एक्स्प्लोर
Advertisement
सर्वेक्षण : काय आहे देशाचा मूड?
जर आज निवडणुका झाल्यास देशाचं चित्र काय असेल? हे जाणून घेण्यासाठीच एबीपी माझाने CSDS-लोकनितीसह जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हे सर्वेक्षण 7 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान झालं. यात 19 राज्यातील 175 लोकसभा मतदार संघात हे सर्वेक्षण करण्यात आलं. यात 14 हजार 336 मतदारांची मतं जाणून घेण्यात आली.
मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने तीन वर्षांहून अधिक कार्यकाळ पूर्ण केला आहे. या दरम्यान नोटाबंदी, जीएसटीसह अनेक मोठे निर्णय घेतले. आर्थिक क्षेत्रासह विविध क्षेत्रांवर परिणाम करणारे हे निर्णय ठरले. याच काळात गुजरात सारखी महत्त्वाची निवडणूकही झाली. त्यामुळे आता मोदी सरकारबद्दल देशातील जनतेचं मत बदललं आहे की तेच आहे, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
जर आज निवडणुका झाल्यास देशाचं चित्र काय असेल? हे जाणून घेण्यासाठीच एबीपी माझाने CSDS-लोकनितीसह जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हे सर्वेक्षण 7 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान झालं. यात 19 राज्यातील 175 लोकसभा मतदार संघात हे सर्वेक्षण करण्यात आलं. यात 14 हजार 336 मतदारांची मतं जाणून घेण्यात आली.
काय आहे देशाचा मूड?
कसा आहे मोदी सरकारचा कारभार? मे 2017 समाधानकारक – 64 टक्के असमाधानकारक – 27 टक्के माहिती नाही – 9 टक्के जानेवारी 2018 समाधानकारक – 51 टक्के असमाधानकारक – 40 टक्के माहिती नाही – 9 टक्के देशवासियांचे अच्छे दिन आले का? मे 2017 होय – 63 टक्के नाही – 27 टक्के माहिती नाही – 10 टक्के जानेवारी 2018-01-25 होय – 41 टक्के नाही – 50 टक्के माहिती नाही – 9 टक्के देशात मोठी समस्या काय? बेरोजगारी – 27 टक्के गरिबी – 14 टक्के भ्रष्टाचार – 9 टक्के नोटाबंदीचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम झाला? चांगला – 48 टक्के वाईट – 34 टक्के माहिती नाही – 18 टक्के जीएसटीबद्दल तुमचं मत काय आहे? विचारपूर्वक निर्णय – 27 टक्के घाईने घेतलेला निर्णय – 42 टक्के माहिती नाही – 31 टक्के पंतप्रधानपदासाठी देशाची पहिली पसंती कुणाला? मे 2017 नरेंद्र मोदी – 44 टक्के राहुल गांधी – 9 टक्के जानेवारी 2018 नरेंद्र मोदी – 37 टक्के राहुल गांधी – 20 टक्के 2019 साली लोकसभेला कुणाला किती जागा? (विभागनिहाय) उत्तर विभाग (151 जागा) एनडीए – 111 यूपीए – 13 इतर – 27 पूर्व विभाग (142 जागा) एनडीए – 72 यूपीए – 18 इतर – 52 दक्षिण विभाग (132 जागा) एनडीए – 34 यूपीए – 63 इतर – 35 पश्चिम विभाग (118 जागा) एनडीए – 84 यूपीए – 33 इतर – 1 एकूण (543 जागा) एनडीए – 301 यूपीए – 127 इतर – 115काय आहे महाराष्ट्राचा मूड?
आता मतदान झाले तर कुणाला मतदान करणार? भाजप – 31 टक्के काँग्रेस – 24 टक्के शिवसेना – 19 टक्के राष्ट्रवादी – 15 टक्के मोदी सरकारच्या कामकाजाबद्दल महाराष्ट्राचं मत काय? मे 2017 समाधानकारक – 63 टक्के असमाधानकारक – 28 टक्के माहिती नाही – 9 टक्के जानेवारी 2018 समाधानकारक – 56 टक्के असमाधानकारक – 38 टक्के माहिती नाही – 6 टक्के फडणवीसांचा कारभार कसा आहे? मे 2017 समाधानकारक – 63 टक्के असमाधानकारक – 30 टक्के माहिती नाही – 7 टक्के जानेवारी 2018 समाधानकारक – 54 टक्के असमाधानकारक – 39 टक्के माहिती नाही – 7 टक्के मोदी सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न कसे हाताळले? बिगर शेतकरी चांगल्या पद्धतीने – 49 टक्के वाईट पद्धतीने – 44 टक्के माहिती नाही – 7 टक्के शेतकरी चांगल्या पद्धतीने – 44 टक्के वाईट पद्धतीने – 49 टक्के माहिती नाही – 7 टक्के फडणवीस सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न कसे हाताळले? बिगर शेतकरी चांगल्या पद्धतीने – 52 टक्के वाईट पद्धतीने – 42 टक्के माहिती नाही – 6 टक्के शेतकरी चांगल्या पद्धतीने – 43 टक्के वाईट पद्धतीने – 54 टक्के माहिती नाही – 3 टक्के फडणवीसांच्या काळात तुमची आर्थिक स्थिती कशी राहिली? चांगली – 19 टक्के बऱ्यापैकी – 35 टक्के वाईट – 35 टक्के अतिशय वाईट – 11 टक्के पंतप्रधानपदी महाराष्ट्राची पसंती कुणाला? नरेंद्र मोदी मे 2017 – 42 टक्के जानेवारी 2018 – 40 टक्के राहुल गांधी मे 2017 – 7 टक्के जानेवारी 2018 – 21 टक्के मनमोहन सिंग मे 2017 – 4 टक्के जानेवारी 2018 – 1 टक्के शरद पवार मे 2017 – 8 टक्के जानेवारी 2018 – 9 टक्के उद्धव ठाकरे मे 2017 – 3 टक्के जानेवारी 2018 – 3 टक्के इतर नेते मे 2017 – 9 टक्के जानेवारी 2018 – 5 टक्के माहिती नाही मे 2017 – 27 टक्के जानेवारी 2018 – 21 टक्केअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
मुंबई
निवडणूक
हिंगोली
Advertisement