(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Omnicron : बंगळुरु प्रशासनाला फुटला घाम; आफ्रिकेतून आलेले 10 परदेशी नागरिक 'नॉट रीचेबल'
Omnicron : आफ्रिकेतून बंगळुरुला आलेले दहा परदेशी नागरिक नॉट रीचेबल असल्याने बंगळुरु प्रशासनासमोरची चिंता वाढली आहे.
Omnicron : कर्नाटकात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे, ओमायक्रॉनचे दोन पेशंट सापडल्यानंतर प्रशासन अधिक सतर्क झालं आहे. पण एक धक्कादायक बातमी समोर आली असून आफ्रिकेतून बंगळुरुला आलेले दहा परदेशी नागरिक नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे आता बंगळुरु प्रशासनाला घाम फुटला आहे.
कर्नाटकात आता ओमायक्रॉनच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर अधिक कडक उपाययोजना केल्या जात आहे. परदेशातून विशेषत: आफ्रिकन देशांतून आलेल्या सर्व प्रवाशांची माहिती घेण्यात येत आहे. पण बंगळुरुमध्ये आलेल्या दहा परदेशी नागरिकांशी संपर्क होत नाही. त्यांचा कोणताही पत्ता लागत नाही. त्यामुळे प्रशासन अधिक चिंतेत पडलं आहे.
या सर्व प्रवाशांची ट्रव्हल हिस्ट्री तपासली गेली असून त्याची डीटेल्स काढण्यात आली आहे. पण त्यांचा फोन स्वीच ऑफ असल्याने तो ट्रेसही करता येत नाही. एक 66 वर्षाचा व्यक्ती सर्वप्रथम बंगळुरुमध्ये आला होता. त्याचे एअरपोर्टवर सॅम्पल घेण्यात आले आहेत. आता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आल्याचं समोर आलं आहे.
मुख्यमंत्र्यानी घेतली बैठक, नवीन नियमावली जाहीर
कर्नाटकात ओमीक्रॉनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची बैठक झाली. या बैठकीत ओमीक्रॉनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विचारविनिमय करून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये आता विवाह, संमेलनं आदी कार्यक्रमासाठी केवळ पाचशे व्यक्तींना कोव्हिड नियमावलीचे पालन करून उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. केवळ दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच मॉल, चित्रपटगृहात प्रवेश दिला जाणार आहे. राज्यातील सगळ्या विमानतळावर प्रवाशांचे टेस्टिंग करण्यात येणार आहे. शाळेला जाणाऱ्या अठरा वर्षांखालील विद्यार्थ्यांच्या पालकांनी दोन्ही डोस घेणे बंधनकारक आहे.
आरोग्य खात्यात सेवा बजावणाऱ्या आणि 65 वर्षांवरील नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना देखील दोन डोस घेणे बंधनकारक आहे. प्रत्येकाने मास्क वापरणे आवश्यक असून मास्क वापरला नाही तर नगरपालिका, महानगरपालिका हद्दीतील व्यक्तींना 250 रुपये तर ग्रामीण भागातील व्यक्तींना 100 रुपयाचा दंड करण्यात येणार आहे.
कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहन आणि प्रवाशांची तपासणी करून आरटीपीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र असेल तरच प्रवेश दिला जाणार आहे. सीमेवरील चेकपोस्टवर आरोग्य, महसूल आणि पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांना चोवीस तास वेगवेगळ्या शिफ्टमध्ये तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
संबंधित बातम्या :
- Kolhapur Memes : बच्चनसाहेबांचा प्रश्न, जगातलं सर्वात मोठं कोव्हिड सेंटर कोणतं? उत्तर आहे 'कोगनोळी टोलनाका'... मीम्स होतायंत व्हायरल
- ऑक्सिजनवरुन राजकारण, राज्यांनी ऑक्सिजन अभावी मृतांची आकडेवारी दिली नाही; केंद्राचा राज्यांवर निशाणा
- Omicron : महाराष्ट्रात ओमायक्रॉन आलाय का? आरोग्यमंत्री टोपेंनी दिली महत्वाची माहिती