2 November In History : अभिनेता शाहरूख खानचा वाढदिवस, 2 नोव्हेंबर 'या' घटनांसाठी आहे खास
On This Day In History : आज म्हणजे 2 नोव्हेंबर रोजी बॉलिवूड किंग अभिनेता शाहरुख खानचा वाढदिवस आहे. 2 नोव्हेंबर 1965 रोजी दिल्लीत शाहरूख खानचा जन्म झाला.
मुंबई : नोव्हेंबर महिन्याचा दुसरा दिवस म्हणजे 2 नोव्हेंबर रोजी बॉलिवूड किंग अभिनेता शाहरुख खानचा वाढदिवस आहे. 2 नोव्हेंबर 1965 रोजी दिल्लीत जन्मलेला शाहरुखने टेलिव्हिजनवरील मालिकांमधून आपला ठसा उमटवल्यानंतर चित्रपटांकडे वळला आणि रुपेरी पडद्यावरचा त्याचा पहिला चित्रपट "दीवाना" होता. 'डर', 'अंजाम' आणि 'बाजीगर' सारख्या काही चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका केल्या. 'राजू बन गया जेंटलमन' आणि 'फिर भी दिल है हिंदुस्तानी', 'डुप्लिकेट' किंवा 'देवदास', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'माय नेम इज खान' आणि 'चक दे' सारखे हलकेफुलके चित्रपटांमधूल शाहरूख घरा-घरात पोहोचला. शाहरुख खानने 'रईस' आणि 'डॉन' सारख्या चित्रपटातही क्राइम गँगस्टरची भूमिका साकारली. शाहरुख खान तीन दशकांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.
1833: समाजसुधारक महेन्द्र लाल सरकार यांचा जन्म
होमिओपॅथ, समाजसुधारक आणि विज्ञानप्रसारक, इंडियन असोसिएशन ऑफ कल्टिव्हेशन ऑफ सायन्स या संस्थेचे सहसंस्थापक महेन्द्र लाल सरकार यांचा जन्म आजच्या दिवशी म्हणजे 2 नोव्हेंबर 1833 मध्ये झाला. तर त्यांचा मृत्यू23 फेब्रुवारी 1904 रोजी कलकत्ता येथे झाला. ते कलकत्ता मेडिकल कॉलेजचे दुसरे पदवीधर वैद्यकीय डॉक्टर होते. त्यांनी अॅलोपॅथीचे शिक्षण घेतले असले तरी त्यांनी होमिओपॅथीचा अवलंब करून त्याद्वारे उपचार केले. आपल्या व्यावसायिक जीवनात त्यांनी त्या काळातील अनेक महान व्यक्तींवर उपचार केले होते.
1834 : अॅटलस जहाज भारतीय मजुरांना घेऊन मॉरिशसला पोहोचले
अॅटलस नावाचे जहाज भारतीय मजुरांना घेऊन मॉरिशसला पोहोचले. त्यामुळे 2 नोव्हेंबर हा दिवस मॉरिशसमध्ये प्रवासी दिवस म्हणून साजरा केला जातो. आज मॉरिशस जो काही आहे त्याचे मोठे श्रेय तिथे गेलेल्या भारतीय मजुरांना जाते. त्यांनी आपल्या मेहनतीने या देशाला नवी ओळख दिली आहे. अॅटलसमधून मॉरिशसला पोहोचलेल्या मजुरांपैकी 80 टक्के बिहारचे मजूर होते. त्यांना कराराच्या आधारे आणलेले मजूर म्हणजे इंडेंटर्ड मजूर असे संबोधले जात असे. या मजुरांना मॉरिशसला नेहने म्हणजे या देशाला कृषीप्रधान देश म्हणून विकसित करण्याचा उद्देश होता. 1834 ते 1924 या काळात ब्रिटिशांनी भारतातून अनेक मजूर मॉरिशसला नेले.
1917 : ब्रिटनने बाल्फोर घोषणापत्र जारी केले
2 नोव्हेंबर 1917 रोजी ब्रिटनने बाल्फोर घोषणापत्र जारी केले. याद्वारे पॅलेस्टाईनमध्ये ज्यूंसाठी होम टेरिटरी स्थापन करण्याचे मान्य करण्यात आले.
1936 : ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनचे पहिले दूरदर्शन चॅनेल लॉन्च
ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने (बीबीसी) अधिकृतपणे त्यांचे पहिले दूरदर्शन चॅनेल लॉन्च केले. जगातील पहिली नियमित दूरदर्शन सेवा देण्यास 2 नोव्हेंबर 1936 पासून सुरूवात झाली. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनचे (BBC) मुख्यालय लंडन येथे आहे. हा जगातील सर्वात जुना राष्ट्रीय माध्यम समूह आहे.
1940 : दुसरे महायुद्ध युद्ध ग्रीस आणि इटली यांच्यात सुरू झाले
आजच्या दिवशी म्हणजे 2 नोव्हेंबर 1940 रोजी दुसरे महायुद्ध ग्रीस आणि इटली यांच्यात युद्ध सुरू झाले. दुसरे महायुद्ध हे 1939 ते 1945 दरम्यान झाले. हे युद्ध युरोप आणि आशियामधील दोस्त राष्ट्रे आणि अक्ष राष्ट्रे यांच्यात झाले. जर्मनीने पोलंडवर केलेल्या हल्ल्याने हे युद्ध १ सप्टेंबर 1939 रोजी अधिकृतपणे सुरू झाले. यानंतर फ्रान्स, युनायटेड किंग्डम आणि इतर राष्ट्रांनी जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले. जपानने व इटलीने जर्मनीच्या बाजूने युद्धात पदार्पण केले. 1941 च्या डिसेंबरमध्ये जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर बंदरावर आक्रमण केल्यामुळे अमेरिकेला युद्धात उतरणे भाग पाडले.
1949 : हॉलंड आणि इंडोनेशियाच्या हेग करारावर स्वाक्षरी
हॉलंड आणि इंडोनेशियाने इंडोनेशियाच्या स्वातंत्र्याच्या घोषणेवरील वाद संपवण्यासाठी 2 नोव्हेंबर 1949 रोजी हेग करारावर स्वाक्षरी केली. या करारानंतर दोन्ही देशांमधील वाद मिटला.
1950 : लेखक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचे निधन
जॉर्ज बर्नार्ड शॉ हे नोबेल पारितोषिक विजेते लेखक होते. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा जन्म शनिवार 26 जुलै 1856 रोजी डब्लिन येथे झाला. तर 2 नोव्हेंबर 1950 रोजी वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. आर्म्स अँड द मॅन हे त्यांचे प्रसिद्ध नाटक आहे. याशिवाय त्यांची पहिली कादंबरी अपरिपक्वता या नावाने खूप लोकप्रिय झाली.
1976 : जिमी कार्टर अमेरिकेचे 39 वे राष्ट्राध्यक्ष बनले
जिमी कार्टर हे 2 नोव्हेंबर 1976 रोजी अमेरिकेचे 39 वे राष्ट्राध्यक्ष बनले. ते 1976 ते 1980 पर्यंत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी होते. अध्यक्ष होण्यापूर्वी त्यांनी युनायटेड स्टेट्स नेव्हीमध्ये नोकरी केली. शिवाय जॉर्जियामध्ये सिनेटर म्हणून काम केले. राष्ट्राध्यक्षपदानंतर ते मानवाधिकार संघटना आणि परोपकारी संस्थांशी जोडले गेले. त्यांना 2002 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता.
1965 : अभिनेता शाहरुख खानचा वाढदिवस
नोव्हेंबर महिन्याचा दुसरा दिवस म्हणजे 2 नोव्हेंबर रोजी बॉलिवूड किंग अभिनेता शाहरुख खानचा वाढदिवस आहे. 2 नोव्हेंबर 1965 रोजी दिल्लीत जन्मलेला शाहरुखने टेलिव्हिजनवरील मालिकांमधून आपला ठसा उमटवल्यानंतर चित्रपटांकडे वळला आणि रुपेरी पडद्यावरचा त्याचा पहिला चित्रपट "दीवाना" होता. 'डर', 'अंजाम' आणि 'बाजीगर' सारख्या काही चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका केल्या. 'राजू बन गया जेंटलमन' आणि 'फिर भी दिल है हिंदुस्तानी', 'डुप्लिकेट' किंवा 'देवदास', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'माय नेम इज खान' आणि 'चक दे' सारखे हलकेफुलके चित्रपटांमधूल शाहरूख घरा-घरात पोहोचला. शाहरुख खानने 'रईस' आणि 'डॉन' सारख्या चित्रपटातही क्राइम गँगस्टरची भूमिका साकारली. शाहरुख खान तीन दशकांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.
1986 : अमेरिकन नागरिक डेव्हिड जेकबसनची 17 महिन्यांनंतर सुटका
बेरूतमध्ये मुस्लिम अतिरेक्यांनी ओलिस ठेवलेल्या अमेरिकन नागरिक डेव्हिड जेकबसनची 2 नोव्हेंबर 1986 रोजी 17 महिन्यांनंतर सुटका केली.
2012 : भारतीय अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक श्रीराम शंकर अभ्यंकर यांचे निधन
श्रीराम शंकर अभ्यंकर यांचा जन्म 22 जुलै 1930 रोजी झाला. ते बीजगणितीय भूमितीतील योगदानासाठी ओळखले जाणारे भारतीय अमेरिकन गणितज्ञ होते. त्यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांनी पर्ड्यू विद्यापीठात गणिताचे मार्शल प्रतिष्ठित प्राध्यापक पद भूषवले होते. ते संगणक विज्ञान आणि औद्योगिक अभियांत्रिकीचे प्राध्यापक देखील होते. ते अभ्यंकरांच्या परिमित समूह सिद्धांताच्या अनुमानासाठी प्रसिद्ध आहेत.
2020 : काबूल विद्यापीठात बंदुकधारींच्या हल्ल्यात 25 जण ठार
2 नोव्हेंबर 2020 रोजी अफगाणिस्तानमधील काबूल विद्यापीठात बंदुकधाऱ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 25 जण ठार झाले. तीन बंदूकधाऱ्यांनी काबुल विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये हल्ला केला. यात 25 जण ठार झाले. तर 50 जण जखमी झाले. तीन बंदूकधारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झाले.
2020 : प्रियंका राधाकृष्णन या न्यूझीलंडच्या पहिल्या भारतीय वंशाच्या मंत्री बनल्या
प्रियंका राधाकृष्णन या 2 नोव्हेंबर 2020 रोजी न्यूझीलंडच्या पहिल्या भारतीय वंशाच्या मंत्री बनल्या.