India Pakistan War: अख्खं जग भारताच्या बाजूने, पण 'हे' तीन मुस्लीम देश पाकिस्तानला देतायत युद्धासाठी चिथावणी
India Pakistan War: भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये 37 जण ठार झाल्याची कबुली पाकिस्तानकडून देण्यात आली. भारताच्या 80 विमानांनी पाकिस्तानवर हल्ला केला, असे पाकचे पंतप्रधान म्हणाले.

Operation Sindoor: काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने मंगळवारी रात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक केला होता. भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये (Operation Sindoor) पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले होते. भारतीय लष्कराने पीओकेमध्ये केलेला सर्जिकल स्ट्राईक हा फक्त दहशतवाद्यांचे नुकसान करणारा असल्याचे स्पष्ट केले होते. यामध्ये पाकिस्तानमधील (Pakistan) सामान्य नागरिक किंवा लष्करी तळांना कोणतीही इजा पोहोचवण्यात आली नव्हती, असेही भारतीय सैन्याकडून सांगण्यात आले होते. जगातील बहुतांश देशांनी भारतीय लष्कराच्या या कारवाईचे समर्थन केले होते. यामध्ये अमेरिका, इस्रायल, फ्रान्स या देशांचा समावेश आहे. मात्र, त्याचवेळी तीन मुस्लीम देश (Muslim Countries) हे अजूनही पाकिस्तानला भारतासोबत युद्ध करण्यासाठी अप्रत्यक्षपणे पाठबळ देत असल्याची माहिती समोर आली आहे. भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर तुर्की, अजरबैजान आणि कतार या तीन देशांनी पाकिस्तानच्या बाजूने उभे असल्याचा संदेश दिला.
तुर्कस्तानने (Turkistan) पाकिस्तानविषयी सहानुभूती व्यक्त करताना म्हटले की, भारताचे हे पाऊल युद्धाची नांदी आहे. भारताने 6 मेच्या रात्री पाकिस्तानमध्ये केलेल्या हल्ल्याने आम्ही चिंतीत आहोत. आम्ही चिथावणीखोर कृती आणि सामान्य नागरिक राहत असलेल्या ठिकाणांना लक्ष्य करण्याचा निषेध करतो. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी संयम बाळगून चर्चेतून या सगळ्यातून मार्ग काढावा, असा सल्ला तुर्कस्तानने दिला.
तर अजरबैजानकडून भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'बाबत नकारात्मक टिप्पणी करण्यात आली आहे. त्यांनी म्हटले की, आम्ही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाने चिंतीत आहोत. आम्ही पाकिस्तानवर झाल्याचा हल्ल्याचा निषेध करतो. हे एकतर्फी आक्रमण असून आम्ही पाकिस्तानमधील मृतांच्या कुटुंबीयांविषयी सहानुभूती व्यक्त करतो, असे अजरबैजानने म्हटले आहे.
तर कतारने तुर्कस्तान आणि अजरबैजानच्या (azerbaijan) तुलनेत संतुलित भूमिका घेतल्याचे दिसून आले. आम्ही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहोत. दोन्ही देशांनी संयम, चांगले शेजारी असण्याचे कर्तव्य बजावण्यासोबतच राजनैतिक चर्चेच्या माध्यमातून समस्या सोडवावी, असे आवाहन कतारने केले. मात्र, अन्य देशांप्रमाणे कतारने भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ला कोणत्याही प्रकारचे समर्थन दर्शविले नाही.
आणखी वाचा
भारताकडून एअर स्ट्राईक; पाकिस्तानचा सच्चा मित्र म्हणून ओळख असणारा चीन भडकला, म्हणाला...























