Omicron Guidelines : ओमायक्रॉनचं संकट, दिल्ली, उत्तरप्रदेशसह अनेक राज्यांमध्ये नाईट कर्फ्यू लागू, जाणून घ्या तुमच्या राज्यातील निर्बंध...
Omicron Guidelines : ओमायक्रॉन व्हेरियंटच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी नाईट कर्फ्यू लागू केला आहे.
Omicron Guidelines : देशात ओमायक्रॉन व्हेरियंटचे (Omicron Variant) चे संकट वाढतच चालले आहे. देशातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या 578 झाली असून आकडा अद्यापही वाढतो आहे. या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी निर्बंध लागू केले आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. यामुळे महाराष्ट्रात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात 2 डिसेंबरपर्यंत रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू असेल. राजधानी दिल्लीमध्येही सरकारने नाईट कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केलीय. 27 डिसेंबरपासून दिल्लीमध्ये रात्री 11 वाजेपासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असेल.
दुसरीकडे केरळ राज्याने ओमायक्रॉनची धास्ती घेत नाईट कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली आहे. केरळमध्ये 30 डिसेंबरपासून रात्री 10 वाजपासून सकाळी 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू असेल. तर, कर्नाटकमध्येही 28 डिसेंबरपासून 2 जानेवारीपर्यंत 10 दिवसांसाठी नाईट कर्फ्यू लागणार आहे. कर्नाटकमध्ये उद्यापासून रात्री 10 वाजपासून सकाळी 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू असेल.
याशिवाय इतर राज्यांनीही कठेर पाऊले उचलत नाईट कर्फ्यू लागू केला आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, गुजरात, मध्यप्रदेश, केरळ आणि कर्नाटक या राज्यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेश राज्यांमध्ये आधीच डिसेंबरपासून नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या राज्यांत 27 डिसेंबरपासून रात्री11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत कर्फ्यू असेल.
महत्त्वाच्या बातम्या :
- Omicron in India : ओमायक्रॉन फोफावतोय; देशातील 19 राज्यांत 578 रुग्ण, महाराष्ट्राची परिस्थिती काय?
- तालिबानचे अफगाणी महिलांसाठी नवे फर्मान, एकट्या महिलेला लांबच्या प्रवासावर बंदी
- Trending : आधी अॅसिड तोंडावर फेकलं... पश्चात्ताप झाल्यानंतर त्याच तरुणीसोबत लग्न
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha