एक्स्प्लोर

Operation Sindoor : "उस दिन पूछ कर मारा था" आज हमने घुसकर मारा है"; नि. मेजर जनरल अनिल बाम यांची प्रतिक्रिया; म्हणाले....

Operation Sindoor :  "उस दिन पूछ कर मारा था" आज हमने घुसकर मारा है"  मेजर जनरल अनिल बाम यांची सैन्याच्या पत्रकार परिषदेनंतर आणि सैन्याने दिलेल्या पुराव्यानंतर ही प्रतिक्रिया दिली आहे.

Operation Sindoor, India Airstrike On Pakistan: ज्यावेळी आर्मी बोलते तेव्हा कधीही खोटं आणि वाढवून बोलत नाही. प्रत्येक टारगेटचे इमेज दाखवण्यात आले, सैन्याकडून मोठ्या हल्ल्यानंतर पोस्ट स्ट्राईक ड्यामेज अससीसमेंट  (Post Strike Damage Assessment) केले जाते, त्यात विमानातून आणि सॅटॅलाइटवरून फोटो घेतले जातात. आजच्या स्ट्राइक नंतर केलेल्या Post Strike Damage Assessment मध्ये  दिसून येत आहे की मोठ्या प्रमाणावर सर्व 9 तळ उध्वस्त झाले आहे, मोठी हानी त्या ठिकाणी झाली आहे. सैन्याने सर्व पुरावे दिले आहे. पुढे आता कोणीही स्ट्राइकवर शंका घेऊ नये. असे आवाहन निवृत्त मेजर जनरल अनिल बाम (Retired Major General Anil Bam) यांनी केलं आहे.

दरम्यान, पुढे बोलताना अनिल बाम म्हणाले की,  "उस दिन पूछ कर मारा था" आज हमने घुसकर मारा है"  मेजर जनरल अनिल बाम यांची सैन्याच्या पत्रकार परिषदेनंतर आणि सैन्याने दिलेल्या पुराव्यानंतर ही प्रतिक्रिया दिली आहे.

..तर आपल्याला पूर्ण युद्ध लढण्याची संधी मिळेल- अनिल बाम

पाच टार्गेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये होते, तर चार टार्गेट पाकिस्तानच्या आतील भागात होते. आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये घुसून मारणे सोपे नाही, भारताने आज संपूर्ण जगाला दाखवून दिलं की भारत कमकुवत देश नाही. आता पाकिस्तानने प्रतिहल्ला केला तर तो भारतावर हल्ला ठरेल. माझी इच्छा आहे पाकिस्तानने तसं करावं, म्हणजे आपल्याला पूर्ण युद्ध लढण्याची संधी मिळेल. असेही मेजर जनरल अनिल बाम म्हणाले. 

कुटुंबिय मारले जातात तेव्हा कसं वाटतं हे मसूद अझहरला आज कळेल 

स्ट्राईकमध्ये स्काल्प मिसाईल आणि ब्रह्मोस मिसाईल वापरले. स्काल्प ऑल वेदर मिसाईल  आहे. स्काल्प हवेतून जमिनीवर मारा करते, त्यामुळे आज त्याचा मारा विमानातून करण्यात आला आहे. स्काल्पची खासियत म्हणजे कमी उंचीवर उडान भरू करते. त्याचा रडार शून्य आहे. त्यामुळे स्काल्पला रडार पकडू शकत नाही. ब्रह्मोसची पण अशीच खासियत आहे. त्यामुळे आजच्या स्ट्राइकमध्ये मोठे यश मिळाले आहे. मौलाना मसूद अझर जैश-ए-मोहम्मदचा चीफ असून त्याचे घर उध्वस्त करण्यात आलं आहे. त्यात 14 कुटुंबीय मारले गेले आहे. त्यामुळे कुटुंबिय मारले जातात तेव्हा कसं वाटते ही भावना  मौलाना मसूद अझहरला आज देण्यात आली आहे. जिथे कुठे तो लपून बसला असेल लवकरच तोही संपवला जाईल.

स्ट्राइकला नाकारू शकत नाही अन् स्वीकारूही शकत नाही

भारताचे हल्ले दहशतवादी तळावर होतो. मात्र पाकिस्तानने पलटवार केला, तर तो भारताच्या सिव्हिलियन किंवा सरकारी ठिकाणांवर होईल. त्यामुळे पाकिस्तानचा प्रतिहल्ला भारतावरील हल्ला मानला जाईल. त्यामुळे पाकिस्तानची चांगलीच कोंडी झाली आहे. ते आपल्या स्ट्राइकला नाकारू शकत नाही आणि स्वीकारूही शकत नाही. असेही मेजर जनरल अनिल बाम म्हणाले. 

अन्वस्त्र वापरलं तर पाकिस्तानच नष्ट होईल- अनिल बाम 

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा यांच्या वक्तव्याचे दोन अर्थ निघतात, एकतर ते खरंच घाबरलेले असू शकतात, कारण पाकिस्तानची लढण्याची शक्ती उरलेली नाही. तसंच उरल्यासुरल्या दहशतवादी तळांना वाचवण्यासाठी त्यांची खेळी ही असू शकते. खरंच पाकिस्तानने अन्वस्त्र वापरलं तर पाकिस्तानच नष्ट होईल.

आज हमने घुसकर मारा है, हे स्टेटमेंट अगदी खरे आहे...

सैन्याच्या पत्रकार परिषदेत दोन महिला अधिकारी कर्नल कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिता सिंग ज्यांनी सैन्याच्या वतीने देशाला आपल्या स्ट्राइक ची माहिती दिली.. हे अत्यंत महत्त्वाचे संकेत आहे आज भारताने या माध्यमातून आपली मातृशक्ती किती सक्षम आहे हे दर्शवून दिले आहे.

हे ही वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget