इजिप्त-इस्त्रायलमध्ये ऐतिहासिक शांतता करार आणि आंतरराष्ट्रीय बांबू दिवस, जाणून घ्या 18 सप्टेंबरला इतिहासात काय घडलं
18 September In History : शबाना आझमी यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला आहे. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीमध्ये वेगळाच ठसा उमटवला आहे.

मुंबई: एकमेकांचे कट्टर शत्रू असलेल्या इजिप्त आणि इस्त्रायलने 18 सप्टेंबरला ऐतिहासिक अशा शांतता करारावर स्वाक्षरी केली. या दोन देशांमध्ये झालेल्या या करारामुळे अरबी देशांसह संपूर्ण जगाला आश्चर्य वाटलं. इस्त्रायल आणि इजिप्त हे एकमेकांचे कट्टर शत्रू होते. इजिप्तच्या अन्वर सादत यांच्या भूमिकेवर त्यावेळी अरबी राष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. जाणून घेऊया 18 सप्टेंबरला इतिहासात काय घडलं होतं,
1180- फिलिक ऑगस्टस फ्रान्सचा राजा
1502 ख्रिस्तोफर कोलंबस कोस्टारिकाच्या समुद्रकिनारी पोहोचला.
1810- चिलीने स्वत:ला स्वातंत्र्य देश घोषित केलं
चीली या लॅटिन अमेरिकेच्या देशाने स्पेनची गुलामगिरी झटकून स्वत:ला स्वातंत्र्य जाहीर केलं.
1812- मॉस्कोत आग, 12 हजार लोकांचा मृत्यू
सोव्हिएत रशियामध्ये आजच्या दिवशी 1812 साली एक भीषण आग लागली. त्यामध्ये तब्बल 12 हजार लोकांचा मृत्यू झाला. मॉस्कोतील या आगीमुळे अर्ध्याहून जास्त शहर जळून खाक झालं.
1851- द न्यूयॉर्क डेली टाईम्स या वृत्तपत्राची सुरुवात
1899- बंगाली भाषेतील प्रसिद्ध लेखक आणि बंगाली सुधारणावादी राजनारायण बोस यांचे निधन
1919- हॉलंडमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला
1947- भारतात राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम लागू
भारतात आजच्या दिवशी, 1947 साली राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम लागू करण्यात आला.
1950 शबाना आझमी यांचा जन्मदिवस
भारतीय चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाने वेगळाच ठसा उमटवणाऱ्या शबाना आझमी यांचा आज जन्मदिवस आहे. शबाना आझमी या प्रसिद्ध शायर आणि गितकार कैफी आझमी यांच्या कन्या असून प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या त्या पत्नी आहेत.
1978- इजिप्त आणि इस्त्रायलमध्ये शांती करार
एकमेकांचे कट्टर शत्रू असलेल्या इस्त्रायल आणि इजिप्तमध्ये आजच्याच दिवशी, 1978 साली शांततेचा करार झाला. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती जिमी कार्टर यांनी या करारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. इजिप्तचे अध्यक्ष अन्वर अल सादत आणि इस्त्रायले पंतप्रधान मेनाकम बेगिन यांनी या करारावर सह्या केल्या. इजिप्तने इस्त्रायलसोबत केलेल्या करारामुळे अरब राष्ट्रांना मोठा धक्का बसला. इस्त्रायसोबत अशा प्रकारचा करार करणारे इजिप्त हे पहिलेच अरब राष्ट्र होतं.
1986- महिला पायलटने पहिल्यांदाच विमानाचे उड्डाण केलं
आजच्या दिवशी भारतात पहिल्यांदाच एका महिला पायलटने विमानाचं उड्डाण केलं. मुंबई ते गोवा या मार्गावर हे उड्डाण करण्यात आलं.
1992- मोहम्मद हिदायतुल्ला यांचे निधन
भारताचे 11 वे सरन्यायाधीश आणि कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून काम केलेल्या मोहम्मद हिदायतुल्ला यांचे निधन झालं.
2009 आंतरराष्ट्रीय बांबू दिवस साजरा
जागतिक स्तरावर बांबूच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी 18 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय बांबू दिवस म्हणून साजरा करण्याचं जाहीर करण्यात आलं. 2009 साली ही घोषणा करण्यात आली. बांबूचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्याच्या उत्पादनाला चालना देणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. भारत चीननंतर बांबूचा सर्वात मोठा उत्पादक देश असून भारतात बांबूच्या 131 प्रजाती सापडतात.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
