Omicron : महाराष्ट्रात ओमायक्रॉन आलाय का? आरोग्यमंत्री टोपेंनी दिली महत्वाची माहिती
महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात रुग्ण सापडल्यानं आता महाराष्ट्र सरकारही सावध झालं आहे. आरोग्य विभाग देखील सतर्क झाला असून आरोग्य विभागाचे याकडे बारीक लक्ष असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
जालना : ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्याचं कळताच केंद्रानं परदेशातून येणाऱ्यांसाठी नियम अधिक कडक केले भारतात आल्यानंतरही आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करुन सक्तीचं विलगीकरणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात रुग्ण सापडल्यानं आता महाराष्ट्र सरकारही सावध झालं आहे. कर्नाटकमध्ये आढलेल्या 2 ओमायक्रोनच्या रुग्णांमुळे महाराष्ट्रातील आरोग्य विभाग देखील सतर्क झाला असून आरोग्य विभागाचे याकडे बारीक लक्ष असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान हाय रिस्क देशातून आलेले रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील 28 जणांच्या स्वॅबचे नमुने जिनोमिक सिक्वेन्ससाठी पाठवण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे.
ओमायक्रोनवर आरोग्यमंत्र्यांचे आवाहन
कर्नाटकामध्ये आढळल्या दोन ओमायक्रोन रुग्णांमुळे राज्यात सतर्कतेचं आवाहन करत राज्यातील जनतेने कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आणि सर्वांनी लस घेण्याचे आव्हान आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.
'ओमायक्रॉन' मुंबईच्या उंबरठ्यावर?
'ओमायक्रॉन' मुंबईच्या उंबरठ्यावर आला आहे की काय अशी शंका आता उपस्थित केली जाऊ लागली आहे. कारण रिक्स असलेल्या देशातून आलेले 9 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. आता या 9 जणांच्या जिनोम सिक्वेसिंग अहवालाची प्रतीक्षा आहे. रिक्स असलेल्या देशातून 10 ते 30 नोव्हेंबर दरम्यान 2868 प्रवासी मुंबईत आले आहेत. यापैकी 485 प्रवाशांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यांपैकी 9 जण पॉझिटीव्ह आहेत. दरम्यान, या सगळ्यांचा जिनोम सेक्वेंसिंगचा अहवाल दोन दिवसांत येण्याची शक्यता असून या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती मिळाली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :