एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'कॅशलेस सोसायटी' हे आपलं ध्येय, 'लेस-कॅश सोसायटी'पासून सुरुवात : मोदी
नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच 'मन की बात' कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींनी नोटीबंदीनंतर शांतपणे काम करणाऱ्या बँक आणि पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांचे आभार मानले. यावेळी मोदींनी 'कॅशलेस सोसायटी'बाबत सविस्तर भूमिका मांडली.
'कॅशलेस सोसायटी' हे ध्येय
'कॅशलेस सोसायटी' हे आपलं ध्येय आहे. कदाचित काही प्रमाणात हे ध्येय पूर्ण होणार नाही. मात्र, किमान 'लेस-कॅश सोसायटी'पासून ध्येयपूर्तीसाठी सुरुवात आपण नक्कीच करु शकतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 'कॅशलेस सोसायटी'बाबत बोलताना मोदी पुढे म्हणाले, हे ध्येय पूर्ण करण्यासाठी देशातील नागरिकांची मदत गरजेची आहे.
ई-वॉलेट म्हणजेच ई-बटवा - मोदी
"हल्ली प्रत्येक बँक ऑनलाईन सुविधा देते. प्रत्येक बँकेचं मोबाईल अॅप आहे, वेगवेगळे कार्ड आहेत, वॉलेट आहेत. हे वॉलेट म्हणजेच ई-बटवा. बँकेच्या या सर्व सुविधांचा वापर गरेजचा आहे.", असे मोदींनी सांगितले.
नोटाबंदीनंतर Rupay Card चा वापर वाढला - मोदी
नोटाबंदीच्या निर्णयानंतर Rupay Card चा जास्तीत जास्त वापर झाला. गरिबांनीही या कार्डचा वापर सुरु केला आहे. या कार्डच्या वापरात 300 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.
'कॅशलेस सोसायटी' बनवण्याच्या दृष्टीने अधिक लक्ष दिलं आहे. सर्व बँकांही यासाठी प्रयत्नशील आहे. आता तर ऑनलाईन सरचार्जही रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.
गरिबांनी श्रीमंतांच्या आमिषाला बळी पडू नये - मोदी
"श्रीमंतांनी गरिबांच्या आयुष्याचा खेळ करु नये. काहीजण आपल्याकडील काळा पैसा खपवण्याच्या अनेक क्लृप्त्या शोधत आहेत. यासाठी गरिबांना हाताशी धरलं जात आहे. गरिबांनी श्रीमंतांच्या आमिषाला बळी पडू नये", असं आवाहन पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मधून केले.
देशाच्या विकासासाठी मोठे निर्णय गरजेचे - मोदी
देशाच्या विकासासाठी मोठे निर्णय गरजेचे आहेत. नोटाबंदीचा निर्णय घेताना पुढील संकाटांची माहिती होती. मात्र, 70 वर्षे ज्या आजाराने आपण ग्रस्त आहोत, त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठीचं अभियान सरळ असू शकत नाही, असे मोदी म्हणाले.
बँक, पोस्ट कर्मचाऱ्यांचं कौतुक
नोटाबंदीनंतर अनेक अडचणींमध्येही शांतपणे काम करणाऱ्या बँक आणि पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांचं पंतप्रधान मोदींनी कौतुक केलं. तर या निर्णयानंतर संयम बाळगणाऱ्या सामान्य लोकांचेही पंतप्रधानांनी आभार मानले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement