एक्स्प्लोर

10 October In History : चीनी क्रांतीला सुरुवात, सौंदर्याची महाराणी रेखाचा जन्म; 10 ऑक्टोबर आहे या घटनांचा साक्षीदार 

On This Day In History : अभिनेत्री रेखाचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजे 10 ऑक्टोबर 1954 रोजी झाला होता. रेखाने आपल्या सोंदर्याच्या आणि अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडवर राज्य केलं आहे. 

मुंबई : आजचा दिवस भारतातील अभियांत्रिकी क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता आणि औद्योगिक शहर असलेल्या हावडा या दरम्यान बांधण्यात आलेला विद्यासागर सेतू वाहतूकीसाठी आजच्या दिवशी म्हणजे 10 ऑक्टोबर 1992 रोजी खुला करण्यात आला होता. तसेच सौंदर्याची महाराणी असलेल्या अभिनेत्री रेखाचा आजच्याच दिवशी म्हणजे 10 ऑक्टोबर 1954 रोजी जन्म झाला होता. जाणून घेऊया आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं होतं. 

1845- अमेरिकेत नौदल अकादमीची स्थापना 

अमेरिकेचे नौदल हे सर्वश्रेष्ठ बनवण्यासाठी अमेरिकन सरकारकडून 10 ऑक्टोबर 1845 रोजी मेरिलँड या ठिकाणी नौदल अकादमीची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये नौदलासंबंधी वेगवेगळे प्रशिक्षण देण्यात येत होतं. 

1846- ट्रायटन उपग्रहाचा शोध 

ब्रिटनचे खगोलशास्त्रज्ञ विल्यम्स लासेल यांनी नेपच्यूनपेक्षा मोठा ग्रह असलेल्या ट्रायटन या उपग्रहाचा शोध लावला होता. 10 ऑक्टोबर 1846 रोजी हा शोध लावला होता.

1911- चीनी क्रांतीला सुरुवात 

चीनच्या क्रांतीकारकांच्या एका गटाने 10 ऑक्टोबर 1911 रोजी वूचांग राजवटीविरोधात बंड केला. ही घटना म्हणजे चीनी क्रांतीची सुरुवात असल्याचं सांगितलं जातंय. त्यानंतर चीनच्या साम्राज्याला उलथवून लावण्यात आलं. 

1911- पहिल्या भारतीय हिंदी संमेलनाची घोषणा 

पंडित मदनमोहन मालविय यांच्या अध्यक्षतेखाली 10 ऑक्टोबर 1911 रोजी आखिल भारतीय हिंदी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. हे संमेलन देशातील पहिलं हिंदी संमेलन होतं. 

1954- अभिनेत्री रेखाचा जन्मदिन 

भारतीय चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्या रेखाचा (Rekha) जन्म 10 ऑक्टोबर 1954 रोजी झाला. आपल्या सौंदर्यतेने आणि अभिनयाने रेखाने बॉलिवूडवर राज्य केलं आहे. आपल्या अदाकारीने प्रसिद्ध असलेल्या रेखाचं संपूर्ण नाव भानुरेखा गणेशन असं आहे. सावन भादो या चित्रपटातून तिन बॉलिवूडवर राज्य केलं आहे. दो अनजाने, उमराव जान, मुकद्दर का सिकंदर, खुबसूरत, सिलसिला  या चित्रपटांतील अभिनय विशेष गाजला. सिलसिला या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान रेखा आणि अमिताभच्या प्रेमप्रकरणाची चर्चा जोरात सुरू होती. 

1970- फिजी देश स्वातंत्र्य झाला

ब्रिटनच्या गुलामीत असलेल्या फिजी या देशाने 10 ऑक्टोबर 1970 रोजी गुलामगिरी झुगारून स्वत: स्वातंत्र्य झाल्याचं जाहीर केलं. 

1978- रोहिणी खाडिलकर पहिली बुद्धीबळ चॅम्पियन 

बुद्धीबळपटू रोहिणी खाडिलकर यांनी 10 ऑक्टोबर 1970 रोजी बुद्धीबळातील राष्ट्रीय चॅम्पियनशिपची स्पर्धा जिंकली. अशी कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. 

1980- उत्तर अल्जेरियामध्ये भूकंप, 20 हजार लोकांचा मृत्यू 

10 ऑक्टोबर 1980 रोजी उत्तर अल्जेरियातील अल अस्नाम या शहरात मोठा भूकंप झाला. त्यामध्ये 20 हजाराहून जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला. 

1992- कोलकाता-हावडा दरम्यानचा विद्यासागर सेतू वाहतुकीसाठी खुला 

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता आणि औद्यागिक शहर असलेल्या हावडाला जोडण्यासाठी बनवण्यात आलेला विद्यासागर सेतू हा आजच्याच दिवशी म्हणजे 10 ऑक्टोबर 1992 रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. अभियांत्रिकी कौशल्याचा अद्भूत नमुना असलेल्या हा पूर केबलपासून तयार करण्यात आलेला देशातील सर्वात मोठा पूल होता. 

2011- गझलकार जगजित सिंह यांचे निधन 

प्रसिद्ध गझलकार आणि गायक असलेल्या जगजित सिंह (Jagjit Singh) यांचे 10 ऑक्टोबर 2011 रोजी निधन झालं. त्यांनी आपल्या आवाजाने कोट्यवधी भारतीयांच्या मनावर राज्य केलं. खालिस उर्दूची त्यांना जाण होती. त्यांनी हिंदीसोबतच उर्दू, पंजाबी, भोजपूरी सह इतर अनेक भाषेत गायन केलं. 2003 साली त्यांना भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. जगजित सिंह यांना गझलच्या दुनियेचा बादशाह असं म्हणण्यात यायचं. होठों से झुलो तुम मेरा गीत अमर कर दो, ओ मॉं तुझे सलाम, चिठ्ठी ना कोई संदेश, होश वालों को खबर क्या अशा एकाहून एक प्रसिद्ध गझलांचे गायन त्यांनी केलं. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget