एक्स्प्लोर

Omicron India : काळजी घ्या! देशात ओमायक्रॉनबाधितांची संख्या 415 वर

Omicron Threat in India : भारतात ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत वाढ होत असून सरकारने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Omicron In India : देशभरात ओमायक्रॉनबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे.  वाढत्या ओमायक्रॉनबाधितांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, दिल्लीसह काही राज्यांनी रात्रीच्या वेळी संचार बंदी लागू केली आहे. ओमायक्रॉनची कोणतीही लक्षणे दिसून येत नसल्याने चिंता वाढली  आहे. देशातील 183 ओमायक्रॉन बाधितांचा अभ्यास करण्यात आला. त्यातील 70 टक्के बाधितांमध्ये कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. 

देशात ओमायक्रॉनबाधितांची संख्या 415 वर 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, जगातील 108 देशांमध्ये या व्हेरियंटचे आतापर्यंत दीड लाखांपेक्षा अधिक रुग्ण आहेत. तर, 26 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत 17 राज्यांमध्ये आतापर्यंत ओमायक्रॉनचे 415 प्रकरणे समोर आले आहे. त्यापैकी 115 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 108 ओमायक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आली आहे. भारतात ओमायक्रॉनमुळे आतापर्यंत एकही जणाचा मृत्यू झाला नाही. 

कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना संपूर्ण जग करत असून काळजी घेण्याचे आवाहन सरकारने केले आहे. वर्षाच्या शेवटी होणारे उत्सव, कार्यक्रमांमध्ये गर्दी न करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. गर्दीची ठिकाणे आणि अनावश्यक प्रवास न करण्याचे आवाहनही सरकारने केले आहे. 

दरम्यान, मुंबईत नव्यानं सापडणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढायला लागली आहे. राज्य सरकारनं ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नाईट कर्फ्यूही जारी केला आहे.  मात्र, तरीही बाजारपेठांमधली गर्दी काही कमी होताना दिसत नाही. दादरच्या भाजी बाजारात पहाटे साडेपाच वाजताच मोठी गर्दी दिसून आली. आश्चर्याची बाब म्हणजे काल मध्यरात्रीपासून नाईट कर्फ्यू लागू असूनही इथे गर्दी नियंत्रित करण्यासाठी, बेशिस्त नागरिकांना हटकण्यासाठी पोलीसही अनुपस्थित होते. अशा गर्दीत ओमायक्रॉन संसर्ग बळावला तर राज्यावरील निर्बंध अधिक कठोर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनीच शिस्त पाळण्याची गरज आहे.

 

राज्यनिहाय ओमायक्रॉनची प्रकरणे : 

महाराष्ट्र- एकूण प्रकरणे 108, आजारातून बरे झालेले : 42

दिल्ली- एकूण प्रकरणे 79,  आजारातून बरे झालेले : 23

गुजरात - एकूण प्रकरणे 43, आजारातून बरे झालेले : 5

तेलंगणा- एकूण प्रकरणे 38, आजारातून बरे झालेले :  8

केरळ - एकूण प्रकरणे 37, आजारातून बरे झालेले :  1

तामिळनाडू- एकूण प्रकरणे 34, आजारातून बरे झालेले :  0

कर्नाटक- एकूण प्रकरणे 31, आजारातून बरे झालेले :  15

राजस्थान- एकूण प्रकरणे 22, आजारातून बरे झालेले : 19

हरियाणा - एकूण प्रकरणे 4, आजारातून बरे झालेले : 2

ओरिसा- एकूण प्रकरणे 4, आजारातून बरे झालेले : 0

आंध्र प्रदेश - एकूण प्रकरणे 4, आजारातून बरे झालेले : 1

जम्मू आणि काश्मीर - एकूण प्रकरणे 3, आजारातून बरे झालेले : 3

बंगाल - एकूण प्रकरणे 3, आजारातून बरे झालेले : 1

उत्तर प्रदेश - एकूण प्रकरणे 2, आजारातून बरे झालेले : 2

चंदीगड - एकूण प्रकरणे 1, आजारातून बरे झालेले : 0

लडाख- एकूण प्रकरणे १, आजारातून बरे झालेले : १

उत्तराखंड- एकूण प्रकरणे 1, आजारातून बरे झालेले : 0

 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : 6 AM : 1JULY 2024MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget