अचानक गोळीबार झाल्यास जीव कसा वाचवावा? जम्मूच्या सीमावर्ती भागात शालेय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळील भागातील शाळकरी मुलांना अचानक गोळीबार सुरु झाल्यास स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे प्रशिक्षण दिले जात आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे.

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने पाकिस्तानच्या विरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. तसेच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळील भागातील शाळकरी मुलांना अचानक गोळीबार सुरु झाल्यास स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे प्रशिक्षण दिले जात आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. यानंतर शालेय मुलांना जेखील प्रशिक्षण दिले जात आहे.
भारत पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर, जम्मूच्या सीमावर्ती भागात राहणारे लोक देखील स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मार्ग अवलंबत आहेत. मग ते भारत-पाकिस्तान सीमेवरील बंकरची साफसफाई असो किंवा सीमेवरील शेतात पिके कापणी असो.
विद्यार्थ्यांनी जीव कसा वाचवावा याचं प्रशिक्षण
जर पाकिस्तानने अचानक काही वाईट कृत्य केले आणि त्यावेळेस मुलं शाळेत असतील तर त्यांनी जीव कसे वाचवावे याच प्रशिक्षण शिक्षक मुलांना देत आहेत. शाळेतील मुलांना त्यांचे जीवन वाचवण्याचे मार्ग सहजपणे समजावून सांगता यावेत म्हणून शाळा प्रशासन या संदर्भात एक मॉकड्रिल देखील करत आहे. या शाळकरी मुलांना गोळीबाराच्या वेळी जीव वाचवण्यासाठी शाळेतील डेस्कखाली लपण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. जर जोरदार गोळीबार होत असेल तर शाळेच्या आत बांधलेल्या बंकरमध्ये लपण्याचे प्रशिक्षण देखील विद्यार्थ्यांना दिले जात आहे.
प्रशिक्षण खूप महत्वाचे
शाळेतील शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशिक्षण खूप महत्वाचे आहे. कारण पाकिस्तानने केलेल्या दहशतवादी कृत्याचे उत्तर दिलेच पाहिजे. पाकिस्तान हा आपला असा शेजारी आहे ज्यावर विश्वास ठेवता येत नाही. जर पाकिस्तानने आता काही वाईट कृत्य केले तर मुलांना त्यांचे जीव वाचवण्याचे मार्ग शिकवले जात आहेत. शाळकरी मुलांचा दावा आहे की त्यांना अनेकदा पाकिस्तानी गोळीबाराचा फटका बसतो. अशा प्रशिक्षणामुळे त्यांना कठीण काळात त्यांचे प्राण वाचण्यास मदत होऊ शकते.
कोणालाही सोडणार नाही, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर अमित शाह आक्रमक
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आक्रमक झाले आहेत. भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी दहशतवाद आणि दहशतवाद्यांच्या सूत्रधारांना इशारा दिला आहे. भ्याड हल्ला करणाऱ्या कोणालाही सोडणार नाही. चुन-चुन कर मारेंगे असा शब्दात अमित शाह यांनी हल्लाबोल केला.
महत्वाच्या बातम्या:
























