Omicron variant : ओमिक्रोन व्हेरिएंटला थोपवण्यात भारतीय सक्षम?, डॉ. रवी गोडसे म्हणतात...
ओमिक्रोन या नव्या कोरोनाच्या व्हेरिएंटनं जगभरातील देशांना चिंतेत टाकलं आहे. नवीन व्हेरिएंट यासंदर्भात एक सकारात्मक माहिती अमेरिकेतील भारतीय वंशाचे डॉ. रवी गोडसे यांनी दिलीय.
Omicron variant : ओमिक्रोन (Omicron) या नव्या कोरोना (Corona) च्या व्हेरिएंटनं जगभरातील देशांना चिंतेत टाकलं आहे. हा नवीन व्हेरिएंट डेल्टापेक्षा धोकादायक असल्याचं बोललं जात आहे. आता यासंदर्भात एक सकारात्मक माहिती अमेरिकेतील भारतीय वंशाचे डॉ. रवी गोडसे यांनी दिलीय. डॉ. रवी गोडसे यांनी सांगितलं की, कोरोनाच्या विविध व्हेरिएंटसोबत दोन हात करण्यात भारतीय सक्षम आहेत. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटबाबतही सुरुवातीला अशीच माहिती समोर आली होती की, डेल्टा आधीच्या विषाणूपेक्षा अधिक धोकादायक आहे. मात्र, डेल्टाचा भारतात जास्त संसर्ग झाल्याचं पाहायला मिळालं नाही.''
पुढे त्यांनी म्हटलं की, ''जगभरात डेल्टाचा कहर सुरु असतानाही भारतात डेल्टा व्हेरिएंटपेक्षा कोविड 19चे रुग्ण अधिक होते. अनेक व्हेरिएंट आले आणि गेले. मात्र, भारतीयांमध्ये नैसर्गिक प्रतिकार क्षमता असल्यामुळे भारतीयांना ओमिक्रोन व्हेरिएंटबाबत भीती वाटण्याचं कारण नाहीय. शिवाय, भारतात मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण झालं आहे. त्यामुळे या लसीमुळे भारतीयांच्या शरीरात अँटीबॉडीज आहेत, ज्या भारतीयांना ओमिक्रोन व्हेरिएंटशी लढण्यात प्रभावी ठरतील.''
दरम्यान, ओमिक्रोन व्हेरिएंटमुळे सध्या भारताच्या चिंतेतही भर पडली आहे. दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेले दोन नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ओमिक्रोन व्हेरिएंटचे दोन रुग्ण आढळल्यानंतर कर्नाटक सरकारनं सावध पावलं उचलत आपल्या सीमेवरील तपसणी पुन्हा एकदा कठोर केली आहे. महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटक येथून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR निगेटिव्ह चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.
ओमिक्रोन हा नवा व्हेरिएंट पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत आढळला. नव्या व्हेरिएंटचा संसर्ग होऊ नये यासाठीअनेक देश सतर्क झाले असून त्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. अमेरिका, युरोप, कॅनडा, इस्रायल, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेतील प्रवासावर बंदी घातली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
-
ओमिक्रोनचं संकट, महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR चाचणी बंधनकारक
-
Omicron Variant : ओमिक्रॉनची सौम्य लक्षणं मात्र तरुणांना धोका अधिक; दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञांचा दावा
-
Omicron variant : ओमिक्रॉनच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु होणार का? राजेश टोपेंचं महत्वाचं वक्तव्य