Operation Sindoor, India Airstrike On Pakistan: पाकिस्तानमध्ये घुसून भारताचं 'ऑपरेशन सिंदूर' फत्ते, फक्त 23 मिनिटांत खेळ खल्लास, आता गुगलवर सर्च करतायत, 'ये सिंदूर होता क्या है?'
Operation Sindoor, India Airstrike On Pakistan: गेल्या काही दिवसांपासून भारतासोबत युद्धाची तयारी करणाऱ्या पाकिस्तानला 'ऑपरेशन सिंदूर'नं जोरदार धक्का दिला आहे. फक्त 23 मिनिटांत भारतीय सैन्यानं पाकिस्तानचा माज उतरवला. आता पाकिस्तानी 'ये सिंदूर होता क्या है?' गूगलवर सर्च करत आहेत.

Operation Sindoor, India Airstrike On Pakistan: पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) मृत्यूमुखी पडलेल्या 26 पर्यटकांच्या मृत्यूचा बदला भारतानं पाकिस्तानच्या घरात घुसून घेतला. पाकिस्ताननं (Pakistan) आसरा दिलेल्या तब्बल 9 दहशतवादी तळांच्या भारतानं चिंध्या उडवल्या. भारतानं याला 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) असं नाव दिलंय. पहलगाममध्ये ज्यांचं कुंकू पाकच्या दहशतवाद्यांनी हिरावलं, त्या सर्व महिलांचा बदला आज भारतीय सैन्यानं घेतला. संपूर्ण देशभरात भारतीय सैन्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. पण, दुसरीकडे पाकिस्तान मात्र पुरतं भांबावलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतासोबत युद्धाची तयारी करणाऱ्या पाकिस्तानला 'ऑपरेशन सिंदूर'नं जोरदार धक्का दिला आहे. फक्त 23 मिनिटांत भारतीय सैन्यानं पाकिस्तानचा माज उतरवला.
भारतानं अचानक केलेल्या हल्ल्यानंतर आता पाकिस्तान हादरलं आहे. भारताच्या चोख प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानी नागरिक गुगलवर आता 'ये सिंदूर होता क्या है?' असा प्रश्न विचारत आहे.

पाकिस्तानी शोधतायत 'सिंदूर' नावाचा अर्थ
भारतीय सैन्यानं मध्यरात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) मधील जवळपास 9 दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक केला. भारतानं केलेल्या या कारवाईनंतर पाकिस्तानमधील लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आता पाकिस्तानचे लोक गुगलवर एअर स्ट्राईक, इंडियन आर्मी, इंडिया आणि 'ऑपरेशन सिंदूर'बद्दल सर्च करत आहेत. पाकिस्तानमधील गुगल ट्रेंडवरून असं दिसून येतंय की, ते आता सिंदूर नावाचा अर्थ शोधत आहेत.
पाकिस्तानी नागरिक गूगलवर 'ऑपरेशन सिंदूर' नावाचा अर्थ सांगत आहेत. आता 'ऑपरेशन सिंदूर', इंडिया ऑपरेशन सिंदूर, सिंदूर अटैक, ऑपरेशन सिंदूर क्या है यांसारख्या गोष्टी पाकिस्तानी गूगलवर सर्च करत आहेत. याव्यतिरिक्त पाकिस्तानी सिंदूरचा अर्थ जाणून घेण्यासाठी गूगलचा आधार घेत आहेत. अशातच आता सिंदूर क्या है, सिंदर का मतलब यांसारखे कीवर्ड सर्च होत आहेत.

भारताबाबत काय सर्च करतायत पाकिस्तानी?
'ऑपरेशन सिंदूर' व्यतिरिक्त पाकिस्तानी लोक भारताबाबत अनेक गोष्टी सर्च करत आहेत. गूगल ट्रेंड्सच्या रिपोर्टनुसार, India Attack Bahawalpur, India Attack on Pakistan Today, India Attack on Bahawalpur, India Attacked on Pakistan, India Strikes Pakistan सारखे कीवर्ड सर्च करत आहेत. याव्यतिरिक्त पाकिस्तानच्या लोकांनी पाकिस्तानी आर्मीबाबतही सर्च करत आहेत. त्यासोबतच सर्वात पॉवरफुल आर्मी, इंडियन आर्मी, पाकिस्तान आर्मी इत्यादी टॉपिकही सोशल मीडियावर सर्च केलं जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :


















