एक्स्प्लोर

30th September In History : 30 सप्टेंबर ठरला इतिहासात हादरवणारा दिवस, लातूरच्या भूकंपात 10 हजार लोकांचा मृत्यू

On This Day In History : आजच्या दिवशी देशाला हादरवणारी घटना घडली असून 1993 साली लातूरमधील भूकंपामध्ये 10 हजाराहून जास्त लोकांचा मृत्यू झाला. 

मुंबई: इतिहासात आजचा दिवस (On This Day In History 30th September In History) महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी, 30 सप्टेंबर 1993 रोजी लातूरमध्ये (Latur Earthquake) मोठी भूकंप झाला होता. त्यामध्ये हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. तसेच आजच्याच दिवशी जोधपुरातील एका मंदिरात गोंधळ माजला आणि त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. 

1687- औरंगजेबने गोवळकोंडा किल्ला ताब्यात घेतला 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर दक्षिण जिंकायला निघालेल्या मुघल बादशाह औरंगजेबने पहिला हल्ला कुतुबशाहवर केला. 30 सप्टेंबर 1687 साली औरंगजेबने गोवळकोंडा (Golconda Fort) हा किल्ला जिंकला. 11 व्या शतकात वरंगलचा राजा काकतिया प्रतापरुद्रने गोवळकोंडा या ठिकाणी मातीचा किल्ला बांधला. 14 व्या शतकात वरंगलच्या लढाईत बहमनी सुलतानाच्या तो ताब्यात आला.

1993- लातूर भूकंपमध्ये 10 हजार लोकांचा मृत्यू 

महाराष्ट्रातल्या लातूर या ठिकाणी 30 सप्टेंबर 1993 रोजी मोठा भूकंप (Latur Earthquake) झाला. या भूकंपामध्ये 10 हजार लोकांचा मृत्यू झाला, तर सुमारे 16 हजार लोक जखमी झाले. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 3.56 वाजता लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत हा भूकंप झाला. या भूकंपाचे केंद्र सोलापूरच्या ईशान्येस 70 किमी अंतरावर होते. 6.04 रिश्टर स्केलच्या या भूकंपामध्ये या परिसरातील 52 गावांतील 30 हजार घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली तर 13 जिल्ह्यांतल्या 2 लाख 11 हजार घरांना तडे गेले. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा आणि लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यांना ह्या भूकंपाचा सर्वात जास्त फटका बसला. या दोन तालुक्यांतील एकूण 52 गावे उद्‌ध्वस्त झाली. 

1996- मद्रासचे नाव चेन्नई झालं 

तामिळनाडूची राजधानी मद्रास या शहराचं नाव 30 सप्टेंबर 1996 रोजी बदलण्यात आलं. या शहराचं नाव चेन्नई (Chennai) असं करण्यात आलं. 

2008- जोधपूरच्या मंदिरात अफवेमुळे चेंगराचेंगरी, 224 लोकांचा मृत्यू 

30 सप्टेंबर 2008 रोजी जोधपूरच्या (Jodhpur) एका मंदिरात बॉम्ब असल्याची अफवा पसरली आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. त्यामध्ये 224 लोकांचा मृत्यू झाला. 

2009- इंडोनेशियातील भूकंपामध्ये 1100 लोकांचा मृत्यू 

30 सप्टेंबर 2009 रोजी पश्चिम इंडोनेशियामध्ये (Indonesia Earthquake)  भूकंप झाला आणि त्यामध्ये 1100 लोकांचा मृत्यू झाला होता. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 09 March 2025 : 08 March 2025ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06PM 09 March 2025Dhananjay Deshmukh And Vaibhavi Deshmukh | सरकारचे डोळे कधी उघडणार? वैभवीचा संतप्त सवाल, तर सर्व पुरावे मुख्यमंत्र्यांना देणार, धनंजय देशमुखांची माहितीRaj Thackeray VS BJP Minister | राज ठाकरेंचं कुंभमेळ्याबाबत वक्तव्य, भाजप नेत्यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
Khokya Satish Bhosle:
"माफीच्या लायकीचा नाही..."; हरिण, काळवीट मारणाऱ्या खोक्या उर्फ सतीश भोसलेला बिष्णोई गँगकडून धमकी
तब्बल 9 वर्षांनी पतंजली फूड अँड हर्बल पार्क लोकार्पण, मी मुख्यमंत्री होण्याची वाट हे पार्क पाहत होतं, देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
मुख्यमंत्री होण्याची वाट पतंजली फूड अँड हर्बल पार्क पाहत होतं; देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
BJP on Raj Thackeray : घरात बसून कुंभमेळ्याचं पाणी अस्वच्छ म्हणणं चुकीचं; राज ठाकरेंवर भाजपचा पहिला पलटवार
घरात बसून कुंभमेळ्याचं पाणी अस्वच्छ म्हणणं चुकीचं; राज ठाकरेंवर भाजपचा पहिला पलटवार
Embed widget