5th December In History: आजच्याच दिवशी भारताने बांगलादेशला स्वतंत्र देश म्हणून दिली होती मान्यता, नेल्सन मंडेला यांची पुण्यतिथी; आज इतिहासात
On This Day In History : भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांच्या इतिहासात 5 डिसेंबरचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. 1971 मध्ये या दिवशी भारताने बांगलादेशला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली होती.
मुंबई: भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांच्या इतिहासात 5 डिसेंबरचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. 1971 मध्ये या दिवशी भारताने बांगलादेशला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली होती. पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का होता. त्यानंतर भारताच्या मदतीने बांगलादेशच्या सैन्याने ढाका मुक्त केला होता. यासाठी पाकिस्तानी सैनिकांना बिनशर्त आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
1818: प्रसिद्ध गझलकार जोश मलिहाबादी यांची जयंती
प्रसिद्ध गझलकार जोश मलिहाबादी यांचा आज जयंती आहे. ते ब्रिटिश काळातील प्रसिद्ध कवी होते. 1958 पर्यंत ते भारताचे नागरिक होते. मात्र नंतर ते पाकिस्तानात जाऊन स्थायिक झाले. त्यांनी 'जोश' या टोपण नावाने अनेक गझल आणि कविता लिहिल्या आहेत. त्यांचा जन्म मलिहाबाद, लखनौ येथे झाला. त्यामुळे ते जोश मलिहाबादी झाले. स्वातंत्र्यलढ्यात ते आपल्या लेखणीने सक्रिय होते. यातूनच ते त्या काळातील नेत्यांच्या विशेषतः जवाहरलाल नेहरूंच्या संपर्कात आले. 1947 मध्ये ब्रिटीश राजवट संपल्यानंतर ते 'आज कल'चे संपादक झाले. 1954 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कारही देण्यात आला होता. 22 फेब्रुवारी 1982 रोजी त्यांचे निधन झाले.
1932: अभिनेत्री नादिरा यांचा जन्मदिवस
बॉलिवूड अभिनेत्री नादिरा यांचा आज जन्मदिवस आहे. त्या हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक होत्या. नादिरा यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. 9 फेब्रुवारी 2006 रोजी त्यांचं निधन झालं.
1946 : भारतात होमगार्ड संघटनेची स्थापना
6 डिसेंबर 1962 रोजी चीनने भारतावर केलेल्या आक्रमणानंतर होमगार्ड विभागाची स्थापना करण्यात आली.
2013: दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांची पुण्यतिथी
आफ्रिकेचे 'गांधी' म्हणून ओळखले जाणारे नेल्सन मंडेला यांची आज पुण्यतिथी आहे. दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्याबरोबरच वर्णभेदाविरुद्धच्या लढ्यात शांततेचे दूत म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या नेल्सन मंडेला यांचे योगदान कोणीही विसरू शकत नाही. मंडेला यांनी वर्णभेदाविरुद्ध दीर्घकाळ लढा दिला, ज्या दरम्यान त्यांनी 27 वर्षे तुरुंगात घालवली. नेल्सन मंडेला यांचे पूर्ण नाव नेल्सन रोलिहलाला मंडेला होते. त्यांचा जन्म 18 जुलै 1918 रोजी दक्षिण आफ्रिकेतील केप प्रांतात झाला. मंडेला 1944 मध्ये आफ्रिकन नॅशनल काँग्रेसमध्ये सामील झाले. लोकांमध्ये आपली छाप सोडणाऱ्या नेल्सन यांनी लवकरच आफ्रिकन नॅशनल काँग्रेस युथ लीगची स्थापना केली आणि तीन वर्षांनंतर ते त्याचे सचिव बनले. काही वर्षांनी मंडेला यांची आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे सदस्य म्हणूनही निवड झाली. मंडेला आणि त्यांच्या मित्रांवर 1961 साली देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला होता. पण त्यात त्यांना निर्दोष मानले गेले. यानंतर पुन्हा एकदा त्यांना 5 ऑगस्ट 1962 रोजी अटक करण्यात आली होती. त्यावेळी कामगारांना संपासाठी प्रवृत्त करणे आणि परवानगी न घेता देश सोडून जाणे यासाठी त्यांना अटक करण्यात आली होती. त्याच्या अटकेनंतर त्याच्यावर खटला चालवला गेला आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. त्याचवेळी 1964 ते 1990 या काळात वर्णभेदाविरोधात सुरू झालेल्या चळवळीमुळे त्यांना आयुष्यातील 27 वर्षे तुरुंगात काढावी लागली. त्याच्या शिक्षेदरम्यान त्यांना रॉबेन बेटावर तुरुंगात ठेवण्यात आले होते.
2014: जागतिक मृदा दिन
5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिवस साजरा केला जातो. जागतिक अन्नसुरक्षेच्या दृष्टीने मृदेचं महत्व अन्यसाधारण असं आहे. मानवाच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम, पर्यावरणाचा ऱ्हास आणि अशा प्रकारच्या इतर अनेक कारणांमुळे मृदेची झीज मोठ्या प्रमाणावर होतेय. त्यामुळे यासंदर्भात जागरुकता करण्याच्या दृष्टीने 2013 साली सयुंक्त राष्ट्राच्या महासभेत 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिवस साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला.
2016 : तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांची पुण्यतिथी
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री राहिलेल्या जयललिता यांची आज पुण्यतिथी आहे. 5 डिसेंबर 2016 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. तामिळनाडूच्या राजकारणात त्यांना अम्मा या नावाने ओळखले जाते. त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1948 रोजी झाला. राजकारणासोबतच जयललिता यांनी दक्षिणेतील चित्रपटांमध्येही आपली क्षमता सिद्ध केली होती.