एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मनोहर पर्रिकरांचा आणखी एक फोटो प्रसिद्ध
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांचा नवा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे.
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची छबी गोमंतकीयांना आज पुन्हा एकदा पहायला मिळाली. आज मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजी गोवाच्या कायमस्वरुपी संकुलाच्या पायाभरणी दगडाचे अनावरण करण्यात आले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
दिल्ली येथील एम्स रुग्णालयामधून आल्यानंतर मुख्यमंत्री पर्रिकर यांचे फोटो मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्ध केले. या फोटोंमध्ये पर्रिकरांची तब्येत खालावली असल्याचे पहायला मिळाले. गोव्यातील विरोधी पक्ष काँग्रेसने प्रत्येक वेळी मुख्यमंत्री घेत असलेल्या प्रत्येक बैठकीचा पुरावा म्हणून व्हिडिओ प्रसिद्ध केला जावा, अशी मागणी केली आहे. परंतु मुख्यमंत्री कार्यालय पर्रिकर यांचे केवळ फोटोच प्रसिद्ध करत असल्यामुळे या फोटोंवर आक्षेप घेतला जात होता.
त्यानंतर मनोहर पर्रिकर सोफ्यावर बसलेले असतानाचा एक फोटो मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्ध केले. त्यावरुनदेखील विरोधकांनी उलट सुलट चर्चा सुरु केली. त्यानंतर आज मुख्यमंत्री उभे राहून पायाभरणी दगडाचे अनावरण करताना दिसत असल्याने हा फोटोसुद्धा चर्चेत येणार असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने आपल्या फेसबुक पेजवर आणि ट्विटर हैंडलवर हा फोटो प्रसिद्ध केला आहे.
Unveiled foundation stone for permanent campus of National Institute of Technology Goa in presence of HRD Minister Shri. @PrakashJavdekar. The state’s higher education sector will get a major boost with NIT Goa as 40% of the seats at the institution will be reserved for Goans. pic.twitter.com/Ih46Kzq2pD
— Manohar Parrikar (@manoharparrikar) December 15, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement