मोठी बातमी : पुण्यातील पर्यटकांना दहशतवाद्यांनी आधी नावं विचारली, मग गोळ्या झाडल्या, काश्मीरमध्ये थरार
Pahalgam Terror Attack : पुण्यातील पाच जणांचे एक कुटुंब जम्मू काश्मीरमध्ये फिरायला गेले होते. त्यांच्यातील दोन पुरुषांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यापैकी एकाची अवस्था गंभीर असल्याची माहिती आहे.

पुणे : जम्मू काश्मीरमधील पहलगाम जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार (Pahalgam Terror Attack) केल्याची घटना घडली. या दहशतवादी हल्यामध्ये एकूण 27 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर अनेकजण जखमी आहेत. या जखमींमध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे. दहशतवाद्यांनी पुण्यातील पर्यटकांची नावे विचारली आणि नंतर त्यांना गोळ्या घातल्याची माहिती समोर येत आहे.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटकांवर देखील मोठं संकट ओढवलं आहे. एकूण जखमी पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा (Pune Tourist Attack in Jammu Kashmir) समावेश आहे. माणिक पाटील आणि एस भालचंद्र अशी दोघांची नाव समोर आली आहेत. दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पहलगाम येथे झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे. हल्लेखोर पोलिसांच्या गणवेशात आले होते. तसंच त्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या अशी प्रत्यक्षदर्शींची माहिती आहे.
Pahalgam Terror Attack : दोन पुरुषांवर गोळीबार
पुण्यातील पाच जणांचं कुटुंब पेहेलगामला पर्यटनासाठी गेलं होतं. ज्यामधे दोन पुरुष आणि तीन महिला होत्या. अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममधे एका व्हॅलीत पर्यटकांसह हे कुटुंब काश्मीरी पोषाख घालू न फोटो काढत होतं. त्यावेळी त्यांच्यासमोर अचानक दहशतवादी आले.
या पर्यटकांना दहशतवाद्यांनी नावे विचारली. नावांवरुन त्यांचा धर्म लक्षात आला. त्यानंतर पंतप्रधान मोदींबद्दल काही वक्तव्यं करत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. पाच जणांच्या या कुटुंबातील दोन पुरुषांवर गोळ्या झाडण्यात आल्या. यापैकी एका पुरुषाला तीन गोळ्या लागल्या असून या व्यक्तीची परिस्थिती गंभीर आहे. तर दुसरा पुरुष देखील जखमी आहे.
या कुटुंबासह पुण्यातील आणखी काही पर्यटक देखील या हल्ल्यात जखमी झाले आहेत अशी माहिती आहे. तसेच नवीन लग्न झालेल्या एका जोडप्यातील पुरुषालाही दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या.
"The terrorist attack on tourists in Pahalgam of Jammu and Kashmir is shocking and painful. It is a dastardly and inhuman act which must be condemned unequivocally. Attacking innocent citizens, in this case tourists, is utterly appalling and unpardonable. My heartfelt… pic.twitter.com/N9lVhPQWZr
— ANI (@ANI) April 22, 2025
ही बातमी वाचा:
























