एक्स्प्लोर

Video दहशतवाद्यांना कल्पनेपलिकडची शिक्षा देणार, आता जमिनीत गाडण्याची वेळ आलीय; नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा

बिहारमध्ये पंतप्रधान मोदींच्याहस्ते गॅस, ऊर्जा, रेल्वे विभागातील विविध 13,483 कोटींच्या विकासकामांची घोषणा आणि काही कामांचे लोकार्पण मोदींच्याहस्ते करण्यात आले

पाटणा : पहलगाम दहशतवादी (Terror) हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) कॅबिनेट सुरक्षा समितीची तातडीची बैठक घेऊन पाकिस्तानविरुद्ध 5 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. बुधवारी हे निर्णय सरकारने जारी केल्यानंतर आज नरेंद्र मोदी बिहार दौऱ्यावर असून येथील जनतेला संबोधित करण्यापूर्वी आपल्या भाषणाआधी त्यांनी 2 मिनिटे मौन बाळगत पहलगाम हल्ल्यातील मृत नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर, आपल्या भाषणातून मोदींनी पाकिस्तानाला थेट इशारा दिला आहे. पहलगाम येथील हल्ला हा भारतामातेच्या आत्म्यावर झालेला हल्ला आहे, या हल्ल्याने देश शोकसागरात बुडाला आहे. पण, ज्या हल्लेखोरांनी हा हल्ला केला, त्यांना कल्पनेतही येणार नाही अशी शिक्षा देणार, आता त्यांची शिल्लक राहिलेली जमिनही मातीत गाडण्याची वेळ आलीय, अशा शब्दात मोदींनी पाकिस्तानला (Pakistan) थेट इशारा दिला आहे. 

बिहारमध्ये पंतप्रधान मोदींच्याहस्ते गॅस, ऊर्जा, रेल्वे विभागातील विविध 13,483 कोटींच्या विकासकामांची घोषणा आणि काही कामांचे लोकार्पण मोदींच्याहस्ते करण्यात आले. यावेळी, बोलताना पहलगाम हल्ल्यातील घटनेवर मोदींनी दु:ख व्यक्त केलं.  देशात आज कोटी कोटी भारतीय रडत आहेत, मृत पर्यटकांचे कुटुंबीय आक्रोश करत आहेत. पण, आज संपूर्ण देश या कुटुंबीयांसोबत आहे. या हल्ल्यात अनेकांनी आपला जोडीदार गमावला, काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत आपलं दु:ख एकसारखंच आहे, आपला आक्रोश एकसारखाच आहे. हा हल्ला पर्यटकांवर झाला नसून भारताच्या दुश्मनांनी देशाच्या आत्म्यावर हा हल्ला केलाय. ज्यांनी हा हल्ला केलाय, त्या दहशतवाद्यांना आणि कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा देणार, शिक्षा देणारच असा इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमधून पाकिस्तानला दिला. तसेच, उनकी बची-खुची जमिन को भी मिठ्ठी मे मिलाने का समय आ गया है... अशा शब्दात मोदींनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. 

दरम्यान, अनंतनाग जिल्ह्याच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून देशाच्या विविध राज्यातील हे नागरिक आहेत. या घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी सौदी-अरेबियातील आपला दौरा मध्येच सोडून देश गाठला. तर, गृहमंत्री अमित शाह यांनी देखील घटनास्थळी जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. 

मोदींनी इंग्रजीतून केलं भाषण, जगाला दिला मेसेज

बिहारच्या भूमीतून, मी संपूर्ण जगाला सांगतो की, भारत प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या आकांना शोधून काढेल, कठोरातील कठोर शिक्षा देईल. ते जगाच्या पाठीवर कुठेही लपले  तरी त्यांना शोधून काढू. भारताचं स्पीरिट, भारताचं धैर्य दहशतवाद्यांच्या कृत्यांमुळे खचणार नाही,दहशतवाला कदापि माफी मिळणार नाही. या प्रकरणात योग्य न्याय होईलच, यासाठी सर्व ते प्रयत्न करु.  हाच निर्धार प्रत्येक भारतीयाचा आहे. माणुसकीवर विश्वास ठेवणाऱ्या जगातील प्रत्येक देश आणि त्यांच्या नेत्यांचे आभार, असे मोदींनी म्हटले. 

महाराष्ट्रातील मृतांची नावे-

1) अतुल मोने - डोंबिवली
2) संजय लेले - डोंबिवली
3) हेमंत जोशी- डोंबिवली
4)  संतोष जगदाळे- पुणे
5)  कौस्तुभ गणबोटे- पुणे
6)   दिलीप देसले- पनवेल

जखमींची नावे- 

1) एस बालचंद्रू
2) सुबोध पाटील
3) शोबीत पटेल

हेही वाचा

मोठी बातमी! वाघा बॉर्डर बंद, पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; मोदींच्या बैठकीतून पाकवर स्ट्राईक

हल्ल्यावेळी अंगावर जे कपडे, त्याच कपड्यांनी आसावरीकडून वडिलांना अग्नी, संतोष जगदाळेंवर अंत्यसंस्कार

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Bank Holiday: जुलै 20 ते 26 जुलैदरम्यान 'या' दिवशी राहणार बँका बंद; बँकेत जाण्याआधी जाणून घ्या सुट्ट्यांबद्दल माहिती
जुलै 20 ते 26 जुलैदरम्यान 'या' दिवशी राहणार बँका बंद; बँकेत जाण्याआधी जाणून घ्या सुट्ट्यांबद्दल माहिती
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
Sanjay Raut: ठाकरे सेनेच्या 6 फुटीर खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी, संजय राऊत म्हणाले, 'सर्वोच्च न्यायालय गुलाम...'
ठाकरे सेनेच्या 6 फुटीर खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी, संजय राऊत म्हणाले, 'सर्वोच्च न्यायालय गुलाम...'

व्हिडीओ

Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Gold Silver Rates: सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
PV Sindhu : पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर करेक्ट कार्यक्रम
पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर चार वर्षांनंतर करेक्ट कार्यक्रम
Embed widget