समोर दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला, जीव वाचवण्यासाठी पर्यटकांनी घेतला झाडांचा सहारा, पहलगामच्या नरसंहाराचा नवीन व्हिडिओ समोर
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही लोक आपला जीव वाचवताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये दहशतवादी एका मोकळ्या मैदानात नरसंहार करत असल्याचे दिसत आहे.

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) त्याचे अनेक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दहशतवादाचा लज्जास्पद आणि भीषण चेहरा प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसत आहे. यामध्ये दहशतवाद्यांनी निरपराध लोकांना आपला बळी कसा बनवला आणि यावेळचे किती धक्कादायक वातावरण होते याची माहिती मिळते. अशातच आता आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही लोक आपला जीव वाचवताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये दहशतवादी एका मोकळ्या मैदानात नरसंहार करत असल्याचे दिसत आहे. तर काही लोक जीव वाचवण्यासाठी झाडांटा सहारा घेत असल्याचं दिसत आहे.
नवीन व्हिडिओ व्हायरल
पहलगाम हल्ल्याच्या या नवीन व्हिडिओमध्ये दहशतवादी लोकांना लक्ष्य करत आहेत, तर काही लोक पळून जाण्यासाठी पळत असल्याचे दिसून येते. हे लोक झाडामागे लपून दहशतीचे हे दृश्य पाहत आहेत. एका व्यक्तीने हा व्हिडीओ शूट केला आहे, ज्यामध्ये जवळपास उपस्थित असलेले सर्व लोक खूप घाबरलेले दिसत आहेत. व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्ती देव सर्वांचे रक्षण करेल असे म्हणताना ऐकू येत आहे. व्हिडिओमध्ये ती व्यक्ती असेही म्हणत आहे की, येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला असून या हल्ल्यातून आम्ही थोडक्यात बचावलो आहोत. सध्या लोक हा व्हिडीओ खूप शेअर करत आहेत.
एक और वीडियो मिली #PehalgamTerroristAttack की 🙏 कितना भयानक मंजिर होगा वहां पर, जब अपनों क़ो आतंकवादीओ की गोलिओं से खतम होते दिखाई दिया होगा 🙏 pic.twitter.com/1P6wJ3cXNd
— Sarpanch Mika Gill (@SarpanchMika) April 23, 2025
सोशल मीडियावरील कमेंटमधून राग व्यक्त
जेव्हा जेव्हा सोशल मीडियावर नवीन व्हिडिओ शेअर केला जातो तेव्हा लोकांचा राग त्याच्या कमेंटमधून दिसून येतो. या व्हिडिओबाबतही लोक असेच काहीसे करत आहेत. वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की दहशतवाद्यांनाही त्याच भीतीत जगावे लागेल आणि त्यांनाही असेच नशीब भोगावे लागेल. त्याचवेळी पाकिस्तानला यासाठी धडा शिकवावा आणि इतिहासातील सर्वात मोठा स्ट्राइक करावा, असे काही लोक म्हणत आहेत.
दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू
जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झालाय. हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय. यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय. तर महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Video दहशतवाद्यांना कल्पनेपलिकडची शिक्षा देणार, आता जमिनीत गाडण्याची वेळ आलीय; नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा























