna Sadavarte Holi : रंग लावले, पप्पीचा प्रयत्न, सदावर्ते कपलची हटके होळी, FULL VIDEORaj Thackeray Holi : राज ठाकरेंची धुळवड,'शिवतीर्थ'वर ठाकरे कुटुंब रंगलं FULL VIDEOABP Majha Headlines : 01 PM : 14 March 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRaosaheb Danve Holi : बुलेट रेमटवली, रंग उधळले.. रावसाहेब दानवे रंगात रंगले! ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
बँक कर्मचाऱ्यांचा खातेदारांच्या पैशांवर डल्ला, ग्राहकांची वणवण!
बँक कर्मचाऱ्यांचा खातेदारांच्या पैशांवर डल्ला, ग्राहकांची वणवण!
Indian Railway : भारतातील एकमेव पठ्ठ्या, ज्याच्याकडे स्वत:ची ट्रेन, रेल्वेच्या चुकीने बनला होता संपूर्ण ट्रेनचा मालक!
भारतातील एकमेव पठ्ठ्या, ज्याच्याकडे स्वत:ची ट्रेन, रेल्वेच्या चुकीने बनला होता संपूर्ण ट्रेनचा मालक!
Vadodara Car Accident: 100 च्या स्पीडने कार ठोकली, एकाचा जीव घेतला, धनिकपुत्र अपघातानंतर  पुटपुटत राहिला;  ओम नम: शिवाय, अनदर राऊंड निकिता
100 च्या स्पीडने कार ठोकली, एकाचा जीव घेतला, धनिकपुत्र अपघातानंतर पुटपुटत राहिला; 'ओम नम: शिवाय', 'अनदर राऊंड निकिता'
होळीसाठी लावलेल्या नाकाबंदीवर भरधाव कारने पोलिसांना चिरडले, कॉन्स्टेबल-होमगार्डसह तिघांचा अंत; तारांच्या कुंपणात अडकले मृतदेह
होळीसाठी लावलेल्या नाकाबंदीवर भरधाव कारने पोलिसांना चिरडले, कॉन्स्टेबल-होमगार्डसह तिघांचा अंत; तारांच्या कुंपणात अडकले मृतदेह
Train-Truck Accident: मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात, गेल्या तीन तासांपासून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; 'या' गाड्यांना फटका!
मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात, गेल्या तीन तासांपासून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; 'या' गाड्यांना फटका!
Embed widget