एक्स्प्लोर

विमान टेक-ऑफ आणि लँडिंग दरम्यान 'त्या' चार विमानतळांवर खिडक्या बंद ठेवण्याचे आदेश: फोटो-व्हिडिओ करण्यावरही बंदी

डीजीसीएने विमान कंपन्यांना विमान उड्डाण करण्यापूर्वी किंवा सीमेजवळील विमानतळांवर लँडिंग दरम्यान प्रवाशांना याची माहिती देण्यासाठी क्रू मेंबर्ससाठी एसओपी तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

DGCA Rule For Flights : संरक्षण क्षेत्राची सुरक्षा लक्षात घेऊन, केंद्र सरकारने विमानांच्या टेक-ऑफ आणि लँडिंग दरम्यान खिडक्या बंद ठेवण्याचे (DGCA Rule For Flights) आदेश दिले आहेत. हा आदेश नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) जारी केला आहे. आदेशानुसार, प्रवाशांचे फोटो काढण्यावर आणि व्हिडिओ काढण्यावरही बंदी असेल. हा नियम देशातील त्या 4 संरक्षण विमानतळांना लागू असेल, जे व्यावसायिक उड्डाणांसाठी वापरले जातात. यामध्ये अमृतसर, जम्मू, श्रीनगर आणि जैसलमेर विमानतळांचा समावेश आहे.

विमान 10 हजार फूट उंचीवर पोहोचेपर्यंत खिडक्या बंद ठेवाव्या लागतील 

DGCA ने एअरलाइन्स, हेलिकॉप्टर आणि चार्टर्ड प्लेन ऑपरेटर्सना सूचना जारी केल्या आहेत की संरक्षण हवाई क्षेत्रात येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानांमधील खिडक्या विमान टेक-ऑफ दरम्यान 10 हजार फूट उंचीवर पोहोचेपर्यंत किंवा लँडिंग दरम्यान खाली येईपर्यंत बंद राहतील. द हिंदू वृत्तपत्राने DGCA च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा हवाला देत म्हटले आहे की, संरक्षण मंत्रालयाच्या शिफारशीवरून हा आदेश जारी करण्यात आला आहे. हा आदेश 20 मे रोजी जारी करण्यात आला होता. ही माहिती आता समोर आली आहे.

नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई

डीजीसीएने विमान कंपन्यांना विमान उड्डाण करण्यापूर्वी किंवा सीमेजवळील विमानतळांवर लँडिंग दरम्यान प्रवाशांना याची माहिती देण्यासाठी क्रू मेंबर्ससाठी एसओपी तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे आदेशात म्हटले आहे.

आता सध्याचे नियम काय आहेत ते जाणून घ्या

द हिंदूच्या वृत्तानुसार, अनेक वैमानिक म्हणतात की टेकऑफ आणि लँडिंग दरम्यान खिडकी उघडी ठेवणे आवश्यक आहे. हा एक सुरक्षा प्रोटोकॉल आहे. बाहेरील धोक्याचा अंदाज येण्यासाठी हे केले जाते. ज्यामध्ये तांत्रिक बिघाड, पक्षी धडकल्याने इंजिनला आग लागणे यांचा समावेश आहे. उघड्या खिडक्या आपत्कालीन परिस्थितीत सध्याची परिस्थिती समजून घेण्यास मदत करतात. यामुळे परिस्थिती हाताळण्यास आणि त्यावर उपाय शोधण्यास मदत होते.

डीजीसीए म्हणाले, आपत्कालीन खिडक्या उघड्या ठेवल्या जातील

डीजीसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की लँडिंग दरम्यान खिडकी उघडी ठेवणे आवश्यक असल्याने, आपत्कालीन खिडकी उघडी ठेवली जाईल. एका आठवड्यानंतर पुन्हा आदेशाचा आढावा घेतला जाईल.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
Embed widget