CT Scan For Corona : कोरोना रुग्णांचा CT Scan करताय? तर मग सावधान, कॅन्सरचा धोका उद्भवण्याची शक्यता, AIIMS ची माहिती
CT Scan For Corona : देशात कोरोनाचे उपचार करताना CT Scan चा गैरवापर केला जात आहे आणि त्यामुळे कॅन्सरचा धोका उद्भवण्याची शक्यता असल्याचं AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया ((Dr.Randeep Guleria) यांनी सांगितलं.
नवी दिल्ली : देशातीत कोरोनाच्या स्थितीने गंभीर स्वरूप धारण केलं असून त्यामुळे लोकांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे घाबरून जाऊन लोक ज्या पद्धतीचे उपचार घेत आहेत ते पाहता देशातील आरोग्य यंत्रणेसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे. कोरोनाचे उपचार करताना CT Scan चा गैरवापर केला जात असून त्यामुळे कॅन्सरचा धोका उद्भवण्याची शक्यता असल्याचं मत AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केलं आहे.
AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, "रेडिएशन संबंधित एक डेटाचे विश्लेषण करताना लक्षात आलं आहे की, लोक तीन-तीन दिवसांत CT Scan करत आहेत. आपण जर पॉझिटिव्ह असाल आणि आपल्यात कोरोनाची सौम्य लक्षणं असतील तर आपल्याला CT Scan करण्याची आवश्यकता नाही. कारण अनेक वेळा CT Scan मधून जो रिपोर्ट येतो त्यामध्ये चुका असल्याचं लक्षात आलं आहे. त्याचा परिणाम रुग्णावर होऊ शकतो."
CT scans & biomarkers are being misused and they can be harmful as well
— PIB India (@PIB_India) May 3, 2021
There is no use of a CT scan if you have mild Covid. One CT scan is equivalent to almost 300-400 chest x-rays & it increases the risk of getting cancer in young people
- Dr. Randeep Guleria, Director, AIIMS pic.twitter.com/PWTus6xE76
डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, "जर कोरोनाबाधित रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असेल आणि त्याला सौम्य लक्षणं दिसत असतील तर अशा रुग्णांनी CT Scan करण्याची आवश्यकता नाही. कारण एक CT Scan हा 300 एक्स रेच्या बरोबर असतो. खासकरून तरूणांनी जर वारंवार CT Scan केलं तर त्यांच्यामधअये कॅन्सरचा धोका उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे गरज नसताना CT Scan करून आपल्या शरीराची हानी करू नये."
महत्वाच्या बातम्या:
- India Coronavirus Cases : जगातील एकूण रुग्णसंख्येपैकी 40 टक्के रुग्ण भारतात, गेल्या 24 तासांत 357,229 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
- Petrol Diesel Price Hike: निवडणुका संपल्या, पेट्रोल-डिझेलच्या दराचा भडका सुरू
- Drive-in Covid-19 Vaccination : कारमधून या लस घ्या; मुंबईतील दादरमध्ये देशातील पहिल्या 'ड्राईव्ह इन' लसीकरण मोहिमेला सुरुवात