1 october In History : 1 ऑक्टोबर भाषिक आधारावर आंध्र प्रदेश राज्याची घोषणा, मुलींचे लग्नाचे वय 14 वर्षावरून 18 वर्षे केले
On This Day In History : 1 ऑक्टोबर 1953 हा दिवस आंध्र प्रदेशची भाषेवार घोषणा करण्यात आहे. याबरोबरच आजच्या दिवशी म्हणजे 1 ऑक्टोबर 1978 रोजी मुलींचे लग्नाचे वय 14 वर्षावरून 18 करण्यात आले.
मुंबई : इतिहासाच्या पानांमध्ये नोंदवलेल्या वर्षातील 365 दिवसांपैकी प्रत्येक दिवसाचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. कारण प्रत्येक तारीख ही कोणत्या ना कोणत्या मोठ्या घटनेची साक्षीदार असते. 1 ऑक्टोबर 1953 हा दिवस आंध्र प्रदेशची भाषेवार घोषणा झाल्यामुळे या दिवसाला आंध्र प्रदेशचा निर्मिती दिवस म्हणून इतिहासात नोंदवला गेला आहे. या दिवसाच्या इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल सांगायचे तर आजच्या दिवशी म्हणजे 1 ऑक्टोबर 1978 रोजी मुलींचे लग्नाचे वय 14 वर्षावरून 18 वर्षे आणि मुलांचे वय 18 वरून 21 वर्षे करण्यात आले होते.
1574 : शीख गुरु अमर दास यांचे निधन
शीखांचे तिसरे गुरु गुरू अमर दास यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1574 रोजी अमृतसरमधील 'बासर ' या गावी झाला. गुरु अमरदासजी हे एक महान आध्यात्मिक विचारवंत होते. दिवसभर शेती आणि व्यवसायात व्यस्त असूनही ते हरिनामाचा जप करण्यात मग्न असत. लोक त्यांना भक्त अमर दासजी म्हणायचे.
1847 : अॅनी बेझंट यांचा लंडनमध्ये जन्म झाला
डॉ. अॅनी बेझंट यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1847 रोजी झाला. त्या एक अग्रगण्य अध्यात्मवादी, थिऑसॉफिस्ट, महिला हक्कांच्या पुरस्कर्त्या, लेखिका, वक्त्या आणि भारतप्रेमी महिला होत्या. 1917 मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षाही झाल्या. अॅनी बेझंट यांच्या प्रेरणेने भारतातील अनेक समाजसेवकांना बळ मिळाले.
1854 : भारतात टपाल तिकीट सुरू झाले
आजच्या दिवशी म्हणजेच 1 ऑक्टोबर 1854 रोजी भारतात टपाल तिकीट सुरू झाले. अर्धा आना, एक आना, दोन आना आणि चार आना अशी टपाल तिकिटे काढण्यात आली. हे पहिले टपाल तिकीट त्यावेळच्या कलकत्ता आणि आताच्या कोलकाता येथे छापले गेले.
1953 : भाषिक आधारावर आंध्र प्रदेश राज्याची घोषणा
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. मात्र हैदराबादच्या निजामाला भारतापासून आपले स्वातंत्र्य टिकवून ठेवायचे होते. परंतु, तेथील लोकांनी भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी चळवळ सुरू केली. हैदराबाद राज्यातील लोकांचा पूर्ण पाठिंबा असलेल्या ऑपरेशन पोलोच्या पाच दिवसांनंतर हैदराबाद राज्याला 1948 मध्ये भारतीय प्रजासत्ताकचा भाग बनण्यास भाग पाडले गेले. त्यानंतर अमरजीवी पोट्टी श्रीरामुलू यांनी स्वतंत्र राज्य मिळविण्यासाठी आणि मद्रास राज्यातील तेलुगू लोकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी प्राणांतिक उपोषण केले. यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर लोक आक्रमक झाले. लोकांची आक्रमक भूमिका पाहून तत्कालीन भारत सरकारला तेलुगू भाषिक लोकांसाठी नवीन राज्य निर्माण करण्याची घोषणा करण्यास भाग पडले. त्यानुसार 1 ऑक्टोबर 1953 रोजी आंध्र प्रदेशने कुर्नूलला आपली राजधानी घोषित करण्यासह भाषेच्या आधारावर राज्याचा दर्जा मिळवला. त्यामुळे हा दिवस आंध्र प्रदेशमध्ये राज्याचा भाषेनुसार निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. 1 नोव्हेंबर 1956 रोजी आंध्र प्रदेश राज्याची स्वतंत्र राज्य म्हणून स्थापना झाली आणि हैदराबादला आंध्र प्रदेशची राजधानी घोषित करण्यात आले. त्या दिवसापासून 1 नोव्हेंबर हा दिवस आंध्र प्रदेश राज्याची स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानंतर आंध्र प्रदेशपासून वेगळे करून भारताचे 28 वे राज्य म्हणून तेलंगणा राज्याची निर्मिती झाली. तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर हैदराबादला दहा वर्षे आंध्र प्रदेश आणि तलेंगणा या दोन्ही राज्याची संयुक्त राजधाणी म्हणून घोषित करण्यात आले. नंतर हैदराबादला तेलंगणा राज्यात विलीन करून तेलंगणाची राजधाणी म्हणून घोषित केले. सध्या हैदराबाद हीच तेलंगणाची राजधाणी आहे.
1958 : वजनासाठी मेट्रिक प्रणाली भारतात सुरू झाली
ब्रिटीशांच्या काळात ब्रिटीशांनी देशभरात एकसमान मोजमाप पद्धत विकसित केली. वजनाची एकके मान, सेर, चंटक, तोळा, माशा आणि रत्ती अशी होती. जमिनीचे मोजमाप करण्यासाठी मैल, एकर, गज, फूट, इंच यांचा वापर केला जात असे. इंग्रजांनी विकसित केलेली ती व्यवस्था स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही 1958 पर्यंत वापरली जात होती. 1958 मध्ये भारत सरकारने मोजमापाची नवीन मानके स्थापित केली आणि मोजमापाची मेट्रिक पद्धत देशभरात एक ट्रेंड बनली.
1967 : भारतीय पर्यटन विकास महामंडळाची स्थापना
भारतीय पर्यटन विकास महामंडळ (ITDC) ची स्थापना 1 ऑक्टोबर 1966 रोजी झाली. पर्यटकांना भारतात आकर्षित करण्यासाठी याची स्थापना करण्यात आली होती. देशातील प्रगतीशील विकास, प्रोत्साहन आणि पर्यटनाच्या विस्तारामध्ये ITDC ची मोठी भूमिका आहे. भारतीय पर्यटन विकास महामंडळाकडे देशातील प्रत्येक राज्य आणि महत्त्वाच्या भागात उत्तम हॉटेल आणि राहण्याची व्यवस्था आहे. भारतीय पर्यटन विकास महामंडळ संचालित सफारी लॉजमध्ये पर्यटकांसाठी वातानुकूलित राहण्याची सोय आहे.
1978 : बालविवाह कायद्यात सुधारणा
आजच्या दिवशी म्हणजे 1 ऑक्टोबर 1978 रोजी मुलींचे लग्नाचे वय 14 वर्षावरून 18 वर्षे आणि मुलांचे वय 18 वरून 21 वर्षे करण्यात आले होते.
1960 : नायजेरियाला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
1969 : कॉनकॉर्ड विमान प्रथमच ध्वनीगती पेक्षा जोरात उडण्यात यशस्वी झाले
1971 : अमेरिकेतील वॉल्ट डिस्ने वर्ल्ड सुरु झाले.
1982 : सोनी कंपनीने पहिले कॉम्पॅक्ट डिस्क प्लेयर प्रकाशित केले.
1992 : कार्टून नेटवर्क सुरु झाले.
2002 : भारतीय दंड संहिता, मोटार वाहन कायदा, 1988 आणि मुंबई प्रतिबंधक कायदा 1949 अंतर्गत सलमान खान वर गुन्हा दाखल झाला. तसेच मुंबई पोलिसांनी सलमान विरुद्ध भारतीय दंड संहिता कला 304(भाग-२) अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.
2005 : इंडोनेशियातील बाली बेटांवर बॉम्बस्फोटांत 19 जण ठार झाले.