परराष्ट्र सचिवांच्या एकाच दिवसात 3-3 पत्रकार परिषदा, शस्त्रसंधी उल्लंघनानंतर हालचालींना वेग, मोठा निर्णय होणार?
MEA Press Conference News India vs Pakistan : युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केले. परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने विक्रम मिस्री यांनी ही माहिती दिली आहे.

India-Pakistan War Updates : युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केले. परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने विक्रम मिस्री यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'लष्कराला कडक प्रत्युत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.' त्यामुळे शस्त्रसंधी उल्लंघनानंतर हालचालींना वेग आला आहे आणि आता भारत काय तरी मोठा निर्णय घेईल, असे वाटत आहे.
परराष्ट्र सचिवांची एकाच दिवसात 3-3 पत्रकार परिषदा
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी 10 मे रोजी एकाच दिवसात 3-3 पत्रकार परिषदा घेतल्या. शस्त्रसंधी उल्लंघनानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदमध्ये परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले, 'गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली लष्करी कारवाई थांबवण्यासाठी आज संध्याकाळी भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंमध्ये एक करार झाला. मात्र, गेल्या काही तासांपासून पाकिस्तानकडून या कराराचे उल्लंघन केले जात आहे.
शस्त्रसंधीचं उल्लंघन होताच पाकड्यांना थेट इशारा!
ते पुढे म्हणाले, 'भारतीय सैन्य सीमेवरील या घुसखोरीला प्रत्युत्तर देत आहे आणि त्यांचा सामना करत आहे. ही घुसखोरी अत्यंत निंदनीय आहे आणि त्यासाठी पाकिस्तान जबाबदार आहे. आम्हाला वाटते की पाकिस्तानने ही परिस्थिती योग्यरित्या समजून घ्यावी आणि ही घुसखोरी थांबवण्यासाठी त्वरित योग्य ती कारवाई करावी.
आज सकाळी पाकिस्तानने पुन्हा एकदा श्रीनगर, उधमपूर, आरएस पुरा, अखनूर, भिंबर गली, शोपियान, कुलगाम, अनंतनाग यासह अनेक भागात ड्रोन हल्ले केले. ज्यांना सैन्याने हवेतच उडवले. तसेच, या भागात ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे.
विविध ठिकाणी ड्रोन उडत असल्याचे वृत्त मिळाल्यानंतर पंजाब, हरियाणा आणि राजस्थानच्या सीमावर्ती भागात ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुक्तसर साहिब, फिरोजपूर, पठाणकोट, जैसलमेर आणि अंबाला येथे अनेक ठिकाणी पूर्णपणे वीजपुरवठा खंडित झाला आहे.
भारताच्या हवाई हल्ल्यानंतर वाढला तणाव
7 मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. भारतीय सैन्याने अचूक हल्ले केल्यानंतर दोन्ही शेजारी देशांमधील तणाव वाढला. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ही प्रत्युत्तरात्मक कारवाई केली, ज्यामध्ये 26 नागरिकांचा मृत्यू झाला.
हे ही वाचा -
























