एक्स्प्लोर

25 September In History : जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि माजी उपपंतप्रधान चौधरी देवी लाल यांचा जन्म, 25 सप्टेंबर आहे या घटनांचा साक्षीदार

On This Day In History :  भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म 25 सप्टेंबर 1916 रोजी मथुरा येथे झाला. शिवाय  भारताचे माजी उपपंतप्रधान चौधरी देवी लाल यांचाही जन्म 25 सप्टेंबर 1914 रोजी झाला होता. 

मुंबई : 25 सप्टेंबर हा दिवस भारतासाठी खूप महत्वपूर्ण आहे. कारण आजच्या दिवशी  दोन मोठ्या राजकीय दिग्गजांचा जन्म झाला. भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म 25 सप्टेंबर 1916 रोजी मथुरा येथे झाला. तर भारताचे माजी उपपंतप्रधान चौधरी देवी लाल यांचा जन्म 25 सप्टेंबर 1914 रोजी हिस्सार जिल्ह्यातील तेजखेडा गावात झाला. पंडित दीनदयाळ उपाध्याय जेव्हा पदवीचे शिक्षण घेत होते, तेव्हा ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) संपर्कात आले आणि ते आरएसएसचे प्रचारक बनले. भारतीय जनसंघाचा पाया 1951 साली घातला गेला आणि श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यासमवेत या पक्षाच्या स्थापनेचे संपूर्ण काम त्यांनी केले. भारताचे माजी उपपंतप्रधान चौधरी देवी लाल यांचाही जन्म 25 सप्टेंबर 1914 रोजी झाला होता. हरियाणात ते 'ताऊ देवी लाल' या नावाने प्रसिद्ध राहिले. हरियाणाच्या राजकारणात त्यांचा बराच दबदबा होता आणि त्याच लोकप्रियतेमुळे ते राष्ट्रीय राजकारणाच्या मंचावरही मोठी भूमिका बजावू शकले.

1974 : पाचवी पंचवार्षिक योजना पूर्ण झाली 
पाचव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 1974 ते 1978 असा होता. मार्च 1978 मध्ये जनता पक्षाच्या सरकारने चार वर्षांनी 'पाचवी योजना' पूर्ण केली. या योजनेत गरिबी हटवणे, गरिबांच्या किमान गरजा पूर्ण करण्यासाठी कार्यक्रम राबवणे, कुटुंब नियोजन प्रभावीपणे करणे हे नियोजन आयोगाचे ध्येय होते.

1985:  पंजाबमध्ये अकाली दलाने निवडणूक जिंकली 
स्वतंत्र राज्याची निर्मिती झाल्यावर (1966) अकाली दलाला निवडणुकीचे राजकारण आणि राज्यकारभाराचे प्रश्न या दोघांना तोंड देणे भाग पडले. 1980 च्या दशकात दहशतवादी चळवळ आणि त्यांची स्वतंत्र राज्याची व राष्ट्राची मागणी यामुळे अकाली दलात फूट पडली. त्या भावनिक संघर्षातून आणि धुंदीतून सावरायला अकाली दलाला वेळ लागला आणि त्यानंतर झालेल्या राजीव - लोंगोवाल करारानंतरही मध्यंतरीच्या काळात घडलेल्या घटनांच्या छायेतून संपूर्णपणे बाहेर पडणे अकाली दलाला शक्य झाले नाही. पंजाबमध्ये भिंद्रनवाले यांच्या उदयानंतर दहशतवाद वाढीला लागलाच होता. त्या आगीत केंद्राच्या या दडपशाहीची भर पडली. दिल्लीमध्ये झालेल्या शीख विरोधी दंगली आणि देशात इतरत्र उठलेले प्रतिसाद यामुळे शीख समाज देशामध्ये एकाकी पडला. ब्लू स्टार कारवाईनंतर देशातील धरपकड झालेले बरेचसे अकाली नेते अनेक महिने तुरुंगात घालवून अखेर मार्च 1985 मध्ये मुक्त झाले. त्यांनी पंजाबमधील धार्मिक अतिरेकीपणा आणि दहशतवाद यांना आळा घालण्याचे प्रयत्न केले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत अकाली दलाने विजय मिळवला. 

1914: भारताचे माजी उपपंतप्रधान चौधरी देवी लाल यांचा जन्म
भारताचे माजी उपपंतप्रधान चौधरी देवी लाल यांचाही जन्म 25 सप्टेंबर 1914 रोजी झाला होता. हरियाणात ते 'ताऊ देवी लाल' या नावाने प्रसिद्ध राहिले. हरियाणाच्या राजकारणात त्यांचा बराच दबदबा होता आणि त्याच लोकप्रियतेमुळे ते राष्ट्रीय राजकारणाच्या मंचावरही मोठी भूमिका बजावू शकले.

1916 : भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा जन्म 
भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म 25 सप्टेंबर 1916 रोजी मथुरा येथे झाला. तर भारताचे माजी उपपंतप्रधान चौधरी देवी लाल यांचा जन्म 25 सप्टेंबर 1914 रोजी हिस्सार जिल्ह्यातील तेजखेडा गावात झाला. पंडित दीनदयाळ उपाध्याय जेव्हा पदवीचे शिक्षण घेत होते, तेव्हा ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) संपर्कात आले आणि ते आरएसएसचे प्रचारक बनले. भारतीय जनसंघाचा पाया 1951 साली घातला गेला आणि श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यासमवेत या पक्षाच्या स्थापनेचे संपूर्ण काम त्यांनी केले.

2008 : चीनने 'शेन्झाओ 7' हे अंतराळयान प्रक्षेपित केले 

गेली काही वर्षं सातत्याने अंतराळ संशोधनात चीनने भरीव कामगिरी करत, 'स्पेस पॉवर' बनण्याच्या दिशेनं पावलं उचलली आहेत. 25 सप्टेंबर 2005 रोजी चीनने 'शेन्झाओ 7' हे अंतराळयान प्रक्षेपित केले. 

2018 : महेंद्र सिंह धोनीचा विक्रम 

दुबईतील आशिया चषक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करून 200 एकदिवसीय सामन्यांचे नेतृत्व करणारा महेंद्रसिंग धोनी पहिला भारतीय ठरला. 

2020 : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगचा उदय 

भारतीय वैद्यकीय परिषदेच्या जागी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) अस्तित्वात आला. भारतातील वैद्यकीय शिक्षण संस्था आणि वैद्यकीय व्यावसायिकांच्या नियमनासाठी धोरणे आखण्याचा अधिकार या आयोगाला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget