एक्स्प्लोर

मोदींची अनुपस्थिती,व्हायरल पोस्टचा उल्लेख..ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत नेमकं झालं काय? कोण काय म्हणालं?

या बैठकीत सर्व पक्षांच्या नेत्यांनी हवाई हल्ल्याचे कौतुक केले असून सरकारच्या प्रत्येक निर्णयाला आणि लष्कराच्या प्रत्येक कृतीला पाठिंबा असल्याचे या बैठकीत सांगितले.

Operation Sindoor: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि पाकव्याप्त काश्मीर मधील 9 दहशतवादी तळ उध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूरनंतर सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्व पक्षांच्या नेत्यांनी हवाई हल्ल्याचे कौतुक केले असून सरकारच्या प्रत्येक निर्णयाला आणि लष्कराच्या प्रत्येक कृतीला पाठिंबा असल्याचे या बैठकीत सांगितले. ऑपरेशन सिंदूरनंतर झालेल्या या बैठकीत मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला अनुपस्थित असल्याचा मुद्दा उपस्थित केला. 

काय म्हणाले मल्लिकार्जून खरगे?

तसेच तुम्ही जे काम करत आहात ते करत रहा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत असेही खरगे यांनी बैठकीत सांगितले. या बैठकीत त्यांनी राफेल पाडल्याच्या पाकिस्तानच्या दाव्याचा ही उल्लेख केला. परंतु कोणीही सरकारला या मुद्द्यावर उत्तर देण्यास सांगितले नाही. सर्वपक्षीय बैठकीनंतर बाहेर आलेल्या काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी 'आम्हाला जे सांगण्यात आले ते आम्ही ऐकले. आम्ही सरकारला पाठिंबा दिलाय. या घडीला आम्ही सरकारसोबत आहोत असे खर्गे म्हणाले. पंतप्रधानांना कदाचित वाटते की ते संसदेच्या वर आहेत. वेळ आल्यावर आपण बोलू पण सध्या आपण कोणावरही टीका करणार नसल्याचं मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं. 

राहूल गांधी म्हणाले...

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, आम्ही देशाच्या हितासाठी सरकारसोबत राहू असे म्हटले आहे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी म्हणाले आम्ही एकजूट आहोत आणि सुरुवातीपासून सरकारसोबत आहोत. काही चिंताजनक बाबी आहेत पण ठीक आहे. ही एकजूट राहण्याची वेळ आहे. सर्वपक्षीय बैठकीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपण सर्वांनी सरकारला पाठिंबा दिल्याचं सांगितला आहे. सर्व पक्षांच्या नेत्यांना बोलण्यासाठी चार ते पाच मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. काँग्रेस सोबत समाजवादी पक्षानेही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्वपक्षीय बैठकीला अनुपस्थित राहिल्याचा मुद्दा उपस्थित केला.

लढाऊ विमानाच्या व्हायरल पोस्टवर काय झालं?

बठिंडा येथे लढाऊ विमान पाडण्यात आल्याचा दावा करणाऱ्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टचा मुद्दा ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुसलमीन (MIM) पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही उपस्थित केला .बैठकीच्या सुरुवातीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सरकारच्यावतीने ऑपरेशन सिंदूर बाबत माहिती दिली .या ऑपरेशनचे अंतर्गत तपशील यात देण्यात आले नाहीत .सर्वपक्षीय नेत्यांनी सरकारसोबत एकजूट असल्याचं व्यक्त करत आम्ही एकत्र आहोत असे सांगितले .

किरण रिजिजू म्हणाले?

संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू  म्हणाले , हे ऑपरेशन अजूनही सुरू आहे .त्यामुळे याबाबत स्वतंत्रपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही .हा अतिशय संवेदनशील विषय आहे आणि प्रत्येकाने अत्यंत गांभीर्याने आपले विचार या बैठकीत व्यक्त केले आहेत .किरण रिजीजू म्हणाले की देशातील सर्व राजकीय पक्ष ऑपरेशन सिंदूरबाबत समान वक्तव्य करत आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे असेही रिजिजू म्हणाले .

सर्व राजकीय पक्षांनी ऑपरेशन सिंदूर नंतर एक परिपक्वता दाखवली आहे .भारताची लोकशाही ही तेवढीच परिपक्व असल्याचं देशातील राजकीय पक्षांनी दाखवून दिले आहे .जेव्हा आपण अशा विषयांवर बोलतो तेव्हा त्यात राजकारणाला काहीच महत्त्व नसते .असेही ते म्हणाले .

हेही वाचा:

India targeted Pakistan Air Defence Systems मोठी बातमी: भारताची लाहोरपर्यंत मुसंडी, पाकिस्तानची रडार यंत्रणा केली उद्ध्वस्त, ड्रोन हल्ल्यांनी पाकला हादरवून सोडलं!

महत्त्वाच्या बातम्या

एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget